कुणाचा ‘बाजार’ उठला? कुठे शिंदे गट -राष्ट्रवादी युतीची सत्ता, तर कुठे काँग्रेस-ठाकरे गटाचा विजय; कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल एका क्लिकवर

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल लागला आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये काहींनी आपली सत्ता राखली आहे. तर काही बाजार समित्यांमध्ये मातब्बर नेत्यांचा बाजार उठला आहे.

कुणाचा 'बाजार' उठला? कुठे शिंदे गट -राष्ट्रवादी युतीची सत्ता, तर कुठे काँग्रेस-ठाकरे गटाचा विजय; कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल एका क्लिकवर
maharashtra political partyImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 6:46 AM

पुणे : राज्यातील 147 बाजार समितीचे निकाल जाहीर झाले आहेत. अनेक ठिकाणी संमिश्र निकाल लागले आहेत. काही ठिकाणी शिंदे गट आणि राष्ट्रवादी युतीचा विजय झला आहे. तर कुठे भाजप आणि कुठे काँग्रेस-ठाकरे गटाचा विजय झाला आहे. काही ठिकाणी मंत्र्यांना सत्ता राखता आली आहे. तर काही भागात मातब्बर नेत्यांचा बाजारच उठला आहे. काही भागात धक्कादायक निकाल लागले आहेत. तर काही भागात अपेक्षित निकाल लागले आहेत. या निकालामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आपल्याच गटाच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समिती आल्याने कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला आहे. कोणत्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कुणाची सत्ता आली यावर टाकलेला हा प्रकाश….

संपूर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या घोटी बाजार समिती निवडणुकीचा निकाल समोर आला आहे . शेतकरी विकास पॅनलला बहुमत मिळाले आहे. 18 पैकी 16 जागा शेतकरी विकास पॅनलला मिळाल्या आहेत. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच ह्या निवडणूकीत प्रचंड प्रतिष्ठा पणाला लावली गेली आहे. या निवडणुकीत लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनल, स्व. रामभाऊ शिरसाठ प्रेरित शेतकरी परिवर्तन पॅनल, कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने प्रणित परिवर्तन पॅनल या तीन पॅनलसह विविध मातब्बर उमेदवारांचा सहभाग होता.

हे सुद्धा वाचा

निकालाची संपूर्ण इगतपुरी तालुक्याला उत्सुकता होती. राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष निकालाकडे लागून होते. मतदान पेटीनिहाय मोजणी करण्यात आली. विजयी उमेदवारांची नावे समजताच फटाके फोडून, घोषणा देत आणि गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक उपनिरीक्षक संजय कवडे, इगतपुरीचे उपनिरीक्षक राजाराम दिवटे आदींच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठया संख्येने गर्दी केली होती.

विजयी उमेदवार – लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनल

1. सोसायटी गट सर्वसाधारण – निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने 2. महिला राखीव – सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे 3. ओबीसी – राजाराम बाबुराव धोंगडे 4. व्हीजेएनटी – ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने व्यापारी गट – भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा हमाल गट – रमेश जाधव. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल – संपत किसन वाजे ग्रामपंचायत सर्वसाधारण – अर्जुन निवृत्ती भोर

विजयी उमेदवार – स्व. रामभाऊ शिरसाठ प्रेरित शेतकरी परिवर्तन पॅनल ग्रामपंचायत गट – दिलीप विष्णू चौधरी, ॲड. मारुती रामभाऊ आघाण

बुलढाणा बाजार समिती निकाल

एकूण 18 जागा

महाविकास आघाडी 12 जागांवर विजयी

शिंदे-भाजप युती 6 जागांवर विजयी

ठाकरे गटचे जालिंधर बुधवत यांनी पुन्हा फडकावला झेंडा, आमदार संजय गायकवाड यांना धक्का

वर्धा जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समितीत महविकास आघाडी

वर्धा, सिंदी, पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा प्रचंड पराभव

पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला खातही उघडता आलं नाही

सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला तीन जागा, अन्य बाजार समितीत भाजपचा दणकून पराभव

नाशिक कळवण बाजार समितीचा निकाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचे वर्चस्व

18 पैकी 15 जागांवर मिळविला विजय

माजी आमदार जे पी गावित यांनी पाठींबा दिलेल्या परिवर्तन पॅनल फक्त 3 जागावर समाधान मनावे लागले.

पुण्याच्या भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा

भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता

काँग्रेस विरुद्ध सर्व पक्ष एकत्र लढल्यानंतरही 18 पैकी 18 जागांवर काँग्रेस विजयी

काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंनी गड राखला

निवडणूकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष एकत्र लढूनही काँग्रेसचं वरचढ

फटाके फोडत, गुलाल उधळत कार्यकर्त्यांचा जल्लोष

आगामी निवडणूकांमध्येही काँग्रेसला असेचं यश मिळेल, आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीची बाजी

राष्ट्रवादी काँगेस विरुद्ध सर्व पक्षीय एकत्र येवून थेट लढत

राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी

तर सर्वपक्षीय आघाडीला 6 जागेवर समाधान

ठाकरे शिवसेना 3

भाजप 2

तर काँग्रेसला 1 जागा

व्यापारी मतदार संघातील 2 अपक्ष उमेदवार विजयी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटीलही विजयी

नाशिकच्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीवर लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

18 पैकी 16 जागेवर मिळवला विजय

शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या 2 जागांवर मानावे लागले समाधान

विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत साजरा केला जल्लोष

लातूर उच्चतम कृषी बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा काँग्रेसने जिंकल्या

भाजपाप्रणित पॅनलला एक ही जागा जिंकता आलेली नाही

गेल्या अनेक वर्षांपासून लातूर बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता

निकाला नंतर आमदार धिरज देशमुख यांनीही कार्यकर्त्यांसह जल्लोष केला

नगरच्या राहुरी बाजार समितीत आमदार प्राजक्त तनपुरेच

खा.सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांना तनपुरेंचा शह

राहुरी बाजार समितीत पुन्हा तनपूरेंचीच सत्ता

18 पैकी 16 जागा जिंकत तनपुरे गटाने मिळवला विजय

विखे आणि कर्डिले गटाचा केला पराभव

विखे पाटलांनी दिले होते तनपूरेंना आव्हान

तनपूरे गटाने केला विखे कर्डिले गटाचा पराभव

विस वर्षांपासून तनपूरे गटाची राहुरी बाजार समितीवर एकहाती सत्ता

विखे – कर्डीले गटाचे सोसायटी मतदारसंघातून दोन सदस्य आले निवडून

सोलापूरच्या मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 जागांपैकी 13 जागा बिनविरोध

पाच जागांची मतदानाची मतमोजणी शुक्रवारी रात्री उशिरा पूर्ण झाली

यानंतर अवताडे गटाच्या कार्यकर्त्याने गुलाल उडवत मोठा जल्लोष केला

आमदार अवताडे यांच्या विरोधात स्थानिक आघाड्यांचे आव्हान होते

मुरबाड बाजार समितीचा निकाल

1) हमाल व तोलाई बाजार समिती, जयराम देसले हे बिनविरोध –शिंदे गट (शिवसेना)

सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण 7 पैकी 7 शिंदे गटाचे विजयी

1)अशोक भगत 2) बाळकृष्ण चौधरी 3)धर्मा धलपे 4)अशोक फनाडे 5)दिपक खाटेघरे 6)गुरुनाथ झुंझारराव 7)सुनिल घागस

सेवा सर्वसाधारण महिला 2 पैकी 2 जागेवर शिंदे गट

1) विद्या धारवणे 2) भारती पष्टे

यवतमाळ बाजार समिती काँग्रेस-शिवसेना (उबाठा) युतीला 11 जागा

काँग्रेस-शिवसेना युतीने गड राखला

तर भाजपला 4 जागी मानावे लागले समाधान

पहिल्यादा बाजार समितीत भाजप ला 4 जागा

काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकरच्या नेतृत्वाखाली विजय

अमरावतीच्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल

आमदार यशोमती ठाकूर गटाचा दणदणीत विजय, सर्व 18 जागा जिंकल्या

तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि प्रहारचा धुव्वा

तिवसामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाचा जल्लोष

अमरावती चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल

आतापर्यंत पूर्ण 18 जागेचे निकाल हाती

18 पैकी 17 जागेवर माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या गटाचा विजय तर 1 जागेवर भाजपचा विजय

नाशिकच्या देवळा बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनलची सरशी

सोसायटी आणि ग्रामपंचायत गटाच्या सर्व जागांवर मिळविला विजय

यापूर्वी 8 जागा झाल्या होत्या बिनविरोध

आज झालेल्या 10 पैकी 7 जागांवर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी

विजय मिळताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

यवतमाळच्या पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री मनोहरराव नाईक आणि आमदार इंद्रनिल नाईक यांचे वर्चस्व

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोहर नाईक पॅनलचे सर्व 18 जागी उमेदवार विजयी

भाजपाला खातेही उघडता आले नाही, आमदार निलय नाईक यांना धक्का

यवतमाळच्या नेर बाजार समिती शिंदे गट राष्ट्रवादी युतीच्या ताब्यात

मंत्री संजय राठोड यांचे वर्चस्व

नेर बाजार समितीत 18 पैकी 10 जागी संजय राठोड यांचे संचालक विजयी

तर 8 जागा या काँग्रेस-शिवसेना (उबाठा ) युतीला

मुरबाड बाजार समीती निवणूक निकाल

17 जागे पैकी 17 जागेवर निकाल जाहीर

शिवसेना शिंदे गट –15

भाजप —-02

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.