Maharashtra Board results : दहावी, बारावीचा निकाल कधी? बोर्डाकडून मिळाले महत्वाचे संकेत

Maharashtra Board 10th, 12th results : दहावी, बारावीचा सीबीएसई अन् आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला. आता राज्यातील विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतिक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.

Maharashtra Board results : दहावी, बारावीचा निकाल कधी? बोर्डाकडून मिळाले महत्वाचे संकेत
ssc hsc result
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 11:03 AM

प्रदीप कापसे, पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल कधी लागणार यासंदर्भात उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. कारण नुकतेच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले. आता महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची प्रतिक्षा आहे. परंतु दहावी-बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपणार आहे. बोर्डाने निकाल कधी लागणार? याचे संकेत दिले आहे.

कधी लागणार निकाल

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. बारावीचा निकाल 31 मे च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी सुरू झाली आहे. तर दहावीचा निकाल जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

किती विद्यार्थी होते

दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15,77,256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8,44,116 मुले तर 7,33,067 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5,033 सेंटरवर दहावीची परीक्षा झाली होती. आता या सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे.

कुठे पाहाता येईल निकाल?

दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे.

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.mahahhscboard.in

निकालानंतर प्रवेश प्रक्रिया

CBSE इयत्ता 10 च्या परीक्षेला 21,86,940 विद्यार्थी बसले होते आणि 16,96,770 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल मिळाले आहे. आता महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकाल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रक्रिया सुरु होणार आहे.

सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. या परीक्षेसाठी 15.21 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेला सुमारे 10 लाख विद्यार्थी बसले होते. 2022 मध्ये सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली होती. टर्म 1 ची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर टर्म 2 ची परीक्षा मे-जूनमध्ये घेण्यात आली होती. बोर्डाने दोन्ही टर्मचे गुण एकत्र करून निकाल जाहीर केला होता.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.