‘एकही अपशब्द वापरला असेल तर सिद्ध करा’, संजय शिरसाट यांचं सुषमा अंधारे यांना चॅलेंज

"संजय शिरसाट म्हणतात मला, मी डबल गेम करणारा माणूस नाही. मी तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन. मला सत्ता महत्त्वाची नाहीय. पण तुम्हाला अधिकार कुणी दिला?", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

'एकही अपशब्द वापरला असेल तर सिद्ध करा', संजय शिरसाट यांचं सुषमा अंधारे यांना चॅलेंज
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 6:07 PM

मुंबई : शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat ) यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर सडकून टीका केली. “कुणालाही माझा भाऊ म्हणायचं आणि त्याच्याबद्दल जे काही वाईट बोलायचं ते बोलायचं. भाऊ बोललं की माफी आहे. अब्दुल सत्तार असतील किंवा भुमरे असतील, त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या सभा होत्या तर मी सहज विचारलं की काय लफडं आहे? तुम्ही काही घोटाळा वगैरे केला का? अशा अर्थाने तो शब्द वापरला”, असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिलं.

“दुसरं माझं एक वक्तव्य होतं. सुभेधारी गेस्ट हाऊसमध्ये त्या सभेसाठी आल्या होत्या. सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री सारखे अनेक दिग्गज नेते राहिले. राष्ट्रपती राहिले आहेत. शरद पवार हजारवेळा राहिले असतील. माजी मुख्यमंत्री सु्द्धा त्या गेस्ट हाऊसमध्ये राहिले. पण त्यांना ते सभागृहामध्ये अडचणीचं वाटत होतं. त्यांनी मातोश्रीवर फोन केला. त्या वाहिनीने चेंज करुन दिला इथपर्यंत विषय सिमित होता. पण एखाद्या गोष्टीला हवा द्यायची तर कितपत द्यायची?”, असा सवाल शिरसाट यांनी केला.

‘…तर, तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन’

“सुषमा अंधारेंचा अपमान केला. याच्यात अपमानाचं कुठे आलं तर कळलं नाही. तुमच्या चॅनलवर सुद्धा माझा व्हिडीओ फिरतोय. तो मी काढलेला नाही तर तुम्ही काढलेला आहे. त्या व्हिडीओत मी एकही अश्लिल शब्द वापरलाय असं सिद्ध करुन दाखवलं तर मी तातडीने संजय शिरसाट म्हणतात मला, मी डबल गेम करणारा माणूस नाही. मी तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन. मला सत्ता महत्त्वाची नाहीय. पण तुम्हाला अधिकार कुणी दिला?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“गुलाबराव पाटील यांच्याकडे जाणार त्यांना शिव्या देणार. अब्दुल सत्तार यांच्याकडे जाणार त्यांना शिव्या देणार, भुमरेंकडे जाणार आणि त्यांना शिव्या देणार. उदय सामंत, शहाजी भोसले यांना शिव्या, तुला हे कॉन्ट्रॅक्ट दिलंय कुणी? महिला म्हणून आम्ही कुणी बोललोच नाहीत तर त्याचा तुम्ही बाहु केला आणि असं सांगितलं की सर्व महिलांवर अन्याय झाला. यांची पार्श्वभूमीवर पाहिलं तर त्या काय-काय बोलल्या याची तुमच्याकडेही रेकॉर्डिंग आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.

“हिंदू देवता, मराठा समाज, बाळासाहेब ठाकरे, उद्धव साहेब आणि आदित्य ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल काय बोलल्या? तुम्हाला असा अधिकार दिला कुणी? अशावेळी एखाद्याला राग आला आणि एखाद्याने वक्तव्य केलं तर सर्व महिलांचा अपमान झाला असं बोंबलायचं. मी आता क्यांची प्रेस कॉन्फरन्स बघूनच आलोय. एखाद्याचा अपमान झाल्यानंतर संतापाची भावना असते पण त्या हसत होत्या. त्यांच्यासारख्या अभिनेत्री कुणी नाही”, असा टोला त्यांनी लगावला.

“सुषमा अंधारे यांनी एक चांगलं केलं. मला प्रेस कॉन्फरन्समध्ये करोडपती करुन टाकलं. 72 कोटी रुपये माझ्याकडे आले आहेत. आरोप करताना थोडी तरी ठेवा. सकाळपासून अनेक लोकांचे व्हिडीओ माझ्याकडे आले आहेत. कुठे काय बोलल्या. काही आपल्या अंगलट आलं की रडायचं. ही सगळी नाटकं लोकांना कळतात. दरवेळेला आपलं स्टेमेंट बदलणं हा तुमचा व्यवसाय झालेला आहे”, असा घणाघात शिरसाट यांनी केला.

‘खपवून घेणार नाही, आमदारकी गेली उडत’

“माझ्या इथे आजही काही निदर्शने झाली. किती महिल्या होत्या तर दहा महिला होत्या. दोन-चार माणसं होती. राजकारण समोरासमोर झालं पाहिजे. पदराआड गोळ्या झाडताय. पण हे चालणार नाही. मी तरी खपवून घेणार नाही. तुमच्या कर्त्याधर्त्यांनाही सांगून ठेवतो. संजय शिरसाट हा पोटासाठी राजकारण करणारा नाही. तुम्हाला लढायचं असेल तर समोरासमोर लढा. याद राखा माझ्या विरोधात बोलायचा प्रयत्न केला तर त्याला मी त्याच भाषेत उत्तर देईन. मागे हटणार नाही. आमदारकी उडत गेली. माझा जन्म त्यासाठी झालेला नाही”, असं शिरसाट म्हणाले.

‘मग मी समुद्राच्या खोलात जाईन’

“जर या बाईला घेवून पक्ष मोठा होणार असेल तर तर तुम्ही दहीहंडी खेळत बसा. मी कुणाच्या वैयक्तीक गोष्टीत जात नाही. मात्र परळीत कुणाची धिंड काढली होती? मला जास्त बोलायला लावू नका. मग मी समुद्राच्या खोलात जाईन”, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला. “एकदा चौकशी कराच फ्लॅटची, मुंबईतील करोडो फ्लॅटपैकी मी एक फ्लॅट नाही घेवू शकत का? जर त्यात खोटं काही निघाले तर मग तुम्ही आहे आणि मी आहे. मग मी तोंडाने बोलणार नाही. आमच्याबद्दल बोलता तेव्हा आमच्या कुटुंबाला काही वाटत नसेल का? मी कधीही कुणाची माफी मागणार नाही”, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.