Dombivali Crime : डोंबिवलीत उधारी देण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकासह कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, दोघेही गंभीर जखमी

डोंबिवली मानपाडा रोडवर असलेल्या शारदा मुकाआंबिका हॉटेलमध्ये काल रात्रीच्या सुमारास 10 ते 15 जणांच्या टोळक्यांनी हॉटेलात घुसून धिंगाणा घातला. यात सीसीटीव्ही कॅमेरा, टेबल खुर्च्यांची तोडफोड करत डीव्हीआरच्या वायर तोडून हॉटेलचे मालक दयांनद शेट्टी आणि एका कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली.

Dombivali Crime : डोंबिवलीत उधारी देण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकासह कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, दोघेही गंभीर जखमी
डोंबिवलीत उधारी देण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकासह कर्मचाऱ्याला बेदम मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 4:29 PM

डोंबिवली : मागील बिल बाकी असल्याने पार्सल उधारीमध्ये न दिल्याने 10 ते 15 जणांच्या टोळी (Gang)ने हॉटेलमध्ये तोडफोड (Vandalism) करत हॉटेल मालक व हॉटेल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना काल रात्री डोंबिवलीत घडली आहे. मानपाडा रोडवरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. या मारहाणीत हॉटेल मालक आणि कर्मचारी दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या हॉटेलचे मालक व त्यांच्या कर्मचार्‍यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

पार्सल देण्यास नकार दिल्याने तोडफोड आणि मारहाण

डोंबिवली मानपाडा रोडवर असलेल्या शारदा मुकाआंबिका हॉटेलमध्ये काल रात्रीच्या सुमारास 10 ते 15 जणांच्या टोळक्यांनी हॉटेलात घुसून धिंगाणा घातला. यात सीसीटीव्ही कॅमेरा, टेबल खुर्च्यांची तोडफोड करत डीव्हीआरच्या वायर तोडून हॉटेलचे मालक दयांनद शेट्टी आणि एका कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली. याचवेळी मालकाजवळ असलेली 1 लाख रूपयांची रोकड आणि अंगठी देखील चोरी केली असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये रात्री एक ग्राहक बसला होता. बिल न भरता तो तेथून निघून गेला.

काही वेळाने हॉटेलमध्ये 10 ते 15 जण आले आणि त्यांनी त्या ग्राहकाचे नाव सांगून पार्सल मागितले. मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना आधी बिल भरण्यास सांगताच संतापलेल्या या टोळीने हॉटेलमध्ये तोडफोड करत हॉटेल मालक दयानंद शेट्टी व त्याच्या कर्मचाऱ्याला देखील मारहाण केली. हॉटेल मालक दयानंद शेट्टी याच्या डोक्याला आणि अंगावर दुखापत झाली असल्याने उपचारासाठी त्यांना डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (A hotel owner and an employee were beaten to death for refusing to deliver a parcel in Dombivali)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.