कोकळी गावात हजारो दम्याचे रुग्ण, मृग नक्षत्रानंतर सुरू होते औषधांसाठी धावपळ, रुग्णांना फायदा पण…

ही औषध मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशीपासून पाच दिवसापर्यंत दिली जाते. या मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील आणि छत्तीसगड- मध्यप्रदेश येथील रुग्ण मोठ्या संख्येत येथे दाखल होतात.

कोकळी गावात हजारो दम्याचे रुग्ण, मृग नक्षत्रानंतर सुरू होते औषधांसाठी धावपळ, रुग्णांना फायदा पण...
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 2:52 PM

मोहम्मद इरफान, प्रतिनिधी, गडचिरोली : कोकळी गावात वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या मृग नक्षत्र दमा औषधी मेळावाचे उद्घाटन नाना पटोले यांच्या उपस्थितीत पार पडले. हजारोच्या संख्येने दमा औषधी घेण्यासाठी दरवर्षी रुग्ण कोकळी गावात दाखल होतात. अनेक रुग्ण ही दमा औषधी घेऊन बरे झाल्याचेही दिसून आले. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) तालुका अंतर्गत कोकळी एक छोटासा गाव आहे. या गावात वैद्यराज प्रल्हाद कावळे हे जवळपास पंधरा वर्षापासून दमा रुग्णांवर ना औषधोपचार करतात.

ही औषध मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशीपासून पाच दिवसापर्यंत दिली जाते. या मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील आणि छत्तीसगड- मध्यप्रदेश येथील रुग्ण मोठ्या संख्येत येथे दाखल होतात. लहानश्या मच्छ्यांमध्ये ही दमाची औषध टाकून रुग्णांना दिली जाते. रुग्ण औषध घेण्यासाठी लांब लांब रांगा लावू नये यासाठी औषध वैद्यराज यांच्याकडून काळजी घेतली जाते.

हे सुद्धा वाचा

रुग्णांचा आजार बरा होतो

दरवर्षी होणाऱ्या या मेळाव्याचे माहिती काढली. तेव्हा अनेक रुग्णांनी सांगितले की या औषधीमुळे आमचा दमा आजार पूर्णपणे कमी झाला. परंतु या औषधीला मेडिकल बोर्ड ऑफ महाराष्ट्र किंवा मेडिकल बोर्ड ऑफ सेंट्रल अनुमती देत नाही, असे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे होते.

मेळाव्यासाठी गावकऱ्यांची मदत

कोकळी गावातील नागरिकही या मेळाव्यासाठी भरभरून मदत करतात. हा मेळाव्याचे आयोजन कोकळी गावात एक चांगल्या स्वरूपात केले जाते. यावेळी या मेळाव्याचे शुभारंभ काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते झाले. काँग्रेस पक्षाचे विदर्भातील पदाधिकारी आणि गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

नानाभाऊ पटोले यांनी भंडारा-गोंदिया दोन जिल्ह्यातील दौरा करून काल सायंकाळच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील कोकळी येथे दाखल झाले. रात्री अकरा वाजता नागपूरकडे नाना पटोले यांचा ताफा रवाना झाला. सध्या लोकसभा निवडणूक पुढे असून नाना पटोले यांच्या दौऱ्याकडे राजकीय लक्ष लागले होते. परंतु राजकीय कोणतेही प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली नाही.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.