Bhiwandi Building Collapse : दुपार, संध्याकाळ अन् रात्र सरली… 20 तास ‘तो’ ढिगाऱ्याखाली तडफडत होता; 10 जणांचा शोध सुरूच

| Updated on: Apr 30, 2023 | 10:04 AM

भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिधोकादायक इमारती पडण्याच्या घटना होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी शिफ्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

Bhiwandi Building Collapse : दुपार, संध्याकाळ अन् रात्र सरली... 20 तास तो ढिगाऱ्याखाली तडफडत होता; 10 जणांचा शोध सुरूच
Bhiwandi building collapse
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, भिवंडी : भिवंडीत काल दुपारी एक तीन मजली इमारत कोसळून तीनजण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली 10 जण अडकले असून त्यांचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. 20 तास झाले तरी अजूनही या 10 जणांचा शोध लागलेला नाही. अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम या लोकांना शोधण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तब्बल 20 तासानंतर एका व्यक्तीला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. सुनील बाळू असं या व्यक्तीचं नाव असून तो गेल्या 20 तासापासून या ढिगाऱ्याखाली दबला होता.

हे सुद्धा वाचा

सुनील बाळू याला तब्बल 20 तासानंतर आज सकाळी 8 वाजता अग्निशम दल आणि एनडीआरएफच्या टीमने बाहेर काढले. गेल्या 20 तासांपासून तो या ढिगाऱ्याखाली दबला होता. बाहेर येण्यासाठी त्याची तडफड सुरू होती. पण ढिगारा एवढा प्रचंड होता की त्याला हालचालही करता येत नव्हती. कालची दुपार, संध्याकाळ आणि रात्र सरली तरीही त्याला बाहेर येता येत नव्हतं. मात्र, अशाही परिस्थिती सुनील जिवंत राहिल्याने त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

शोध सुरूच

घटनास्थळी NDRF चे अजूनही बचावकार्य सुरू आहे. तळमजल्यावरील गोदामात अडकलेल्या व्यक्तींना शोधण्यात येत आहे. अजूनही 10 व्यक्ती अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वीस तास उलटून गेल्या नंतर सकाळी एमआरके फूड या गोदाम भागात अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेत असताना सुनीलने प्रतिसाद दिल्याने NDRF जवानांनी त्याला सुरक्षित बाहेर काढले. सुनीलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या सर्व टेस्ट करूनच त्याला घरी सोडलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुख्यमंत्री स्पॉटवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा भिवंडी इमारत दुर्घटना स्थळाला भेट दिली. भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या मजुरांची भेट घेऊन त्यांची चौकशी करून त्यांना धीर दिला. या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या प्रेम आणि प्रिन्स या लहानग्यांची त्यांनी चौकशी केली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवर शासकीय खर्चात उपचार करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

पाच लाखांची मदत

या ठिकाणी जेवढे लोकं भेटलेले आहेत त्यातील नऊ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. तर तीन लोक मृत झालेले आहेत. काही लोक अजून अडकलेले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. बिल्डिंगच्या या ढिगाऱ्यांमध्ये जे अडकलेले आहेत त्यांना जिवंत बाहेर काढण्याचं शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. इमारत पडल्यानंतर बारा लोकांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलंय. हे टीडीआरएफ टीमचं कौतुक आहे. जे मृत झाले आहेत त्यांच्या मागे सरकार उभे आहे. त्यांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयाची मदत दिली जाईल आणि जखमींवर मोफत उपचार केले जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.