पुणे : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्या मृतांची ओळख पटवणेही अवघड झाले होते. त्यामुळे 25 पैकी 24 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या मृतांमध्ये सात जण पुणे शहरातील आहेत. त्यातील सहा जण दोन कुटुंबातील आहे. गंगावणे अन् वनकर कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू या अपघातात झाला. त्यात दोन वर्षांची मुलीचाही समावेश आहे.
पुणे येथील पिंपळे सौदागर येथील जरवरी सोसाटीतील राहणाऱ्या वनकर कुटुंबावर या अपघातात दु:खाचा डोंगर कोसळला. या अपघातात शोभा वनकर (वय ६०), वृषाली वनकर (वय ३८) आणि ओवी वनकर (वय २ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. या सोसायटीत परिणीत वनकर राहतात. बुलढाणा अपघातात त्यांची आई शोभा, पत्नी वृषाली आणि दोन वर्षांची मुलगी ओवी यांचा मृत्यू झाला. परिणीत एका खासगी कंपनीत नोकरी करतात. २०१४ पासून ते जरवरी सोसायटीमध्ये राहत आहे. दोन वर्षांपूर्वी परिणीत यांच्या वडीलांचे करोनामुळे निधन झाले होते.
पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील गंगावणे कुटुंबियांतील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. प्राध्यापक कैलास गंगावणे (वय 48 ), त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय 38) आणि मुलगी सई गंगावणे (वय 20) या तिघांचे निधन झाले. ते त्यांचा मुलगा आदित्यला नागपूरमधील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आले होते. मुलाचा प्रवेश घेतल्यानंतर त्याला सोडून तिघे बसने परत जात होते. त्यावेळी झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले. कैलास गंगावणे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहे. तर त्यांची मुलगी सई वैद्यकीय अभ्यासक्रमाला शिकत होती.
अपघातात मृत्यू झालेल्या राजश्री प्रकाश गांडोळे याही पुणे शहरातील रहिवाशी आहेत. त्यांच्या मुलास काही आवश्यक कागदपत्रांची गरज पडल्याने ते पती पत्नी गावी आर्वी येथे आले होते. पती प्रकाशराव गांडोळे यांना सोडून राजश्री एकट्याच पुणे येथे जात होत्या. अन् अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सात दिवसांपूर्वी राजश्री अन् प्रकाशराव यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. परंतु तो शेवटचा ठरला.
हे ही वाचा