बँकेच्या बाहेरील पाहून नोटबंदीची आठवण, नागरिक का लावताय पहाटेपासूनच रांगा, कारण काय?
बँक उघडल्यावर तर अक्षरशः ग्राहकांची गर्दी उसळते. त्यामध्ये बँक व्यवस्थापक अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देत आहे. मात्र रोजच्या त्रासामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे.
मुक्ताईनगर, जळगाव : संपूर्ण देशामध्ये नोटबंदी झाल्यानंतर बँकेच्या बाहेर आणि एटीएम च्या बाहेर अक्षरशः रांगा लागत होत्या. थंडीत, उन्हात लोकं रांगेत उभे राहून बँकेतून पैसे काढण्यासाठी धडपड करत होते. त्यात अनेकांचा मृत्यूही झाला होता. संपूर्ण देशभरामध्ये नोटबंदी नंतर व्यावसायिक अक्षरशः देशोधडीला लागले होते. एटीएम मधून दोनच हजार रुपये मिळत असल्याने लोक दिवस रात्र काम धंदा सोडून बँकेच्या बाहेर राग लावून उभे होते. अनेकांच्या घरात विवाह किंवा इतरत्र कार्यक्रमांच्या साठी लागणारा पैसा देखील उपलब्ध नसल्याने नागरिकांचा अक्षरशः संताप होत होता. अशीच काहीशी परिस्थिती मुक्ताईनगर येथे निर्माण झाली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा काकोडा येथील सेंट्रल बँक शाखेच्या समोर सलग आठवड्यापासून ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. बँक उघडण्या अगोदरच नागरिकांची रांग दिसत आहे. सकाळीच नागरिक अंघोळ करून बँकेच्या बाहेर उभेर राहत आहे.
बँक उघडल्यावर तर अक्षरशः ग्राहकांची गर्दी उसळते. त्यामध्ये बँक व्यवस्थापक अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देत आहे. मात्र रोजच्या त्रासामुळे नागरिकांना मनस्ताप होत असून नागरिकांना अक्षरशः नोटबंदीची आठवण होत आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. नागरिकांनी अक्षरशः एटीएम आणि बँकेच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी नागरिक गर्दी करत होते. अगदी तशीच गर्दी मुक्ताईनगर येथे पाहायला मिळत आहे.
जवळपास आठवडा उलटून गेलेला असतानाही बँकेची परिस्थिती पूर्वपदावर येत नसल्याने खातेदारांच्या मनातही घबराट निर्माण झालेली आहे. बँकेत काही अडचण निर्माण झाली का ? बँकेची ऑनलाईन व्यवस्था ढाकळी गेली का? अशी वेगवेगळी चर्चा बँकेच्या बाहेर उभे असलेल्या खातेदारांमध्ये होऊ लागली आहे.
संपूर्ण प्रकारावर खातेदार बँकेच्या व्यवस्थापकांना जाब विचारत आहेत, पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासंतास उभे राहू लागत असल्याने खातेदारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यात बँकेकडून कुठलाही खुलासा केला जात नसल्याने खातेदार अक्षरशः वैतागले गेले आहेत.
पुढील आठवड्यात जर ही परिस्थिती पूर्वपदावर आली नाहीतर बँकेच्या बाहेर अक्षरशा मोठा उद्रेक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याबाबत बँकेच्या व्यवस्थापकांनी वरिष्ठ पातळीवर याबाबतची कल्पना दिली असली तरी परिस्थिती नियंत्रणात आली नाहीतर नागरिकांच्या रोषाला बँकेच्या अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.