‘जनार्दन कृपे’मुळे 30 हजाराच्या पगारात बनवली 7 कोटींची प्रॉपर्टी, कोण आहे जनार्दन?
hema meena : मध्य प्रदेशात लोकायुक्तांनी केलेल्या कारवाईनंतर हेमा मीना चर्चेत आली आहे. फक्त तीस हजार पगार असताना तिने सात कोटींची संपत्ती कशी जमवली? तिचे आणि जनार्दन सिंह यांचे काय नाते आहे? यावर आता चर्चा सुरु झाली आहे.
भोपाळ : मध्यप्रदेशातील हॉसिंग कॉर्पोरेशनच्या सहायक इंजीनिअर हेमा मीणाच्या घरी लोकायुक्तांनी (lokayukta raid) काही दिवसांपूर्वीच छापेमारी केली. या छापेमारीत मोठे घबाड सापडले. अवघ्या 30 हजार रुपये पगार असतानाही तिने सात कोटीची (7 crore) संपत्ती जमवल्याचं उघड झाले. बिलखिरिया येथील मध्य प्रदेश पोलीस गृहनिर्माण महामंडळातील सहायक अभियंता प्रभारी पदावर हेमा मीना कार्यरत आहे. मग तिने इतकी संपती कशी जमवली? हाच प्रश्न सर्वेकडे चर्चीला जात आहे. त्यावर आता खुलासा झाला आहे. जनार्दनच्या कृपेमुळे ही संपत्ती जमा झाली आहे.
हेमा अन् जनार्दनचे संबंध
हेमा आणि जनार्दन सिंह यांनी ठेकेदार अमर पंडित यांना तीन प्रॉपर्टीवर काम करायला लावले. ते म्हणतात, जनार्दन रोज फोन आणि व्हॉट्सअॅपवर अपडेट घेत होते. मी केलेल्या कामाचे ५३ लाख रुपये त्यांनी दिले नाहीत. या संदर्भात जनार्दन आणि हेमा यांच्या नावाने डीजीपी आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या. पण कारवाई फक्त हेमा मीना यांच्यांवर झाली. लोकायुक्तांकडे आलेल्या तक्रारींमध्ये जनार्दनच्या नावाचाही उल्लेख होता, पण आजतागायत ते तपासाच्या कक्षेत आलेले नाहीत, यावरून तो किती बलशाली आहे, याचा अंदाज येतो.
हेमा राहत होती लिव्ह-इनमध्ये
हेमा आणि जनार्दन यांचे कौटुंबिक संबंध असल्याचे जनार्दन यांनी मान्य केले. हेमा पूर्वी शंभू नावाच्या पेट्री कॉन्ट्रॅक्टरसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. 2015-16 मध्ये शंभू आणि हेमाच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. जनार्दनमुळेच आपले नाते तुटल्याचा आरोप शंभूने केला होता. जनार्दन फार्म हाऊसवर नियमित येत असल्याचे सांगण्यात येते.
हेमा काय म्हणते
हेमा मीना म्हणते ही संपत्ती माझ्या वडिलांची आहे. परंरु जनार्दन सिंह यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहे. माझ्यावर होत असलेले सर्व आरोप निराधार आहेत. मी शंभूसोबतचे संबंध 2015-16 मध्येच तोडले, कारण तो विवाहित होता आणि माझ्यावर एकत्र राहण्यासाठी दबाव टाकत होता. त्यासाठी मला जनार्दन यांनी मदत केली.
अशी होती सापडलेली संपत्ती
हेमा मीना यांचा बंगला आलिशान वस्तूंनी भरलेला होता. ३० हजार रुपये मासिक पगार घेणाऱ्या कंत्राटी अभियंत्याच्या खोलीतून ३० लाख रुपयांचा टीव्ही संच जप्त करण्यात आला आहे. हा नवीनच आणला होता. तो सुरु केला नव्हता. फक्त बॉक्समध्ये पॅक होता. तसेच तिच्या बंगल्यात 2 ट्रक, 1 टँकर, महिंद्रा थार अशी 10 महागडी वाहनेही सापडली आहेत.