मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, पुण्यावरुन मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल पाच किलोमीटरच्या रांगा

Pune Mumbai Expressway fire : मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर मंगळवारी मोठा अपघात झाला आहे. या अपघातानंतर वाहतूक थांबवण्यात आली आहे. एक्स्प्रेसवर वे वर एका ऑईल टँकरला आग लागली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, पुण्यावरुन मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल पाच किलोमीटरच्या रांगा
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 2:20 PM

रणजित जाधव, पुणे : मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात झाला आहे. एक्स्प्रेसवर वे वर केमिकल टँकरला आग लागली आहे. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. एक्स्प्रेसवर लोणावळा हद्दीत कुने गावाच्या ब्रीजवर एका टँकरला ही भीषण आग लागली. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली असून आग विझविण्यास यश आले आहे. केमिकल टँकर पुलावर असताना लागलेल्या या आगीमुळे पुलाखालून जाणाऱ्या  गाड्यांची हानी झाली आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.

कसा झाला अपघात

केमिकल घेऊन पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला. यामुळे टँकर स्लिप झाला, या अपघाताने टँकर रस्त्यावर आडवा झाला. मग त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले. खालून जाणाऱ्या मार्गावर ही केमिकल पसरले. त्यानंतर टँकरला आग लागली. खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर हे केमिकल पडले. यात ते होरपळले. तर टँकरमधील आगीत होरपळले. महामार्गावरील खंडाळा घाटात हा अपघात झाला आहे. या ठिकाणी एका टँकरला आग लागली. आगीने पुलाखालील गाड्याही जळून खाक झाल्या. या आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत आहेत. पुलाखाली दोन ते तीन गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या

अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. गेल्या एक तासापासून आग धुमसत होती. आता आगीवर नियंत्रण मिळवले आहे. दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे.

वाहतूक थांबवली

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून सध्या लोणावळा दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे बचावकार्य जलदगतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात दोघ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मध्यरात्री लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू

पुणे येथील मार्केटयार्डमधील गेट नंबर एकजवळ हॉटेल रेवळ सिद्धी आहे. या हॉटेलला सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला तत्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी हॉटेलमधील आगीत अडकलेल्या तीन कामगारांना बाहेर काढले. परंतु त्यातील दोघांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.