1 गौतमी, 17 राडे, पुन्हा कल्ला, तरुणाईनं कार्यक्रमच नव्हे खुर्च्याही डोक्यावर घेतल्या, पोलिसांची भंबेरी

| Updated on: Apr 17, 2023 | 6:20 PM

सबसे कातील गौतमी पाटील हे महाराष्ट्रात कुणी ऐकले नसेल असा एखादा नेटकरी शोधून सापडणार नाही. त्याचे कारण म्हणजे गौतमी पाटीलची दिवसेंदिवस क्रेझ वाढत चालली आहे.

1 गौतमी, 17 राडे, पुन्हा कल्ला, तरुणाईनं कार्यक्रमच नव्हे खुर्च्याही डोक्यावर घेतल्या, पोलिसांची भंबेरी
Image Credit source: TV9 Network
Follow us on

पुणे : एक गौतमी अन् सतरा राडे हे जणू काही समिकरणचं बनले आहे. जिथं गौतमी पाटीलचा कार्यक्रम तिथे तरुणाईचा राडा झाल्याशिवाय राहत नाही. सबसे कातील म्हंटलं तर आपसूकच गौतमी पाटील असं नाव आल्याशिवाय राहत नाही. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी पाहायला मिळत असते. गौतमी पाटील हीचे कार्यक्रम अनेकदा गोंधळामुळे बंद करावे लागतात अशी स्थिति अनेकदा निर्माण झाली आहे. अगदी तशीच स्थिती पुण्याच्या वेल्हा येथे पाहायला मिळाली. रविवारी झालेल्या कार्यक्रमात पुन्हा राडा पाहायला मिळाला आहे. तरुणाई आवरण्यात पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली आहे.

पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील विंझर गावात, मनसे जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तसेच खाजगी बॉडीगार्ड यांचेही नियोजन होते.

तरी देखील गौतमी पाटील चा कार्यक्रम म्हंटल्यावर आजकालची तरुणाई कोठे ऐकनारी, गौतमीचा कार्यक्रम आणि धिंगाणा हे तर ठरलेलेच. तरुणाईने गौतमीचा नादात खुर्च्याच डोक्यावर घेऊन देखील नाचायला सुरवात केली होती.

हे सुद्धा वाचा

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पाहून तरुणाईचा तो धिंगाणा आवरण्यात वेल्हा पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली होती. या तरुणाईला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठचार्ज देखील करावा लागला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने कार्यक्रम आवरता घ्यावा लागला होता.

पाटलांचा बैलगाडा, चंद्रा, पावणं जेवला काय ? अशा विविध गाण्यावर गौतमी पाटीलचा डान्स सुरू झाल्यावर तरुणाईने देखील ठेका धरला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणाईचा धिंगाणा पाहायला मिळाला. त्यामुळे नेहमीप्रमाणे गौतमीचा डान्स आणि कार्यक्रमात ठेका हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

रविवारी पुण्यातील वेल्हा येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम होणार असल्याने हजारो तरुण उपस्थित होते. गौतमी पाटील हिची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे तरुणाईची मोठी गर्दी असते. पण या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला देखील सहभागी झालेल्या होत्या. त्यांच्यात जावून हातमिळवत गौतमी पाटील हिने ठेका धरला होता.

महिला वर्गात देखील गौतमी पाटील हिची क्रेझ आहे. गौतमी पाटीलच्या रील्स डान्सवर अनेक जण डान्स करत असतात. ते सोशल मिडियावर व्हायरल करत असतात. त्यामुळे गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्रातील सोशल मीडिया वापरणाऱ्या व्यक्तीला माहीत नसेल असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. त्यामुळे गौतमी पाटीलचा डान्स,  कल्ला आणि पोलिसांचा लाठीचार्ज हे तर नेहमीचेच झाले आहे.