पुणे : पुणे DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाचे संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी महिला गुप्तहेराने निर्माण केलेल्या हनी ट्रॅपमध्ये सहज अडकले. त्या गुप्तहेर असलेल्या महिलने प्रदीप कुरुलकर याच्याशी पहिल्यांदा व्हॉटसॲपच्या माध्यमातून संपर्क साधला. मग दोघांमध्ये संवाद सुरु झाला. एककीकडे पाकिस्तानी महिला गुप्तहेराच्या जाळ्यात कुरुलकर अडकत होते. दुसरीकडे डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्येच ते अनेक महिलांना बोलवत होते. अर्थात या महिला पाकिस्तानी नव्हत्या. परंतु त्या का येत होत्या? याचाही तपास आता सुरु झाला आहे.
पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला भेटला का?
देशाची सुरक्षा धोक्यात घालणाऱ्या या DRDO शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याला महाराष्ट्र एटीएसच्या पुणे युनिटने अटक केली आहे. कुरुलकर पाकिस्तानी महिला गुप्तहेराच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. कुरुलकर एका पाकिस्तानी महिलेशी ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलद्वारे बोलायचा, असे तपासात समोर आले आहे. मात्र, तिला तो कधीच भेटला नाही. याशिवाय डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये कुरुलकर इतर महिलांनाही भेटत असत. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, या महिलांची ओळख पटवून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र, या महिलांचा पाकिस्तानी हेरगिरी प्रकरणाशी काहीही संबंध नाही. परंतु कुरुलकर आणि महिला असे प्रकरण समोर येत आहे.
व्हॉट्सॲप चॅट्समध्ये काय होते
एटीएसला भारतीय शास्त्रज्ञ कुरुलकर आणि पाकिस्तानी गुप्तहेर यांच्या व्हॉट्सअॅप चॅट्स मिळाल्या आहेत. एका चॅटमध्ये तो पाकिस्तानी गुप्तहेर रशियातून लंडनला येत असल्याचे सांगत होता. परंतु कुरुलकरने एटीएसला सांगितले की, रशियाला गेला नाही किंवा लंडनलाही गेला नाही, असे उघड झाले आहे.
जरा गुप्ता नावाने पहिल्यांदा ओळख
प्रदीप कुरुलकर याला हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या महिलेने जरा दास गुप्ता नावाने पहिले व्हॉट्सअॅप त्याला केले. मी भारतीय असून तुझी मोठी फॅन आहे’ असे लिहिले होते. या कौतुकाने कुरुलकर खूप झाले आणि नंतर त्यांचे चॅट आणि बोलणे वाढत गेले.
कुरुलकर म्हणतात ती पाकिस्तानी असल्याचे माहीत नव्हते
एटीएस टीमला कुरुलकर यांनी सांगितले की, ती महिला पाकिस्तानी असल्याचे आपणास माहीत नव्हते. ती मला माझा प्रोफाइल वाचून प्रभावित झाली असल्याचे सांगत होती. ती पाकिस्तानला नेहमी शिव्या देत होती. जेव्हा मला समजले की मी हनी ट्रॅपमध्ये फसलो आहे, तेव्हा तिचा नंबर ब्लॉक केला. परंतु त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरुन तिने संपर्क केला. फेब्रुवारी महिन्यापर्यंत मी तिच्या संपर्कात होतो.