Maha Vikas Aghadi Morcha Today Live : ‘मविआचा महामोर्चा नसून नॅनो मोर्चा’, देवेंद्र फडणवीस यांची टीका
Maha Vikas Aghadi Morcha Today Live Updates : महाविकास आघाडीचा महामोर्चा, जाणून घ्या मोर्चाची ताजी अपडेट
मुंबई: महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापासून निघाला असून त्याची सांगता आझाद मैदानात होणार आहे. तर या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपे माफी मांगो आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता आहे. या मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
सांगलीच्या एसटी स्टँडमध्ये बीड येथील ऊसतोड मजुरांचा चक्काजाम
सांगली :
सांगलीच्या एसटी स्टँडमध्ये बीड येथील ऊसतोड मजुरांचा चक्काजाम
बीड जिल्ह्यात जाण्यासाठी बससेवा उपलब्ध नसल्याने संतप्त ऊस तोडणी मजुरांनी केली एसटी रोको
रविवारी ग्रामपंचायत मतदानासाठी अडीचशेहुन अधिक ऊसतोड मजूर जाण्यासाठी सायंकाळी 5 वाजल्यापासून एसटी बस स्थानकात थांबले आहेत ताटकळत
संतप्त झालेल्या ऊसतोड मजुरांनी बस स्थानकातील एसटी धरल्या रोखून
बीड जिल्ह्यात मतदानासाठी जाण्याकरता एसटी उपलब्ध करून देण्याची मागणी
-
बारामती शहर आणि परिसरात अज्ञात गुंडांची दहशत
बारामती :
– बारामती शहर आणि परिसरात अज्ञात गुंडांची दहशत
– शहरासह एमआयडीसीत तीन ते चार ठिकाणी कोयता आणि तलवारीचा धाक दाखवत तोडफोड
– टिसी कॉलेज परिसरातील दुकानेही फोडली
– एमआयडीसीतही तोडफोडीचस प्रकार
– पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
-
-
मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकीची धमकी
पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकीची धमकी,
राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोलेंकडून धमकी,
विकास लोलेंच्या विरोधात पिंपरीच्या सांगावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
आज पुन्हा शाईफेकीची उधळण होणार, विकास लोलेंची फेसबूक पोस्ट.
-
वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीतील समावेश लांबला
नाशिक : महाविकास आघाडीत घ्यायला कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध,
महाविकास आघाडीत घ्यायचे कि नाही हे उद्धव ठाकरे यांनी ठरवायचे आहे,
महाविकास आघाडीत सहभाग नसल्याने आजच्या मोर्चात सहभागी झालो नाहीत,
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका केली स्पष्ट.
-
उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले सभास्थळी दाखल
महाविकास आघाडीचे नेते आझाद मैदानात दाखल
नेत्यांची भाषणं सुरू, शरद पवार थोड्याच वेळात मोर्च्याच्या ठिकाणी हजर होणार
-
-
अशोक चव्हाण यांची महामोर्चाला दांडी, म्हणाले…
महाविकास आघाडीच्या महामोर्चाला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची अनुपस्थिती
मोर्चा असतानाही अशोक चव्हाण नांदेडमध्येच
निकटवर्तीयांच्या लग्न सोहळ्यामुळे महामोर्चाला जाता आलं नाही, अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण
महामोर्चाला पाठिंबा असल्याचं चव्हाण म्हणाले
मात्र, चव्हाणांकडून अधिक बोलण्यास नकार
-
कोल्हापूर: बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
कोल्हापूरच्या शिवाजी चौकात भारतीय जनता पार्टीच आंदोलन
बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा कोल्हापुरात भाजपकडून निषेध
बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी
-
भाजपाकडून अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलन
अमरावती : पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री याच्या विरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी तीव्र,
यावेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याच पोस्टरवर जोडे-चपला मारून निषेध,
पाकिस्तानचे पोस्टर आणि झेंडा जाळून पाकिस्तान विरोधी दिल्या घोषणा.
-
सेनेचे शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना
अँटॉप हिल इथल्या शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेचे हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाले
सगळ्या कार्यकर्त्यांनी भगवा परिधान करून मोर्चामध्ये घेतला सहभाग
5 बसेस भरून सेनेचे शेकडो कार्यकर्ते रवाना
-
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांविरोधात शिर्डीत आंदोलन…
नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध
फोटोला पायाखाली तुडवत केले दहन
मोदी जिंदाबादच्या तर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांचा निषेध
शिर्डी नगरपालिकेसमोर आंदोलन
-
महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांचा सत्ताधारी नेत्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर मोठा बंदोबस्त
भाजपच्या आमदारांच्या तसेच शिंदे गटातील आमदारांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त
कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांकडून खबरदारी
-
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महामोर्चासाठी लोकलने प्रवास करणार
नवी मुंबईतील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महामोर्चासाठी लोकलने प्रवास करणार
राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेदेखील या कार्यकर्त्यांसोबत आहेत
काही वेळात वाशीहून लोकल पकडून मुंबईच्या दिशेने रवाना होतील
-
मुंबई येथे महामोर्चाला ठाण्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा
मुंबई येथील महामोर्चाला ठाण्यातुन मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कार्यकर्ते बसने मुंबईकडे रवाना
ठाण्यातील आनंदनगर टोल नाका येथे मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कार्यकर्ते दाखल
राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्ते मुंबईला रवाना
-
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या विरोधात पुण्यात भाजपचं आंदोलन
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बीलावल भुट्टो यांनी UNSCमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलं होतं वादग्रस्त विधान
याच विधानाचे विरोधात पुण्यातील भाजप आक्रमक होत आंदोलन करत आहे
आंदोलनाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार
-
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा हल्लाबोल
मुंबई : या बहिऱ्या सरकारला आजच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल
शरद पवार आजच्या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे
मुंबईतील महामोर्चात सहभागी होण्यासाठी शरद पवार यांनीच आवाहन केलंय
-
राज्यातून अनेक ठिकाणाहून कार्यकर्ते मोर्चासाठी निघण्यास सुरुवात
महाविकास आघाडीने मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे
ठाणे, नवी मुंबई, पालघर, कर्जत, कसाऱ्याहून कार्यकर्त्यांची मुंबईकडे कूच
वाशी टोल नाक्यावरून अनेक गाड्या मुंबईच्या दिशेने निघाल्या
-
मुंबईत महाविकास आघाडीचा मोर्चा, अनेक ठिकाणाहून कार्यकर्ते येण्यास सुरुवात
मुंबईत महाविकास आघाडीचा मोर्चा,
अनेक ठिकाणाहून कार्यकर्ते येण्यास सुरुवात
मुंबईमध्ये होणाऱ्या मोर्चासाठी विविध ठिकाणाहून मुंबईकडे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रवाना
वाशी टोल नाक्यावरून अनेक गाड्या मुंबईच्या दिशेने निघाल्या
थोड्याच वेळात मोर्चात सहभागी होणार
-
आनंद दिघे यांचा फोटो नसल्यानं शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टीका…
आनंद दिघे यांचा कल्याणच्या उद्धव ठाकरे गटाला विसर पडला ?
कल्याण मधील शिवसेनेच्या बॅनरवर स्व.आनंद दिघे यांचा फोटो नसल्याने चर्चा होऊ लागलीये
आनंद दिघे यांचा फोटो नसल्यानं शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टीका…
शिंदेगटाचे राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका
-
महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना
नाशिक : महाविकास आघाडीचे दिशेने कार्यकर्ते कारने, रेल्वेने मुंबईकडे रवाना होत आहे.
राज्यातल्या अस्थिरतेचा विषयी सरकारला धरणार धारेवर, कार्यकर्त्यांची भूमिका
हल्ला बोल.. हल्ला बोल… महाराष्ट्र सरकारवर हल्ला बोल.. अशा घोषणा देत राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक
-
एकच उद्दीष्टं अखंड महाराष्ट्र, मुंबई काँग्रेसनं लावले बॅनर
कर्नाटक महाराष्ट्र सीमावादानंतर काँग्रेसचे बॅनर
अखंड महाराष्ट्राचा मुद्दा केला उपस्थित
मोर्चात असणाऱ्या वाहनांवर लावले बॅनर
-
महामोर्चाला मुंबई पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त
मुंबई : मुंबईसह परिसरात आज अडीच हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात
मोबाईल सर्व्हीस व्हँनच्या माध्यमातून मोर्चावर ठेवलं जाणार लक्ष
महामोर्चासाठी 350 पोलीस अधिकारी करणार नियंत्रण,
ठिकठिकाणी पोलीस वाहनंही लावण्यात आलीत
-
हिंदुत्ववादी संघटनांनी ठाणे बंदची हाक दिल्यानंतर ठाण्यातील परिवहन सेवा आज बंद
आज सकाळपासून एकही बस रस्त्यावरून धावली नाही
सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुकारलाय ठाणे बंद
या बंदच्या पार्श्वभूमीवर अचानक परिवहन सेवेने बंद केल्यामुळे प्रवाश्यांचे हाल
या बंदला बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप चा पाठिंबा
-
महाविकास आघाडीच्या महामोर्चात पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार
मोर्चात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईला येणार
पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथून एकत्र जमत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते थोड्याच वेळात मुंबईसाठी निघणार
-
जिथून मोर्चा निघणार तिथेच सुषमा अंधारे यांच्या विरोधात बॅनरबाजी
भायखळा आणि नागपाडा परिसरात सुषमा अंधारे यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आलीय
मराठा युवा सेनेकडून बॅनरबाजी
सुषमा अंधारे यांची जुने वक्तव्य बॅनर्सवर लिहिली
-
महामोर्चासाठी महाविकास आघाडीचे खास टीशर्ट
महाविकास आघाडीचा महामोर्चा , हल्लाबोल असं टीशर्ट वर लिहिण्यात आलं आहे
गिरगावमध्ये शिवसेनेकडून खास टीशर्ट तयार करण्यात आलंय
मोर्चाची सर्व भागात जोरदार तयारी केली जात आहे
-
नाशिकवरून राष्ट्रवादीचे शेकडो पदाधिकारी महामोर्चासाठी मुंबईच्या दिशेने निघाले
छगन भुजबळ यांच्या सोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात होणार सहभागी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 200 गाड्यांचा ताफा मुंबईकडे निघाला
झेंडे फडकावत आणि घोषणाबाजी करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निघाले
-
महामोर्चाला दोन लाख लोक येणार, महाविकास आघाडीचा दावा
सकाळी 9 वाजता महामोर्चाला सुरुवात होणार
भायखळा येथील रिचर्डसन अॅण्ड क्रूडास कंपनीत मोर्चेकरी जमतील
त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघेल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर या मोर्चाची सांगता होईल
तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली
-
महामोर्चाला दीपक निकाळजे यांचा पाठिंबा
कुख्यात डॉन छोटा राजनचा भाऊ रिपाइं (ए)चे नेते दीपक निकाळजे यांचा महामोर्चाला पाठिंबा
दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वात रिपाइंचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होणार
महापुरुषांचा वारंवार होणारा अपमान सहन करण्यासारखा नाही. त्यामुळे मोर्चात सहभागी होणार, दीपक निकाळजे यांची भूमिका
आंबेडकरी जनतेला मोर्चात सहभागी होण्याचं दीपक निकाळजे यांचं आवाहन
Published On - Dec 17,2022 6:36 AM