अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद?; राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भूमिका काय?

Supriya Sule on Ajit Pawar : सुप्रिया सुळे कार्याध्यक्षा तर अजित पवार प्रदेशाध्यक्ष?; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या...

अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद?; राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भूमिका काय?
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 3:40 PM

इंदापूर, पुणे : राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी मनातली खंत बोलून दाखवली. विरोधी पक्षनेतेपद आपल्याला नको होतं. पण वरिष्ठांच्या आग्रहास्तव ते पद स्विकारलं. त्यावर काम केलं. पण आता आपल्याला पक्ष पातळीवर काम करण्याची इच्छा आहे, असं अजित पवार यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद अजित पवार यांच्याकडे दिलं जाणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या कानावर तरी अशी चर्चा नाही. एका वर्तमानपत्रात अशी बातमी आली आहे. ती मी वाचली. पण मला माहिती नाही की अजितदादांना कोणतं पद दिलं जाणार आहे. परंतु पक्षाची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात मला काही आश्चर्य वाटत नाही. राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, जयंत पाटील अशा अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांवर महाराष्ट्रात आणि देशात अशा कारवाया होतात.. आतापर्यंत ज्या कारवाया किंवा आरोप झाले ते 95 टक्के विरोधी पक्षांवरच झाल्या आहेत. जो विरोधात बोलतो त्यावर केस होते हे पहायला मिळतेय, असं त्या म्हणाल्या.

बीआरएस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होत आहे. अशात के चंद्रशेखर राव पंढरपूरला दर्शनासाठी जाणार आहेत. त्यावरही सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. त्यांचं स्वागतच आहे. अतिथी देवो भव!, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

पटनामध्ये काल बैठक झाली. या बैठकीवर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. आम्ही दडपशाहीवाले नाही तर लोकशाहीवाले आहोत. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर टीका करु नये असं काही नाही. आम्ही दिलदार आहोत. त्यामुळे त्यांनी दिलदारपणे टीका करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

आमची भुमिका स्पष्ट आहे. परदेशातून दूध आणण्याच्या सरकारच्या धोरणाला सर्वप्रथम पवारसाहेबांनी विरोध केला. त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला. त्यामुळे दूध दराबाबत राष्ट्रवादी पक्ष हा शेतकऱ्यांच्याच बाजूने आहे. शेतकऱ्याला हमीभाव हा मिळालाच पाहिजे… सध्या भाव कशाला आहे? महागाई तर गगनाला पोहोचली आहे, असं म्हणत दूध दरवाढीवर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.