कसबा पेठेत व्हिलचेअरवर बसून गिरीश बापट मैदानात, काय भाजपची सीट आहे धोक्यात?

केसरी वाड्यात गिरीश बापट बैठकीला हजर झाले. ही बैठक भावनिक झाली होती. व्हिलचेअरवर असलेल्या बापट यांनी छोटे भाषण केले. ते ऐकताना पदाधिकारी गंभीर झाले होते.

कसबा पेठेत व्हिलचेअरवर बसून गिरीश बापट मैदानात, काय भाजपची सीट आहे धोक्यात?
व्हिलचेअरवर बसून आलेले गिरीश बापट
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 8:39 AM

पुणे : पुण्यातील कसबा पेठ (Kasba) आणि पिंपरी चिंचवडची (Chinchwad) पोटनिवडणूक भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. त्यात पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत आपली जागा अडचणीत आल्याचे संकेत भाजपला मिळाले आहेत. यामुळे भाजपने अंथरुणाला खिळून असलेले खासदार गिरीश बापट यांना शेवटच्या टप्प्यात प्रचारात उतरवले. कसबा पेठेच्या जागेसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. बापट तब्बल सहा वेळा या मतदार संघातून आमदार झाले होते. त्यांचे वर्चस्व या मतदार संघावर आहे. यामुळे त्यांच्या भाषणा दरम्यान महिलांना अश्रू अनावर झाले.

केसरीवाड्यातील बैठकीत गिरीश बापट बुधवारी आले तेव्हा त्यांच्या नाकात ऑक्सिजनची नळी होती. व्हीलचेअरवर बसून त्यांना आणण्यात आले. यावेळी त्यांचे अंग थरथरत होते. यावेळी बोलताना खासदार बापट म्हणाले की, गेली तीन महिने प्रकृती बरी नसल्याने मी खूप कमी काम केलंय. मला आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिलाय. या निवडणुकीत मी वैयक्तिकरित्या मतदारसंघात फिरून प्रचार करू शकणार नाही.

हे सुद्धा वाचा

महिलांना अश्रू अनावर

केसरी वाड्यात गिरीश बापट बैठकीला हजर झाले. ही बैठक भावनिक झाली होती. व्हिलचेअरवर असलेल्या बापट यांनी छोटे भाषण केले. ते ऐकताना पदाधिकारी गंभीर झाले होते. गिरीश बापट यांचे भाषण सुरू असताना महिलांना अश्रू अनावर झाले.

काय आहे बापट यांचे महत्व

भाजपने टिळकांच्या कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे कसबा पेठेत ब्राह्मण समाजात तीव्र नाराजी आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी गिरीश बापट यांची भेट घेतली. त्यानंतर गिरीश बापट मैदानात उतरले. बापट यांनी आतापर्यंत सहा वेळा या मतदार संघातून निवडून आले आहे. यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे.

प्रतिष्ठेची लढाई

पुण्यात कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीची लढाई आता प्रतिष्ठेची बनली आहे. महाविकास आघाडीकडून कसब्याच्या जागेवर काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलाय. तर भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आलीय. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी टिळक कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे कसब्यातील राजकीय घडामोडी चर्चेत आल्या होत्या. आता गिरीश बापट मैदानात उतरल्याचा फायदा भाजपला किती होणार हे मतमोजणीला स्पष्ट होणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.