Ashish Shelar : 25 वर्षात कंत्राटदारांना पोसण्याचं काम शिवसेनेनं केलं, आशिष शेलार यांचा घणाघाती आरोप

मुंबई शहरामध्ये दिरंगाई आणि घोळ यापासून शिवसेनेचे नेते स्वतःचे हात बाजूला ठेवू शकत नाही, निकृष्ट दर्जाचे कोस्टल रोडवरचे काम असो वा मेट्रो तीनच्या माध्यमातून केलेला अहंकार, यातून मुंबईकरांच्या डोक्यावर जो भुर्दंड त्या ठिकाणी टाकला आहे, ते पाप शिवसेनेच्या माथ्यावरच आहे, असेही ते म्हणालेत. 

Ashish Shelar : 25 वर्षात कंत्राटदारांना पोसण्याचं काम शिवसेनेनं केलं, आशिष शेलार यांचा घणाघाती आरोप
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 6:07 PM

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हे आज दुसऱ्यांदा मुंबईच्या भाजपाध्यक्षपदी निवडले गेले आहेत. मुंबईच्या अध्यक्षपदी (BJP Mumbai President) निवड होताच त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. गेल्या तीन दशकात शिवसेनेकडून केवळ कंत्राटदारांना पोसण्याचं काम केलं गेलंय, अशा घणाघाती आरोप त्यांनी केलाय. तर आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election 2022) ही आम्हीच जिंकू असा विश्वासही व्यक्त केल्या. मुंबई शहरामध्ये दिरंगाई आणि घोळ यापासून शिवसेनेचे नेते स्वतःचे हात बाजूला ठेवू शकत नाही, निकृष्ट दर्जाचे कोस्टल रोडवरचे काम असो वा मेट्रो तीनच्या माध्यमातून केलेला अहंकार, यातून मुंबईकरांच्या डोक्यावर जो भुर्दंड त्या ठिकाणी टाकला आहे, ते पाप शिवसेनेच्या माथ्यावरच आहे, असेही ते म्हणालेत.

ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करू

त्यातून ते फळ काढू शकत नाही, शाळेतील संगणक खरेदी पासून सगळ्या विषयांवर महापालिकेतील आमचे सगळे सहकारी नेते अतिशय प्रामाणिकपणे काम करतात, मी मुंबईकरांना विश्वास देऊ इच्छितो, जे गेल्या 25 वर्षात तुमच्या मनामध्ये होतं, जे चित्र 25 वर्षात गेल्या तुमच्या डोक्यात तुम्ही रंगवलं होता ते तुमच्या मनातलं आणि तुमच्या डोक्यातलं चित्र संपूर्णपणे साकारण्याचे काम हे भारतीय जनता पार्टी करेल, आम्हाला मुंबईकरांचेही आशीर्वाद यासाठी नक्कीच मिळेल आणि म्हणून आमचं ठरलं आहे, भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धवजींच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करायचं आहे आणि मुंबईकरांच्या मनातील स्वप्नातील डोक्यातील विकासाचे मुंबईचं चित्र रंगवून, त्या मुंबईकरांना सुपूर्त करायचे आहे, आजच्या प्रसंगी एवढेच म्हणेन अशी प्रतिक्रिया या पत्रकार परिषदेत शेलारांनी दिलीय.

महापालिका जिंकण्याची जबाबदारी आशिष शेलारांवर

काही दिवसातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पुन्हा मुंबईचे अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. गेल्यावेळी ही आशिष शेलार हेच मुंबईचे भाजपाध्यक्ष असताना महानगरपालिकेचे निवडणूक पार पडली होती. त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि तेच लक्षात ठेवून यावेळी ही महानगरपालिकेसाठी भाजपने तसाच प्लॅन आखला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेतून खाली उतरवण्यासाठी भाजपने चांगली तयारी केली आहे, त्यातच शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीचा भाजपला फायदा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यावेळच्या मुंबई महापालिका निवडणुकीला आणखी रंग आला आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.