'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा याने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनलमध्ये सुवर्ण कामगिरी केली. नीरज अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय ठरला.
नीरज चोप्रा याने वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकत दुसरा भारतीय ठरण्याचा बहुमान मिळवला. नीरज चोप्रा याच्या आधी माजी भारतीय शूटर अभिनव बिंद्रा याने भारतासाठी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्डन मेडल मिळवलं होतं.
अभिनव बिंद्रा याने 2006 मध्ये जगरेब वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये गोल्डन मेडल मिळवलं होतं. अभिनवनंतर आता नीरजने 17 वर्षांनंतर अशी कामगिरी केली आहे.
नीरज ऑल्मिपिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकणारा पहिलाच भारतीय आहे. अभिनव बिंद्रा याने 2006 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकलं. त्यानंतर 2008 ऑल्मिपिकमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.
नीरज चोप्रा याने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 च्या तिसऱ्या राउंडमध्ये शानदार कामगिरी करत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. नीरजने याआधी यूजीनमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सिल्वहर मेडल मिळवलं होतं.
नीरजला पहिल्या प्रयत्नात अपयश आलं. नीरजचा पहिलाच थ्रो फॉऊल ठरला. मात्र नीरजने दुसरा थ्रो हा तब्बल 88.17 मीटर लांब फेकत सुवर्ण पदक निश्चित केलं.
तर पाकिस्तानचा अरशद नदीम याने 87.72 मीटर लांब भाला फेकत सिलव्हर मेडल जिंकलं.