काँग्रेस नेते व देवेंद्र फडणवीस यांच्यांत गुफ्तगू? काय झाली चर्चा?
पुणे शहरातील कसबा मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेस नेत्याने घेतले भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीत काय चर्चा झाली त्याचा तपशील बाहेर येऊ शकला नाही.
पुणे : पुणे शहरातील काँग्रेसचा (Pune Congress)बड्या नेत्याने भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची भेट घेतली असल्याचे वृत्त आहे. पुणे शहरातील कसबा मतदार संघासाठी पोटनिवडणूक (Pune Election)जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेस नेत्याने घेतले भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीत काय चर्चा झाली त्याचा तपशील बाहेर येऊ शकला नाही.
मुक्ता टिळक (mukta tilak)यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदार संघात २७ फेब्रवारी रोजी निवडणूक होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रूपाली पाटील-ठोंबरे हे इच्छुक आहेत. त्यांनी जाहीरपणे आपली इच्छा बोलून दाखवली. पक्षाने आदेश दिल्यास मीसुद्धा कसबा मतदार संघाची निवडणूक लढवण्यास तयार आहे. पण येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतली, असे ठोंबरे यांनी सांगितले. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पुणे शहरात रंगू शकतो. यामुळे आपला विजय सोपा करण्यासाठी भाजपने काँग्रेसला लक्ष सुरु केले आहे.
कोणी घेतील भेट
पुणे मनपा काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली त्याचा तपशील गुलदस्त्यात आहे. परंतु विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. फडणवीस पुण्यातील सहकार नगरमध्ये आपले नातेवाईकांकडे आले असताना ही भेट झाली. या भेटीसंदर्भात आबा बागुल यांच्यांकडून दुजोरा मिळाला नाही.
काँग्रेसची कसबा मतदार संघातून तयारी
भाजपची तयारी सुरु असताना महाविकास आघाडीतून काँग्रेसने कसबा मतदार संघासाठी दावा केला आहे. दोन वेळा काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याचा दाखला दिला जात आहे. काँग्रेसकडून माजी नगरसेवक अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे यांची नावे पुढे आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही या मतदार संघावर दावा केला जात आहे.