Monsoon Update : पुढील पाच दिवस कुठे यलो ऑरेंज अन् कुठे यलो अलर्ट, पावसाचा जोर कसा असणार

Monsoon and Rain in Maharashtra : राज्यात कालपासून अनेक ठिकाणी पाऊस पडू लागला. मुंबई अन् विदर्भात मान्सून दाखल झाला आहे. आता आगामी पाच दिवस राज्यात कसा असणार पाऊस? याचा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे.

Monsoon Update : पुढील पाच दिवस कुठे यलो ऑरेंज अन् कुठे यलो अलर्ट, पावसाचा जोर कसा असणार
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 4:11 PM

पुणे : गेल्या पंधरा दिवसांपासून प्रतिक्षेत असणार मान्सून राज्यातील अनेक भागांत दाखल झाला आहे. विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने थांबवलेला मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरु झाला आहे. २३ जूनपासून राज्यातील अनेक भागांत मान्सून सक्रीय झाला आहे. त्यानंतर २४ जून रोजीही अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. मुंबई, पुणे अन् कोकणात पाऊस सुरु झाला आहे. राज्यात अजून कोठेही वाहून निघेल असा पाऊस झालेला नाही. आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा सकारात्मक अहवाल दिला आहे. पुढील पाच दिवसांसाठी काही ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसुद्धा दिले आहे.

कुठे कसा पडणार पाऊस

राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी टि्वट करुन दिली. पुढील पाच दिवसांत कोकण अन् विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस असणार आहे. पुणे, सातारा, नाशिकमध्येही मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र अन् मराठवाडामध्ये ही पावसाचा जोर राहणार आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंद निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. परंतु शेतकरी वर्गाने अजूनही पेरणी करण्याची घाई करु नये. जमिनीतील ओल पाहून पेरणीसंदर्भात निर्णय घ्यावा, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

रत्नागिरीत मान्सून सक्रीय

रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सक्रीय झाला आहे. रत्नागिरीत पावसाची दमदार एंट्री शनिवारी झाली. यामुळे शेतकऱ्यांसमोरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, दापोलीसह जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. कोकणातील वातावरण पावसामय झाले आहे.

इगतपुरीत दमदार पाऊस

पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरीत 6 ते 9 जून दरम्यान पाऊस दरवर्षी आपली जोरदार हजेरी लावतो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ही परंपरा यंदा खंडीत झाली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज इगतपुरी शहरासह परिसरात वरून राजाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुखावला आहे. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.