आयसीसी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं आयोजन हे भारतात करण्यात आलंय. या स्पर्धेआधी पाकिस्तानचे नखरे सुरु आहेत. आधी पीसीबीने सामन्यांचं ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयानेही आपली भूमिका माडंली आहे.
आम्ही भारतात पाकिस्तानच्या सुरक्षेचा आढावा घेतोय, अशी माहिती पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव मुमताज बलूच यांनी दिली. इतकंच नाही, तर भारताविरुद्ध वक्तव्यही केलं. भारताचं पाकिस्तानात न खेळण्याची भूमिका ही निराशाजनक असल्याच म्हटलं.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अखेरची द्विपक्षीय मालिका ही 2012-13 साली खेळवण्यात आली. त्यानंतर जोन्ही संघ हे फक्त आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेतच खेळतात.
पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील 2 सामन्यांचं ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. मात्र बीसीसीआय आणि त्यानंतर आयसीसीने पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली.
पाकिस्तानला अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याचं ठिकाण बदलून हवं होतं. तसेच आम्हाला अफगाणिस्तानऐवजी बिगर आशियाई संघाविरुद्ध सामना खेळायचं असल्याचं म्हटलं आहे. (सर्व फोटो - AFP)