बंगळुरु : चांद्रयान-3 मधील विक्रम लँडरने बुधवारी चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. सर्व देशवासियांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. विक्रम लँडर आणि त्यामध्ये असलेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर आता संशोधनाच काम सुरु केलं आहे. विक्रम लँडर आणि रोव्हरकडून दररोज चंद्रावरील नवीन फोटो आणि व्हिडिओ पाठवले जात आहेत. काल इस्रोने विक्रम लँडर चंद्रावर उतरत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेने प्रज्ञान रोव्हरचा नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे.
नव्या व्हिडिओमध्ये प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पुष्ठभागावर उतरल्यानंतर बऱ्याच लांब अंतरावर जाताना दिसला. आता चंद्रावर कामाला सुरुवात केली आहे. ISRO ने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर नवीन व्हिडिओ शेअर केलाय.
हा व्हिडिओ 40 सेकंदांचा
“दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या रहस्यांचा शोध सुरु. प्रज्ञान रोव्हर शिवशक्ती पॉइंटच्या आसपास फिरतोय” असं इस्रोने फोटोला कॅप्शन दिलं आहे. इस्रोने शेअर केलेला हा व्हिडिओ 40 सेकंदांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इस्रोच्या बंगळुरुतील मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी विक्रम लँडरने जिथे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. त्या जागेला शिवशक्ती पॉइंट नाव देत असल्याची घोषणा केली.
शिवमध्ये मानव कल्याण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती पॉइंटचा अर्थही समजावून सांगितला. शिवमध्ये मानव कल्याण सामावलेलं आहे. शक्ती त्या संकल्पाला पूर्ण करण्याच सामर्थ्य देतं. चंद्रावरील या शिवशक्ती पॉइंटमुळे हिमालय ते कन्याकुमारीला जोडलं गेल्याची भावना निर्माण होते.
Chandrayaan-3 Mission:
🔍What’s new here?Pragyan rover roams around Shiv Shakti Point in pursuit of lunar secrets at the South Pole 🌗! pic.twitter.com/1g5gQsgrjM
— ISRO (@isro) August 26, 2023
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर मिळून चंद्रावरील वातावरण, पुष्ठभाग, रसायन, भूकंप आणि खनिज याचा अभ्यास करणार आहेत. इस्रोसह जगभरातील वैज्ञानिकांना यामुळे चंद्रावर अधिक अभ्यास करण्यासाठी माहिती मिळेल. रिसर्च अजून सोपा होईल.