पुणे हनी ट्रॅप प्रकरण, प्रदीप कुरुलकरची नाटके सुरु अन् एटीएस अडकली मोबाईल लॉकमध्ये
Pune News Honey Trap : पुणे शहरातून उघड झालेले हनी ट्रॅप प्रकरण गंभीर होऊ लागले आहे. या प्रकरणी डीआरडीओ संचालकास अटक झाल्यानंतर त्याचा एक मोबाईल अजूनही डिकोड झाला नाही. त्याच्या दुसऱ्या मोबाइलमध्ये महिलांचे अश्लिल फोटो सापडले आहेत.
पुणे : पुणे येथील डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये अडकला आहे. पाकिस्तानी महिला गुप्तहेरच्या जाळ्यात तो सापळला. एटीएसकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीत त्याच्याकडून सहकार्य मिळत नाही. पुणे एटीएसला प्रदीप कुरुलकरच्या मोबाइलमध्ये महिलांचे अश्लिल फोटो मिळाले आहे. प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानी ललनेच्या सापळ्यात अडकून भारतीय संरक्षण विभागाची अत्यंत गोपनीय माहिती अन् कागदपत्रे दिली असल्याचा आरोप आहे. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात आहे. त्याचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
नाटके केली सुरु
एसटीएस प्रदीप कुरुलकर याचा तपास करत आहे. न्यायालयाने एटीएसला परवानगी दिली आहे. एसटीएसने कुरुलकरकडून मोबाईल पासवर्ड जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कुरुलकरकडून नाटके केली जात आहे. मोबाईलचा पासवर्ड लक्षात नाही, असे कुरुलकर एटीएसला सांगत आहे. तो सहकार्य करीत नसल्याचे तपास यंत्रणेच्या लक्षात आले आहे. बुधवारी (दि. 7) कुरुलकरची कोठडी संपली. तपास पथकाने अर्ज करीत कोठडी वाढविण्यासाठी अर्ज सादर केला. मात्र, सुनावणी करणारे न्यायाधीशांची बदली झाल्यामुळे त्यावर सुनावणी होऊ शकली नाहीत.
3 मे रोजी केली होती अटक
प्रदीप कुरुलकर याने भारतीय संरक्षण दलाची गोपनीय माहिती शत्रुराष्ट्राच्या हाती दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर 3 मे रोजी गुन्हा दाखल करून एटीएसने अटक केली होती. अटकेनंतर जवळपास पंधरा दिवसांपासून येरवडा कारागृहात असलेला कुरुलकर तपास यंत्रणेला तपासात मदत करीत नाही.
राज्याबाहेरील यंत्रणेची मदत घेणार
कुरुलकरच्या कृत्याचे अनेक प्रकार तपास यंत्रणेच्या हाती लागत आहेत. त्याच्या मोबाईलसह इतर तपासासाठी राज्याबाहेरील यंत्रणेची मदत मागितली जाणार असल्याचे वृत्त आहे. एटीएसने कुरुलकर याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे असलेले तीन मोबाईल जप्त केले होते. त्यापैकी एका मोबाईलचा लॉक पुण्यातील फॉरेन्सिक लॅबकडून उघडला गेला नाही. त्या मोबाईलचा पासवर्ड लक्षात नसल्याचे नाटक कुरुलकरही करत असून तपास यंत्रणेची दिशाभूल करीत आहे.
प्रदीप कुरुलकर आणि निखिल शेंडे दोन वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी एकाच आयपी ॲड्रेसवरुन मेसेजेस आले होते. या दोघांमध्ये काही संभाषण देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. या अनुषंगाने आता तपास देखील सुरु आहे. तपासासाठी हवाई दलाची एक टीमही तयार करण्यात आली आहे