प्रदीप कापसे, पुणे | 23 जुलै 2023 : पुणे शहरात मंगळवारी दोन दशतवादी पकडले गेले होते. इम्रान खान आणि मोहम्मद साकी अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे पुणे शहरात दीड वर्षांपासून राहत होते. एनआयएने त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. परंतु ते फरार होते. तपास संस्थांकडून त्यांचा शोध सुरु असताना बिनधास्तपणे ते पुणे शहरात राहत होते. एनआयएने त्यांना मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते. या दोघ दहशतवाद्यांची कसून चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुण्यात पकडलेले इम्रान खान आणि मोहम्मद साकी हे दोघे जयपूर सीरियल बॉम्ब ब्लॉस्ट प्रकरणातील फरार आरोपी आहेत. हे दोघे बॉम्ब बनवण्यात एक्स्पर्ट असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास दशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) देण्यात आला.
पुणे शहरात देशातील अनेक महत्वाच्या संस्था आहेत. एनडीएसारखी लष्करी प्रशिक्षण संस्था आहे. डीआरडीओ पुण्यात आहे. दक्षिण कमांडचे मुख्यालय पुण्यात आहेत. भारतीय लष्कराच्या अनेक महत्वाच्या संस्था पुण्यात आहेत. पुण्यातील या महत्वाच्या ठिकाणांचा ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याचा दोघांचा प्रयत्न होता. त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाचा गोळ्याही सापडल्या आहेत. या गोळ्या न्यायवैद्यक शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यांच्या लॅपटॉपमध्ये देशविघातक कृत्याची माहिती सापडली आहे.
पोलीस कर्मचारी अमोल नाजन आणि प्रदीप चव्हाण यांना १८ जुलै रोजी इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी गाडी चोरीच्या प्रकरणात सापडले. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला. त्यानंतर या दोघांची चौकशी सुरु केली असता ते घाबरले. पोलिसांना त्यांचा संशय आला. त्यांनी आपली नावेही चुकीची सांगितली. मग ट्रू कॉलरमध्ये त्यांचा क्रमांक टाकल्यानंतर इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी हे नाव समोर आले. त्यानंतर त्यांच्या घराची तपासणी केल्यावर अनेक आक्षपार्ह वस्तू सापडल्या. त्यात काडतूस, पिस्तूल आणि इतर आक्षेपार्ह साहित्य सापडले. त्यांचा लॅपटॉप जप्त केला.
राजस्थानमध्ये बॉम्ब स्फोट घडवण्याचा कटात एनआयएकडून त्यांचा शोध सुरु होता. ते सापडत नसल्यामुळे त्यांच्यांवर पाच लाखांचे बक्षीस घोषित झाले होते. आयसिसी या दहशतवादी संघटनेच्या सुफा संघटनेशी ते संबंधित होते.