Mega Block : मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर पाच तास मेगा ब्लॉक, कोयना एक्स्प्रेस रद्द

मध्य रेल्वेकडून (Central Railway) पुन्हा एकदा मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. आज रेल्वेकडून विविध कामांसाठी मेगा ब्लॉग जाहीर करण्यात आला आहे.

Mega Block : मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर पाच तास मेगा ब्लॉक, कोयना एक्स्प्रेस रद्द
Mumbai local
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 6:52 AM

मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) पुन्हा एकदा मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. आज रेल्वेकडून विविध कामांसाठी मेगा ब्लॉग जाहीर करण्यात आला आहे. या कामांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विद्याविहार अप आणि धिम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक तब्बल 5 तासांचा असणार आहे. या दरम्यान बेलापूर खारकोपर दरम्यानची सेवा सुरु राहणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरला जाणारी कोयना एक्स्प्रेस (Koyna Express) देखील रद्द करण्यात आली आहे. हा मेगाब्लॉक रविवार म्हणजेच आज पाच तासांसाठी सुरु राहील. मध्य रेल्वेच्या मार्गावर सकाळी 10.55 वाजेपासून दुपारी 3.55 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर, हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते 4.05 ब्लॉक राहील. दरम्यान या मेगा ब्लॉकदरम्यान या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून, प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेचे ट्विट

कुठे आणि कसा असेल ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -विद्याविहार अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत आणि पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 04.05 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक कार्यान्वित केला जाईल असे घोषित करण्यात आले होते.

या सेवा सुरु राहणार

मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय ट्रेन वेळापत्रकानुसार चालविण्यात येतील. तर, बेलापूर- खारकोपर या स्थानकांदरम्यानची सेवा सुरु राहणार आहे. तर, नेरुळ-खारकोपर सेवा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून करण्यात दिली आहे.

कोयना एक्स्प्रेस रद्द

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधून कोल्हापूरला जाणारी कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं ट्विट द्वारे दिली आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

30 January 2022 Panchang | 30 जानेवारी 2022, रविवारचे पंचांग, ​जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Masik Shivratri 2022 | प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री एकाच दिवशी, या संयोगात पूजा केल्यास आयुष्य बदलून जाईल

Central Railway take Mega Block on central railway and harbour line Koyna Express also cancelled

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.