ना राहुल, ना प्रियांका, ना शिवकुमार, ना सिद्धरामय्या… हा माणूस कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाचा थिंक टँक

Who is Naresh Arora : कर्नाटकात काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. या विजयासाठी मोठमोठे दावा केले जात आहेत. परंतु माध्यमांपासून लांब राहून आपले काम करणाऱ्या एका व्यक्तीची चर्चा आता सुरु झाली आहे. काँग्रेसला यश मिळवून देणारे नरेश अरोरा कोण आहेत?

ना राहुल, ना प्रियांका, ना शिवकुमार, ना सिद्धरामय्या... हा माणूस कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाचा थिंक टँक
Naresh Arora
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 11:19 AM

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला. या विजयासंदर्भात अनेक तज्ज्ञ आपआपली गणिते मांडत आहेत. काही जणांनी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचे यश म्हटले आहे. तर काही जण मल्लिकार्जुन खरगे, सिद्धरामय्या यांचा अनुभव सांगत आहेत. काही जणांनी डीके शिवकुमार आणि प्रियांका गांधी वड्रा यांनाही श्रेय दिले आहे. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे काँग्रेसने कर्नाटकात विजय मिळवला, हेही खरे आहे. या नावांव्यतिरिक्त कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा थिंक टँक म्हणून काम करणारा पडद्यामागील निवडणूक रणनीतीकाराचे मोठे योगदान आहे.

कोण आहे हा रणनीतीकार

नरेश अरोरा असं त्या व्यक्तीचं नाव आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी थिंक टँक म्हणून त्यांनी काम केले. डीके शिवकुमार यांच्यासमवेत त्यांनी काम केले. डिजिटल मार्केटिंगचे ते मास्टर मानले जातात. नरेश अरोरा यांनी संपूर्ण कर्नाटक निवडणुकीचे नियोजन केले. ते मुळात टेक्सटाईल इंजिनीअर आहे. परंतु आता डिजिटल मार्केटिंगमध्ये प्रसिद्ध झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे काम ते करत होते.

हे सुद्धा वाचा

प्रथम या ठिकाणी मिळवले यश

नरेश अरोरा यांनी पहिल्यांदा 2017 च्या गुरदासपूर पोटनिवडणुकीत आपले कौशल्य दाखवले. त्यानंतर हिमाचल प्रदेश पोटनिवडणुकीत आणि पंजाब महानगरपालिका निवडणूक 2018 आणि शाहकोट पोटनिवडणूक 2018 यासह अनेक प्रसंगी त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. पंजाब सरकारने ड्रग्सविरोधी लढ्यासाठी असलेल्या विशेष टास्क फोर्स (STF) चे डिजिटल मीडिया स्पेशालिस्ट आहेत.

पंजाबमध्ये जन्म

नरेश अरोरा यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. ते अमृतसरचे आहे. परंतु आता बंगळुरूमध्ये राहत आहेत. त्यांची कंपनी डिझाईन बॉक्स 7 वर्षांपासून निवडणूक व्यवस्थापन पाहत आहे. प्रसिद्धीच्या झोतात न राहता मागून काम करण्यावर त्याचा विश्वास आहे. ते राजस्थानमध्येही काम करत आहेत.

140 जागांचा होता दावा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत नरेश अरोरा म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून ते कर्नाटकसाठी काम करत होते. त्यांनी डीके शिवकुमार यांना त्यांच्या सर्वेक्षणातून काँग्रेस 140 जागांवर विजय मिळवून देईल असे आश्वासन दिले होते. ही संख्या जवळजवळ परिपूर्ण असल्याचे दिसून येते. काँग्रेसला 136 जागा मिळाल्या आहेत. दोन वर्षांच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे नरेश सांगतात.

गँरंटी शब्द आणला

नरेश म्हणाले की, आसाम निवडणुकीत काँग्रेसने पहिल्यांदाच गँरंटी शब्द दिला. आसाम निवडणुकीच्या प्रचारासाठी वेळेची कमतरता होती, त्यामुळे काँग्रेसला आसाममध्ये विजय मिळवता आला नाही. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये हाच हमी शब्द वापरला, तिथे त्यांची चर्चा आवडली आणि त्यांचे सरकार स्थापन झाले.

मुख्यमंत्री कोण हवा

मुख्यमंत्री कोण हवा? यावर व्यक्तीगत मत व्यक्त करत नरेश म्हणाले, की डीके शिवकुमार यांनी गेल्या दोन वर्षांत एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पूर्ण जबाबदारीने काम केले आहे. त्यांनी 1 लाख 22 हजारांहून अधिक मताधिक्याने राज्यात सर्वाधिक मतांची नोंद केली आहे. कनकपुरातील जनतेने त्यांना आमदार होण्यासाठी नाही तर पुढचा मुख्यमंत्री होण्यासाठी इतके मत दिले आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.