प्रभादेवीतील शिवसेना विरुद्ध शिंदे गट राडा प्रकरण! एकूण 25 शिवसैनिकांवर पहाटे 5.30 वाजता गुन्हा दाखल

Prabhadevi Eknath Shinde vs Shivsena : वेगवेगळ्या 9 कलमांतर्गत दादर पोलीस स्थानकात शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांविरोधात संतोष तेलवणे यांनी दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

प्रभादेवीतील शिवसेना विरुद्ध शिंदे गट राडा प्रकरण! एकूण 25 शिवसैनिकांवर पहाटे 5.30 वाजता गुन्हा दाखल
मोठी बातमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 9:01 AM

मुंबई : प्रभादेवीत झालेल्या राजकीय राड्यानंतरची (Maharashtra Political Crisis) सगळ्यात मोठी बातमी हाती येते आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे (Santosh Telwane) यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संतोष तेलवणे यांनी दादर पोलीस स्थानकात याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार अखेर दादर पोलिसांनी (Dadar Police) गुन्हा दाखल केला आहे. एकूण 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शिवसैनिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची चौकशी करुन पोलिसांनी त्यांना सोडून दिलं.

वेगवेगळ्या 9 कलमांतर्गत दादर पोलीस स्थानकात शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांविरोधात संतोष तेलवणे यांनी दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, रात्री या राड्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे का? यबाबात अद्याप कोणताही माहिती मिळू शकलेली नाही.

काय आहे प्रकरण?

संतोष तेलवणे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता संतोष तेलवणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. तसंच गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, शिंदे आणि शिवसेना या दोघांकडूनही स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या स्वागत कक्षावरुन एकमेकांना डिवचण्यात आलं होतं. एकमेकांविरोधात जोरादर घोषणा देत शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी रात्री झालेल्या या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं होतं. शनिवारी मध्यरात्री शिंदे गटाचे संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता.

हे सुद्धा वाचा

LIVE Video : पाहा लाईव्ह घडामोडी

या मारहाण प्रकरणी संतोष तेलवणे यांनी दादर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. दरम्यान, शिवसेनेकडूनही परस्परविरोधी तक्रार देण्यात आली आहे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दादर पोलिसांकडून आता या राजकीय राड्याप्रकरणी नेमकी पुढे काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आरोप आणि आरोपांचं खंडन

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार सर सरवणकर यांनी दादर पोलीस स्थानकात गोळीबार केला, असा सनसनाटी आरोप शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केला आहे. तर सदा सरवणकर यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावलाय. घरगुती वादातून भांडण झालं, असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.