भाऊ-बहीण झाल्या बंटी अन् बबली, नोकरीसाठी ४६ जणांची कोट्यवधीत फसवणूक
भाऊ आणि बहीण शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे दाखवून ४६ उमेदवारांची कोट्यवधी रुपयांमध्ये फसवणूक केलीय. यातील बहीण आता राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त झाल्या आहेत.
पुणे : नोकरीसाठी फसवणूक (Pune Crime News) केल्याचा नवीन प्रकार पुणे शहरातून समोर आला आहे. भाऊ आणि बहीण शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे दाखवून ४६ उमेदवारांची कोट्यवधी रुपयांमध्ये फसवणूक केलीय. यातील बहीण आता राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त झाल्या आहेत. या प्रकरणी एका ५० वर्षाच्या शिक्षकाने हडपसर पोलीस ठाण्यात (Police complaint ) तक्रार दिल्यानंतर झालेला प्रकार उघड झाला आहे. या कथित भरती गैरव्यवहारामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. फसवणुकीची एकूण रक्कम चार ते पाच कोटी रुपयांमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
काय आहे प्रकार
सांगली जिल्ह्यातील शिक्षक पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी हडपसर पोलिलास फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शैलजा रामचंद्र दराडे (रा. पुणे) आणि दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर, जि.पुणे) हे दोन्ही भाऊ-बहीण आहेत. दादासाहेब दराडे याने माझी बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी आहेत, असे सांगत नोकरीचे आमिष दाखवले. माझ्या दोन नातेवाइकांना शिक्षक पदावर नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी १२ लाख आणि १५ लाख रुपये घेतले. परंतु त्यांना आजपर्यंत शिक्षक म्हणून नोकरी लावली नाही अन् पैसे परत केले नाही.
४४ जणांची फसवणूक
पोलिसांनी केलेल्या तपासात या बंटी अन् बबली भाऊ-बहिणीने एक-दोन नव्हे तर ४४ जणांची फसवणूक केली आहे. दरम्यान, आयुक्त शैलजा दराडे यांनी त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्याशी काहीही संबंध नाही. परीक्षा परिषदेचा आयुक्त असल्याचा गैरफायदा घेऊन तो लोकांना नोकरी लावून देतो, असे सांगत आहे.
सोलापूर, सांगलीतील उमेदवारांची फसवणूक
फसवणूक झालेले बहुसंख्य उमेदवार सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील आहे. आरोपी दादासाहेब दराडे हा शिक्षक संघटनेचा पदाधिकारी आहे. त्याने इतर जिल्ह्यातही काम केले आहे. यामुळे त्याने तासगाव, आटपाडी, पंढरपूर, सांगोला आदी परिसरातील नागरिकांचीही फसवणूक झाल्याची शक्यता आहे.
जाहीर नोटीस
या प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर शैलेजा दराडे यांनी ऑगस्ट २०२० मध्ये जाहीर नोटीस दिली होती. त्यात दादासाहेब दराडे याच्यासोबत कोणीही कसलाही व्यवहार करु नये, तो भाऊ असल्याचा गैरफायदा घेऊन लोकांची कामे करुन देण्यासंदर्भात सांगत आहे, असे म्हटले होते. परंतु या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही भाऊ-बहिणीवर गुन्हा दाखल केला आहे.
रेट कार्ड
शैलजा दराडे यांनी फिर्यादी आणि इतरांना रेट कार्ड सांगितले होते. त्यानुसार फिर्यादीत दिलेली रक्कम
- टीईटी पास करणे – चार लाख
- बीएडसाठी -१५ लाख
- डिएडसाठी -१२ लाख