मेगा भरती, MPSC ची आतापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात, लगेच भरा अर्ज

गट-ब आणि गट-क संवर्गातील नोकऱ्यांसाठी तब्बल ८ हजार १६९ जागांची भरती निघाली आहे. ही भरती MPSC च्या नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे. यासाठी गट-ब आणि गट-क मधील पदांसाठी संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे.

मेगा भरती, MPSC ची आतापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात, लगेच भरा अर्ज
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 8:18 AM

मुंबई : शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSC ने (MPSC Recruitment 2023) आतापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. संकेतस्थळावर सहायक कक्ष अधिकारी पदाकरीता दिलेल्या माहितीत बदल करण्यात आला आहे. या पदाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू असल्याचे नमूद केले होते. मात्र, या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी लागू नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

तब्बल ८ हजार १६९ जागांची भरती

पदवी घेताना किंवा घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पाहतात. त्यासाठी MPSC ची तयारी रात्रंदिवस करतात. पंरतु आतापर्यंत मोठी भरती मोहीम निघाली नव्हती. आता गट-ब आणि गट-क संवर्गातील नोकऱ्यांसाठी तब्बल ८ हजार १६९ जागांची भरती निघाली आहे. ही भरती MPSC च्या नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे. यासाठी गट-ब आणि गट-क मधील पदांसाठी संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षा कधी असणार?

MPSCने तब्बल ८ हजार १६९ जागांची जाहिरात काढली आहे. त्यानुसार गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा येत्या ३० एप्रिलला होणार आहे. यामुळे अभ्यासासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे. राज्यातील ३७ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. गट-ब सेवा मुख्य परीक्षा २ सप्टेंबरला आणि गट-क सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल.

किती पदे

  • गट-ब संवर्गातील तीन पदांसाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असते.
  • सहाय्यक कक्ष अधिकारी(ASO) यांची ७० पदे
  • वित्त विभागातील राज्य कर निरीक्षक(STI)ची १५९ पदे
  • पोलीस उपनिरीक्षक(PSI) साठी ३७४ पदे
  • गृह विभागातील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (Exise PSI)साठी फक्त ६ पदे
  • लिपिक टंकलेखक पदासाठी सर्वाधिक ७०३६ पदे आहेत.
  • परीक्षेसंदर्भात अर्ज भरणे व इतर माहितीसाठी https://mpsc.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्यावी.

नुकतेच पुण्यात केले आंदोलन पुण्यातील अलका चौकात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. एमएपीएसचं अभ्यासक्रम 2023च्या ऐवजी 2025 पासून बदलण्यात यावं, अशी एकच मागणी या विद्यार्थ्यांची होती. विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करण्यासाठी कमी वेळ मिळाला आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.