यवतमाळ : सुरेश कवडे आणि परवीन थिटे हे दोघे बसले होते. खंडू गुळवे हा त्याठिकाणी आला. सुरेशला उधारी पैसे मागू लागला. पैसे कशाला मागतो. माझ्याकडे पैसे नाहीत, असं सुरेश कवडे याने म्हटले. याचा खंडू गुळवे याला राग आला. त्याने सुरेशवर चाकूने वार केला. याता सुरेशचा मृत्यू झाला. शिवाय सुरेश सोबत असलेल्या प्रवीण थिटे याच्या डोक्यावर वार केले. या घटनेत प्रवीणसुद्धा जखमी झाला. ही घटना पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
धनसळ येथील सकाळची वेळ. ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश कवडे (वय ३० वर्षे) आणि परवीन सात्विक थिटे (वय २५ वर्षे) हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसले होते. खंडू लक्ष्मण गुळवे हा त्याठिकाणी आला. खंडूने सुरेशला उसणे पैसे मागितले. यावरून खंडू आणि सुरेश यांच्यात वाद झाला. यात खंडूने सुरेशवर चाकूहल्ला केला. यात सुरेशचा मृत्यू झाला. याची तक्रार सुरेशच्या पत्नी शिल्पा यांनी पुसद ग्रामीण पोलिसांत तक्रार केली. पुसद पोलिसांनी खंडू गुळवेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात नागपुरात हॉटेल मालकाने उधारीचे पैसे मागितले म्हणून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गणेशपेठ परिसरातील या घटनेत हॉटेलमालक गंभीर जखमी झाला. हॉटेल मालक आणि त्याच्या हॉटेलमध्ये आरोपी ललित अग्निहोत्री हा नियमित यायचा. ललित आणि हॉटेल मालक ऐकमेकांना ओळखत होते. ललित हा हॉटेलमध्ये येऊन नियमित जेवण करायचा.
कधी पैसे द्यायचा तर कधी पैसे देत नव्हता. ललित मोठेपणा दाखवत दादागिरी करायचा. मात्र उधारी वाढत असल्याने हॉटेल चालकाने त्याला पैशाची मागणी केली. ललितने हॉटेल मालकाला धमकी देत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात हॉटेल मालक गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत आरोपीला अटक केली. अशी माहिती गणेशपूरचे पोलीस निरीक्षक कृषिकेश घाडगे यांनी दिली.