Maharashtra Breaking Marathi News Live | भाजपचा डीएनए संघर्षाचा : देवेंद्र फडणवीस

| Updated on: May 17, 2023 | 7:10 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | भाजपचा डीएनए संघर्षाचा : देवेंद्र फडणवीस
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नवी मुंबईत. नवी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. कर्नाटकातील नव्या मुख्यमंत्र्यांचा 18 मे रोजी शपथविधी. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार. डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर एमआयडीसी परिसरात दोन महिने टँकर बंदी. औद्योगिक क्षेत्रामध्ये रविवारी 14 मेपासून 12 जुलैपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आली टँकर बंदी. मुंबईसह राज्यात डेंग्यूचा फैलाव. जानेवारी ते 7 मेपर्यंत मुंबईत डेंग्यूचे 163 रुग्ण आढळले तर राज्यात 925 रुग्णांची नोंद झाली. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 May 2023 11:33 PM (IST)

    बार्शीतील गुन्हा दाखल होताच, गौतमी पाटीलने आरोपांचे केलं खंडन

    सांगली

    लावणी साम्राज्ञी गौतमी पाटीलवर सोलापूरच्या बार्शी येथे फसवणुकीच्या गुन्हा दाखल

    गौतमी पाटीलने मात्र आरोपांचा खंडन केले

    आपण वेळेतच कार्यक्रमाला पोहोचलो होतो, पण जे काही आरोप करण्यात आले आहेत, त्याची माहिती घेऊन भाष्य करू

    आपलं लग्न ठरलं नाही आणि लग्नाचा अजून कोणताही विचार नसल्याचेदेखील गौतमी पाटीलने स्पष्ट केले

    सांगलीच्या विटानजीक कळंबी येथे कार्यक्रमासाठी आली असता ती बोलत होती.

  • 15 May 2023 11:21 PM (IST)

    गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

    सांगली

    विटा कळंबी येथील गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये हुल्लड बाजी

    हुल्लडबाजी  करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांच्यावर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

    लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गौतमी पाटील यांचा कार्यक्रम

    युवकांची आणि महिलांची गर्दी मोठी होती प्रेक्षकांनी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला भरभरून दिली दाद

  • 15 May 2023 11:18 PM (IST)

    शेवगाव शहर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय; समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी

    अहमदनगर

    शेवगाव शहर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय,

    व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी घेतला निर्णय

    जो पर्यंत सर्व समाजकंटकांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत शेवगाव बंदची केली घोषणा

    उद्या सकाळी 9.30 ला संताजी महाराज मंदिर निषेध सभेचे केले आयोजन

    अशी घटना परत घडू नये म्हणून सर्वांनी बंदला पाठिंबा द्यावा सकल हिंदू समाज आणि व्यापारी असोसिएशनने केली घोषणा

    आज दिवसभरही व्यापाऱ्यांनी शांततेत पाळला बंद

  • 15 May 2023 08:49 PM (IST)

    पुणे जिल्हा विभाजनास राष्ट्रवादीचा विरोध

    पुणे जिल्हा विभाजनास राष्ट्रवादीचा विरोध

    राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अशी मागणी

    पुणे जिल्हा विभाजनाची मागणी हास्यास्पद आहे

    राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगतापांची महेश लांडगेवर टीका

  • 15 May 2023 08:34 PM (IST)

    उदयनराजे भोसले यांच्या भेटीनंतर गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया

    उदयनराजे भोसले यांना भेटून खूप छान वाटलं

    उदयनराजे यांचा स्वभाव खूपच छान आहे

    उदयनराजे भोसले यांच्यासोबतची भेट सहजच

    चित्रपटाचं थोड काम राहिले असून पुढच्या महिन्यात पूर्ण होईल

  • 15 May 2023 08:17 PM (IST)

    ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणुका लागू शकतात : देवेंद्र फडणवीस

    ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणुका लागू शकतात

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पुण्यातील कार्यक्रमात वक्तव्य

    महानगर पालिकेची पहिली लढाई आम्ही जिंकणार

    पुणे महानगर पालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार

  • 15 May 2023 08:07 PM (IST)

    Devendra Fadnavis | भाजपचा डीएनए संघर्षाचा : देवेंद्र फडणवीस

    भाजपचा डीएनए संघर्षाचा आहे : देवेंद्र फडणवीस

    सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलेलो नाही : फडणवीस

    व्हीडिओत पाहा फडणवीस आणखी काय काय म्हणाले?

  • 15 May 2023 08:07 PM (IST)

    हिंगोली जिल्ह्यात तापमानाने गाठला 43 अंशाचा पारा, केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

    काही दिवसांआधी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पीकांचं मोठं नुकसान

    यातच आता हिंगोलीत तापमानात मोठी वाढ झाली आहे

    त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत

  • 15 May 2023 07:44 PM (IST)

    Devendra Fadnavis On Mva | देवेंद्र फडणवीस यांचा मविआवर निशाणा

    मविआ सरकार घालवण्यासाठी घरी बसावं लागलं असतं तरी चाललं असतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

    मात्र पक्षान माझा सन्मान केला : फडणवीस

    ठाकरे खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले : फडणवीस

    राज्यात मविआचं महावसूली सरकार होतं, फडणवीस यांचा हल्लाबोल

  • 15 May 2023 07:38 PM (IST)

    Jagdish Mulik On Devendra Fadnavis | “फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा”

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची भावना

    पुणे भाजप शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांचं विधान

    महापालिकेत 100 पेक्षा अधिक नगसेवक निवडून आणणार, मुळीक यांचा निर्धार

  • 15 May 2023 07:30 PM (IST)

    Akola Prohibition | अकोल्यात संचारबंदी काढून जमावबंदी लागू

    अकोल्यातून मोठी बातमी

    संचारबंदी काढून जमावबंदी लागू

    अकोल्यात 5 पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी

    रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत संचारबंदी

  • 15 May 2023 07:24 PM (IST)

    Gautami Patil Police Complaint | गौतमी पाटील हीच्या विरोधात पोलिसात तक्रार

    गौतमी पाटील हीच्या विरोधात पोलिसात तक्रार

    गौतमी विरोधात सोलापुरातील बार्शी पोलिसात तक्रार

    गौतमीवर अवांतर पैसे घेतल्याचा आरोप

    संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ

  • 15 May 2023 06:51 PM (IST)

    अहमदनगर : आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

    शेवगाव दगडफेक प्रकरणी आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

    याप्रकरणी दोनशेहून अधिक जणांवर झाला होता गुन्हा दाखल

    31 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात, तर दोन आरोपी अल्पवयीन

  • 15 May 2023 06:30 PM (IST)

    पुणे जिल्ह्याची विभागणी करा

    पिंपरी चिंचवडचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची मागणी

    पुणे जिल्ह्याची विभागणी करून नवीन जिल्हा तयार करावा

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी

  • 15 May 2023 06:16 PM (IST)

    पुणे : राज्यात भाजपात मोठे बदल होणार

    देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे जिल्ह्यातील भाजपचा घेतला आढावा

    आठ दिवसांत बदल केले जाणार असल्याची माहिती

    देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील अहवालावर घेणार निर्णय

    जिल्ह्यातील सगळे नेते, आमदार होते बैठकीला उपस्थित

  • 15 May 2023 05:59 PM (IST)

    सांगली : माझ्या नावावर एकही घर नाही

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील

    मी कोणाकडून पैसे घेतले नसल्याने शांत झोप लागते

    ईडी चौकशीबद्दल काहीच वाटत नसल्याचा केला खुलासा

    सांगलीत विकास सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन

  • 15 May 2023 05:35 PM (IST)

    कोल्हापूर : नांगरट साहित्य संमेलन होणार

    माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती

    स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार प्रतिष्ठान यांच्यामार्फत आयोजन

    कोल्हापुरात ४ चून रोजी पार पडणार साहित्य संमेलन

    प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नांगरट साहित्य संमेलन

  • 15 May 2023 05:24 PM (IST)

    पुण्यात भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार कार्यकारिणी

    पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात कार्यकारिणीचे १८ मे रोजी आयोजन

    आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकारिणीत होणार चर्चा

    – यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील काही बडे नेते भाजपात पक्ष प्रवेश करण्याची शक्यता

  • 15 May 2023 04:55 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

    साखरेचे प्रश्न, तेलाचा प्रश्न बाकी अन्य विषया संदर्भात घेतली भेट

    मागण्या पूर्ण न झाल्यास सातारा, कराड इथे 22 मे ला मोर्चा काढणार

    शेतकरी वारी असे या मोर्चाचे नाव असणार

  • 15 May 2023 04:49 PM (IST)

    कुरुलकरच्या मोबाईलमध्ये हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा मॅसेज

    कुरुलकरच्या मोबाईलमध्ये निखिल शेंडेंचा मॅसेज

    वायुसेनेच्या गुप्तचर पथकाकडून शेंडेंची चौकशी सुरु

    पुणे एटीएस गरज पडल्यास निखिल शेंडेंची चौकशी करणार

  • 15 May 2023 04:28 PM (IST)

    हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी विकास आघाडीचा झेंडा

    कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती, उपसभापतीची बिनविरोध निवड
    सभापती म्हणून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. सुधीर कोठारी यांची बिनविरोध निवड
    उपसभापती म्हणून हरीश वडतकर यांचीही बिनविरोध निवड
    सुधीर कोठारी यांची पाचव्यांदा सभापती म्हणून बिनविरोध निवड
  • 15 May 2023 04:27 PM (IST)

    बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतचा पती आदिलवर गंभीर आरोप

    आदिलने आपल्या हत्येचा कट रचल्याचा राखीचा आरोप

    ड्रामा क्वीन राखी सावंतचे रोज नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात

    आता तिने माजी पती आदिलवर गंभीर आरोप केले

    राखी सावंतने एक व्हिडिओ जारी करून तिचा माजी पती आदिलवर आरोप केलाय

    तो सध्या तुरुंगात आहे आणि तुरुंगातूनच मला मारण्याचा कट रचत असल्याचा व्हिडिओत उल्लेख

    आदिलचा हा कट टाळण्यासाठी राखी सावंतकडून व्हिडिओमध्ये कुराणचे पठण

    राखी सावंतने काही महिन्यांपूर्वी विश्नोई गँगवर धमकीचे ईमेल पाठवल्याचा आरोपही केला होता

  • 15 May 2023 04:22 PM (IST)

    महाविकास आघाडीची जी बैठक झाली, ज्यात आम्हाला धोका वाटत होता तेच घडलं – उदय सामंत

    शिंदे साहेब जे दहा महिन्यांपूर्वी सांगत होते की, जर शिवसेना राष्ट्रवादीसोबत गेली तर शिवसेनेचा अस्तित्व कमी होईल

    आणि तेच होताना पाहायला मिळते

    कालच्या बैठकीमध्ये जे काही घडलं त्यावरून आमच्या मनाला दुःख वाटतंय

    ज्या पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांनाच आता बाजूला बसवलं जातं

    हेच आम्ही दहा महिन्यांपूर्वी सांगितलं होतं

    उत्साह असून उपयोग नाही

    राजस्थानमध्ये देखील, मध्य प्रदेशमध्ये देखील असं सरकार आल्यामुळे उत्साह होता

    पण तिथल्या सेंट परसेंट जागा खासदारकीला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडून आल्या

    जे पत्र दिले आहे त्याचा निर्णय राहुल नार्वेकर घेतील

    काय म्हणावं हे प्रत्येकाचा भाग आहे योग्य तो निर्णय अध्यक्ष घेतील

    सगळं काही महाविकास आघाडीमध्ये अलबेला आहे असं मला वाटत नाही

  • 15 May 2023 04:19 PM (IST)

    अध्यक्ष उपस्थित नव्हते, त्यामुळं मी निवेदन स्वीकारलं – नरहरी झिरवाळ

    आमदार अपात्र करायचा अध्यक्षांना पूर्णपणे अधिकार

    त्यामुळं ते निवेदन मी अध्यक्षांना पाठवेन

    मणिपूर प्रकरणानुसार लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही अपेक्षा

    पण अध्यक्ष कायद्याचा ‌अभ्यास करुन निर्णय घेतील

    मी अपात्रतेचं असं बोललो होतो‌ की, ‌माझ्याकडे‌ जर अधिकार आले तर अपात्र करेन

    पण कोर्टानं अधिकार अध्यक्षांना दिलेत

    कोर्टाची प्रक्रिया मी सांगितली होती

  • 15 May 2023 04:17 PM (IST)

    कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स आणि विधानसभेच्या नियमानुसारच योग्य निर्णय घेतला जाईल – राहुल नार्वेकर

    15 दिवसात शक्य झालं तर 15 दिवसात निर्णय घेऊ

    कोणाच्या सांगण्यावरून निर्णय घेणार नाही

    अध्यक्षांवर कोणाचा दबाव येण्याचं प्रश्न येत नाही

    कोणाला वाटत असेल की प्रेशर टाकून निर्णय घेतला जाईल, हा त्यांचा गैरसमज

    राऊत यांच्याबद्दल काय बोलावं

    ज्यांना संविधान कळतं ते असं भाष्य करणार नाहीत

    जे संविधानिक पदावर बसले आहेत, त्यांना जनता धडा शिकवेल

    याच्या बोलल्याने माझ्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर कोणता फरक पडत नाही

  • 15 May 2023 04:14 PM (IST)

    नाशिकमधील त्रंबकेश्वर मंदिराला पोलीस सुरक्षा पुरवा

    देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांची मागणी

    पोलिसांनी दोषींवर ठोस कारवाई करण्याची मागणी

    शनिवारी रात्री बळजबरीने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न

    मंदिर प्रशासन आणि ब्राम्हण महासंघाने दिले पोलिसांना पत्र

  • 15 May 2023 04:13 PM (IST)

    पंढरपूर मर्चंट बँकेवर माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांचे वर्चस्व कायम

    नागेश भोसले यांच्या आघाडीने मर्चंट बँकेवर मारली बाजी

    पंढरपूर मर्चंट बँकेची लागली होती पंचवार्षिक निवडणूक

    नागेश भोसले यांनी केला राजेश भादुले यांचा गटाचा पराभव

  • 15 May 2023 04:12 PM (IST)

    पिंपरी चिंचवडचा दौरा संपवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल

    थोड्या वेळात भाजपाचा कार्यकर्ता मेळावा

    मेळाव्याला देवेंद्र फडणवीस करणार संबोधित

  • 15 May 2023 04:12 PM (IST)

    DRDO चे संचालक प्रदीप करूलकर यांना पुन्हा एक दिवसाची कोठडी

    पुणे विशेष न्यायालयाने सुनावली कोठडी

    चौकशी दरम्यान प्रदीप कुरुलकर यांच्याकडून one plus 6T हा मोबाईल जप्त करण्यात आला

    ATS ने तो मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे देखील पाठवला होता

    माञ तो मोबाईल फोन डीकोड झाला नाही

    आज पुन्हा या मोबाईलचा ताबा ATS घेतला

    मोबाईल फिजिकली ओपन करून, मोबाईलमधले स्क्रीन शॉट देखील Ats ने घेतले

  • 15 May 2023 02:57 PM (IST)

    सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

    अहमदनगर- सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

    तर सरोव्हर डाऊन करण्यासाठी पत्र दिल्याचं पोलीस अधीक्षक यांनी सांगितलंय

    ग्रुप ॲडमिनला ओन्ली एडमिन सेटिंग करण्याच्या सूचना दिल्या

    आतापर्यंत 250 जणांना विरुद्ध गुन्हा दाखल तर 112 जणांची ओळख पटली

  • 15 May 2023 02:49 PM (IST)

    गौतमी पाटील विरोधात बार्शीत पोलिसात तक्रारी अर्ज दाखल

    गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात तक्रारी अर्ज दाखल

    बार्शीतील कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच दिला तक्रारी अर्ज

    माझी फसवणूक करून मला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गायकवाड यांची पोलिसात तक्रार

    12 मे रोजी बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता

    मात्र गौतमी पाटील 7 ऐवजी 10 वाजता स्टेजवर आल्याने कार्यक्रमाची वेळ संपली आणि पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला

    या कार्यक्रमासाठी ठरलेल्या मानधनापेक्षा मला वेठीस धरून अवांतर पैसे घेतले

    तसेच नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूक केल्याचेही तक्रारदार गायकवाड याने आपल्या तक्रारीत म्हंटलय

  • 15 May 2023 02:46 PM (IST)

    पुणे जिल्ह्याचे विभाजन करावे- आमदार महेश लांडगे

    पुणे जिल्ह्याचे विभाजन करावे, लोकसंख्या वाढत आहे

    त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या बाजूचा भागासाठी वेगळा जिल्हा निर्माण करावा

    जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्यावं. अशी मागणी मी शहरवासीयांच्या वतीने करतो.

    -आमदार महेश लांडगे

  • 15 May 2023 02:37 PM (IST)

    वज्रमुठीला मोठे तडे गेले असून ते एकमेकांवरच मूठ चालवताय- राधाकृष्ण विखे बाईट

    कर्नाटकचा निकाल आला म्हणजे महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडली असं म्हणण्यात अर्थ नाही

    महाविकास आघाडीच्या वज्रमुठीची अवस्था मागच्या आठवड्यात सगळ्यांनी पाहिली

    वज्रमुठीला मोठे तडे गेले असून ते एकमेकांवरच मूठ चालवताय- राधाकृष्ण विखे बाईट

  • 15 May 2023 02:28 PM (IST)

    राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली संजय राऊत यांच्यावर खोचक टिका

    राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली संजय राऊत यांच्यावर टिका

    संजय राऊत आमच्या दृष्टीने बेदखल व्यक्तिमत्व

    विखे पाटील यांनी संजय राऊतांवर खोचक टिका केलीये.

  • 15 May 2023 02:22 PM (IST)

    अकोला दंगल प्रकरणी आतापर्यंत 75 जणांना पोलीसांनी केली अटक

    अकोला दंगल प्रकरणी आतापर्यंत 75 जणांना पोलीसांनी केली अटक

    आरोपींची संख्या मोठया प्रमाणावर वाढण्याची शक्यता

    अकोला शहरातील बंद असलेली इंटरनेट सेवा मध्यरात्री पासून सुरू होणार

    शहरातील परिस्थिती पाहून काही प्रमाणात बाजारपेठ सुरू होण्याची शक्यता

    जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांची माहिती

    अकोला शहरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात; शहरात शांततेचे वातावरण…

  • 15 May 2023 02:19 PM (IST)

    मुंबईत आज शून्य सावलीचा दिवस

    आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात

    पण ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे, असं नाही.

    कारण वर्षातील दोन दिवस असे असतात की

    त्यादिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते.

    याला ‘शून्य सावलीचा दिवस‘ असे म्हटले जाते आणि मुंबईकरांना हा शून्य सावली दिवस आज अनुभवता येणार आहे.

  • 15 May 2023 02:18 PM (IST)

    राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आरोप 

    शेवगावचा प्रकार दुर्दैवी..

    प्रार्थना स्थळात दगड आणि शस्त्र आणून ठेवण्याची प्राथमिक माहिती मला मिळाली आहे.

    यापूर्वी हनुमान जयंती आणि आता धर्मवीर संभाजीराजे जयंती काही लोक विघ्न आणण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे

    ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा घटना घडतात त्या पोलीस निरीक्षकावर कारवाईचे आदेश

    या घटनेमागे जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर मोक्कासह कडक कारवाई केली जाईल

    कर्नाटक निकालानंतर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे कोण ?

    विनाकारण महाराष्ट्राचा राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्न..

    ज्यांचा पक्ष राहिला नाही आमदार खासदार राहिला नाही अशांनी आरोप करू नये..

    वैफल्यग्रस्त झाल्याने ठाकरे गटाकडून अशा आरोप केले जातात- राधाकृष्ण विखे पाटील

  • 15 May 2023 02:11 PM (IST)

    डोक्यात दगड लागल्याने बालक गंभीर जखमी

    हिंगोली येथे एका मनोरुग्णाने बालकाच्या डोक्यात मारला दगड

    पाठी मागून पळत येऊन मारला दगड

    डोक्यात दगड लागल्याने बालक गंभीर जखमी

    प्रणव मगर वय 11 वर्ष जखमी असलेल्या बालकाच नाव

    वसमत शहरातील बँक कॉलनी परीसरातली घटना घटना सी सी टीव्ही मध्ये कैद

    बालकावर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

  • 15 May 2023 02:07 PM (IST)

    थकीत उस बिलासाठी शेतकरी करणार हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्यावर आंदोलन

    १७ मे ला इंदापूर तालुक्यातील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्याची आत्मक्लेश पदयात्रा…

    हर्षवर्धन पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्याने पाच महिने होऊन देखील अद्याप शेतकऱ्यांचे दिले नाही उसाचे बिल..

    पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन…

  • 15 May 2023 01:55 PM (IST)

    सोलापूर | गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं एका आयोजकाला पडलं महागात

    पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलेली नसताना गौतमी पाटीलचा सांस्कृतिक लावणी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल

    राजेंद्र भगवान गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचे नाव…

    बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

  • 15 May 2023 01:37 PM (IST)

    पुणे | केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गिरीश बापट यांच्या निवासस्थानी दिली भेट

    केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली गिरीश बापट यांच्या कुटुंबियांची भेट

    काही दिवसांपूर्वीच भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन झालं होतं

    त्याच अनुषंगाने आज पुणे दौऱ्यावर असताना राजनाथ सिंह यांनी बापट कुटुंबियांची घेतली भेट

  • 15 May 2023 01:36 PM (IST)

    पोलीस यंत्रणेच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको – आजित पवार

    सोशल मीडियावरील क्लिपमुळे अकोल्यात राडा – आजित पवार

    भावना दुखावणाऱ्या क्लिपना आवर घालण्यासाठी सरकारने पावलं उचलावी

    राज्यात कायदा – सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं – आजित पवार

  • 15 May 2023 01:27 PM (IST)

    कर्नाटकच्या निकालानंतर भाजपमध्ये निराशा – अजित पवार

    कर्नाटकच्या निकालानंतर विरोधी पक्षाचा उत्साह द्विगुणित – अजित पवार

    सिल्व्हर ओकवरील बैठकीत लोकसभा, विधानसभेच्या जागांबाबत चर्चा – अजित पवार

    महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता – अजित पवार

    एकत्र निवडणुका लागल्यास धावपळ नको म्हणून मविआची आधीच तयारी – अजित पवार

  • 15 May 2023 01:19 PM (IST)

    धाराशिव | जिल्ह्यातील तेरखेडा येथे फटाका कारखान्याला भीषण आग

    आगीत दोन कामगार गंभीर जखमी, जखमींवर धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचार

    भरवस्तीत फटाका कारखान्याला आग लागल्याने वस्ती रिकामी करण्यात आली आहे…

    फटाक्याचे स्फोट होत असल्याने आग विझवण्यात येत आहे अडचण

    अग्निशमन दल, पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी

  • 15 May 2023 01:08 PM (IST)

    The Kerala Story सिनेमासाठी रविवार ठरला लाभदायक; एका दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई

    ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे…, सर्वत्र अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा…

    रविवारी सिनेमाने केली रेकॉर्ड ब्रेक कमाई.. वाचा सविस्तर

  • 15 May 2023 12:59 PM (IST)

    अकोल्यातील इंटरनेट सेवा बंद

    – दोन गटातील राड्यानंतर अकोल्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

    – सोशल मीडियावर अफवा पसरू नये यासाठी शासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

    – अकोल्यातील राड्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळाला भेट दिली.

    – राड्यात मृत्यू झालेल्याच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत देण्याचा आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.

    तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

  • 15 May 2023 12:54 PM (IST)

    लवकरात लवकर निर्णय घ्या, उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

    – सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार 16 आमदारांच्या अपात्र संदर्भात लवकरात लवकर निणर्य घ्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केली आहे.

    – विधानसभा अध्यक्ष यांच्या नवे हे पत्र देण्यात आले.

    – अध्यक्ष महोदय आज मुंबईमध्ये नाहीत त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे हे पत्र देण्यातले अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दिली.

    – न्यायालयाने जे म्हटले सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर हेरिंग घ्या असे सांगितले आहे त्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे असे सुनील प्रभू यांनी सांगितले

  • 15 May 2023 12:38 PM (IST)

    शेगावमध्ये परिस्थिती नियंत्रणात, पोलिसांचे शांततेचे आवाहन

    – अहमदनगरच्या शेगावमध्ये दोन गटातील दगडफेकीच्या घटनेमुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

    – या प्रकरणी 201 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर, आतापर्यंत पोलिसांनी 31 जणांना ताब्यात घेतले आहे.

    – मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    – दरम्यान येथील परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.

  • 15 May 2023 12:31 PM (IST)

    रेल्वेच्या धडकेत काका, पुतण्या यांचा दुर्दैवी मृत्यू

    – अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे एक दुर्दैवी घटना घडली.

    – रेल्वेच्या धडकेत काका पुतण्या ठार झाले आहेत.

    – सुधाकर बन्सी तेलंगे ( ५५) आणि मंगेश नारायण तेलंगे (२८) अशी या दुर्दैवी काका- पुतण्याची नावे आहेत.

    – सुधाकर तेलंगे हे बाहेर गेले. त्यांना शोधण्यासाठी पुतणे मंगेश रेल्वे फाटक परिसरात गेले.

    – भुसावळकडून नागपूरकडे जाणारी मालवाहतूक गाडी वेगात आली आणि त्या गाडीने दिलेल्या धडकेत ते ठार झाले.

  • 15 May 2023 12:19 PM (IST)

    त्रंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये इतर धर्मियांचा बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न

    – त्रंबकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये इतर धर्मियांनी बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला.

    – मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले

    – तर जबदरदस्तीने घुसणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ब्राम्हण महासंघाने केली आहे.

    – कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महासंघाने दिला आहे.

  • 15 May 2023 12:10 PM (IST)

    मुंबईत गॅस गळतीमुळे घराला लागलेल्या आगीत ६ जण होरपळले

    – खार पश्चिम भागात एका घराला लागलेल्या आगीत एकाच घरातील ६ जण भाजले.

    – ते सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    – गॅस गळतीमुळे ही आग लागली असल्याचे समजते.

    – आग आटोक्यात आणण्यात आली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.

  • 15 May 2023 12:04 PM (IST)

    मुंबईतल्या युवकांसाठी भाजपचा युवा संवाद मेळावा

    – मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रणनिती आखली आहे.

    – आगामी निवडणुकीसाठी भाजप आता युवकांना साद घालणार आहे.

    – यासाठी येत्या 18 मे रोजी युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.

    – मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतील युवकांना भाजप साद घालण्याची ही तयारी केली आहे.

  • 15 May 2023 11:55 AM (IST)

    मे महिना प्रारंभ, शेतकऱ्यांची शेतीची नांगरणी, वखरणीची कामे सुरू

    खरिप पिकांच्या पेरणीसाठी ट्रॅक्टरची मागणी

    शेतीसाठी शेतकऱ्यांनी कसली कंबर

  • 15 May 2023 11:47 AM (IST)

    आगामी निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार

    महाविकास आघाडीच्या बैठकीत एकमताने निर्णय

  • 15 May 2023 11:42 AM (IST)

    गुन्हा दाखल केल्यानंतर राऊतांनी नार्वेकरांचा सुर अवळल- नितेश राणे 

    माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय – संजय राऊत

  • 15 May 2023 11:39 AM (IST)

    अहमदनगर मधल्या राड्यानंतर शेवगावात तणाव

    शेवगावात पोलिसांचे शांततेचे आवाहन

    राड्या प्रकरणी 32 जणांना ताब्यात घेतले

    दगडफेकीत वाहानांचे नुकसान

  • 15 May 2023 11:34 AM (IST)

    घटनाबाह्य विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे दबावतंत्र सुरू- संजय राऊत

    घटनाबाह्य विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे दबावतंत्र सुरू- संजय राऊत

    महाराष्ट्रात कधीही निवडणूका घ्या आम्ही तयार आहोत- संजय राऊत

    कर्नाटक निवडणूकीनंतर देशात हुकूमशाही सुरू होण्याची भिती- संजय राऊत

  • 15 May 2023 11:27 AM (IST)

    ठाकरे गटाचे शिष्टमंडळ विधानभवनात दाखल

    सचिन अहिर आणि मनिषा कायंदे विधानभवनात दाखल

    16 आमदारांच्या अपात्रतेबाबत पत्र देणार

  • 15 May 2023 11:21 AM (IST)

    नरहरी झिरवाळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय.बी.चव्हाण सेंटरवर

    विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ घेणार शरद पवार यांची भेट

  • 15 May 2023 11:17 AM (IST)

    अकोल्यात दंगलीमुळे संचार बंदी, बाजारपेठा बंद असल्याने 70 कोटींचे नुकसान

    व्यापारी वर्गाला दंगलीचा आर्थिक फटका

    फक्त संवेदनशील भागातच संचार बंदी लावावी, व्यापार संघटनेच्या अध्यक्षांची मागणी

  • 15 May 2023 11:10 AM (IST)

    17 मे रोजी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

    राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन

    शरद पवारांच्या उपस्थितीत होणार बैठक

    सकाळी 11 वाजता होणार बैठकीला सुरूवात

  • 15 May 2023 11:05 AM (IST)

    संजय राऊत यांचं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

    मी कुठलेही चुकीचे वक्तव्य केलेले नाही- संजय राऊत

    देशभरात असे वक्तव्य अनेक जण करतात मात्र हे वक्तव्य मी केल्यामुळे माझ्यावर कारवाई- संजय राऊत

    माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न – संजय राऊत

  • 15 May 2023 10:53 AM (IST)

    जयंत पाटील यांना ईडीचं दुसर समन्स

    २२ मे रोजी चौकशीस हजर राहण्याचे पाटील यांना आदेश

  • 15 May 2023 10:51 AM (IST)

    महाराष्ट्रातील सरकारचं पानिपत करणार – नाना पटोले

    महाराष्ट्रातील सरकार हे असंविधानिक असून , आम्ही त्यांचं पानिपत करू, नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

  • 15 May 2023 10:46 AM (IST)

    कर्नाटक : डीके शिवकुमार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांची भेट घेतली

    डीके शिवकुमार यांनी वाढदिवसानिमित्त घराबाहेर जमलेल्या समर्थकांची भेट घेतली.

    आज दिल्लीला जाणार की नाही, अद्याप काहीही निश्चित झालेले नाही, असे ते यावेळी म्हणाले.

  • 15 May 2023 10:28 AM (IST)

    मुंबई – बेकरीत गॅस गळतीमुळे आग, 6 जण जखमी

    मुंबईतील खारमध्ये गॅस गळतीमुळे भीषण आग

    हरिश्चंद्र बेकरीमध्ये सकाळी ९ च्या सुमारास ही आग लागली असून त्यात ६ जण भाजले आहेत.

    यातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

    सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

  • 15 May 2023 10:24 AM (IST)

    पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार

    माजी आमदार अशोक टेकवडे भाजपामध्ये प्रवेश करणार

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार

  • 15 May 2023 10:09 AM (IST)

    अहमदनगर : शेगाव येथील दगडफेकीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील घटनास्थळी भेट देणार

    काल रात्री छत्रपती संभाजी महाराजांचे मिरवणुकी दरम्यान झाली होती दगडफेक

    दगडफेकीनंतर अनेक दुचाकी आणि चार चाकी वाहनांची करण्यात आली होती तोडफोड

    या घटनेचे पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील भेट घेणार

  • 15 May 2023 10:03 AM (IST)

    अनिल परब आज विधान भवन सचिवांना भेटणार

    ठाकरे गटाचे नेते अनिल परब आज घेणार विधानभवन सचिवांची घेणार भेट

    आज ११ वाजता घेणार भेट

    १६ आमदारांच्या अपात्रतेची कारवाई लवकर सुरू करावी, अशी करणार मागणी

  • 15 May 2023 09:58 AM (IST)

    रस्ता सुरक्षा संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक

    *रस्ता सुरक्षा संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक*
    *सार्वजनिक रस्तावर बेदारकपणे वाहन चालवणाऱ्यांवर अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्याचा  होणार निर्णय*
    *वाढत्या रस्त्यांच्या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार कठोर पावलं उचलणार*
    *दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिगृहावर होणार बैठक*
  • 15 May 2023 09:55 AM (IST)

    प्रदीप कुरलकर यांच्या अटकेनंतरच्या ATS कोठडीची मुदत आज संपणार

    DRDO चे संचालक प्रदीप कुरूलकरला आज पुन्हा न्यायालयात केले जाणार हजर

    प्रदीप कुरुलकर यांना यापूर्वी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली १५ मे पर्यंत ची कोठडी आज होत आहे पूर्ण..

    प्रदीप कुरलकर यांच्या अटकेनंतरच्या ATS कोठडीची मुदत आज संपणार

    आज दुपारी ३ वाजता त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणारं

    पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्यचा आरोपा कुरुलकर यंच्यावर आहे

    प्रदीप कुरलकर यांनी देशाच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती हनी ट्रॅप मध्ये फसून पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे

  • 15 May 2023 09:54 AM (IST)

    बुलेटच्या सायलेन्स मध्ये बदल केल्यास मालकासह गॅरेज चालकावरही होणार कारवाई…

    बुलेटच्या सायलेन्स मध्ये बदल केल्यास मालकासह गॅरेज चालकावरही होणार कारवाई…

    खामगाव पोलिसांकडून बुलेट चालकांवर कारवाईची मोहीम…

  • 15 May 2023 09:53 AM (IST)

    डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यु झाल्याचा नातेवाईकाचा आरोप…

    डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे युवकाचा मृत्यु झाल्याचा नातेवाईकाचा आरोप…

    खामगाव शहर पोलिसात डॉक्टर विरुध्द तक्रार दाखल…

    अँकर – बुलढाण्याच्या खामगाव येथील सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे, या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे…

  • 15 May 2023 09:50 AM (IST)

    पुण्यातील जांभूळवाडी तलावात मृत माशांचा खच

    पुण्यातील जांभूळवाडी तलावात मृत माशांचा खच

    माशांचा खच पडल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय

    या मृत माशांच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी करत आहे

    मासे मृत झाल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे..

  • 15 May 2023 09:45 AM (IST)

    पुण्यात पार पडणार DIAT ( Defence Institute of Advanced Technology ) चा १२वा पदवी प्रदान समारंभ

    पुण्यात पार पडणार DIAT ( Defence Institute of Advanced Technology ) चा १२वा पदवी प्रदान समारंभ

    देशाचे संरक्षण मंत्री आणि DIAT चे कुलपती राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुण्यात होणार पदवी प्रदान समारंभ

  • 15 May 2023 09:45 AM (IST)

    कडा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीची आज निवड

    आष्टी- कडा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीची आज निवड झाली. आमदार सुरेश धस यांचे समर्थक रमजान तांबोळी यांची सभापती म्हणून निवड करण्यात आलीय तर उपसभापती म्हणून भाजप नेते भीमराव धोंडे यांचे बंधू नामदेव धोंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलीय. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचे पहावयास मिळाले.

  • 15 May 2023 09:39 AM (IST)

    अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच

    अहमदपूर- अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. कार आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात 48 वर्ष व्यक्तीचा मृत्यू झालाय. पोपट जाधव असं मृतकाचे नाव आहे. पाटोद्याहून अंबाजोगाईच्या दिशेने निघालेली कार समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली. यात समोरून येणारा दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला. तर कार मधील तीन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे.

  • 15 May 2023 09:38 AM (IST)

    अकोला तिसऱ्या दिवशीही 144 कलम लागू…. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

    अकोला तिसऱ्या दिवशीही 144 कलम लागू…. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात…..

    Anchor : अकोला शहरामध्ये परवा रात्रीच्या सुमारास एका सोशल मीडियावर झालेल्या पोस्टमुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली आहे… तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे…. तर यामध्ये अर्जुन जखमी झाले असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे… तर पोलिसांनी 144 कलम लागू केला असून अकोला शहरात SRP तैनात करण्यात आली असून शहरात काल पासुन इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून आज तिसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती कायम असून…. परिस्तिती पाहून सिथील ता देण्यात येणार आहे

  • 15 May 2023 09:36 AM (IST)

    रावेर येथे सामूहिक विवाह सोहळ्यात ४५ जोडपी बंधले विवाह बंधनात

    रावेर येथे सामूहिक विवाह सोहळ्यात ४५ जोडपी बंधले विवाह बंधनात
     रावेर येथील फुले-शाहू-आंबेडकर बहुद्देशीय संस्था तथा तालुका बौद्ध समाज मंडळातर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यात ४५ जोडपी . बंधले विवाह बंधनात त्यामुळे या संस्थेने केलेल्या कार्याचा सर्वत्र कौतुक
  • 15 May 2023 09:36 AM (IST)

    आधीच कांद्याला भाव नाही ,त्यात अवकाळी पावसाचे संकट

    आधीच कांद्याला भाव नाही ,त्यात अवकाळी पावसाचे संकट, त्यामुळे त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
    कांद्याला भाव नाही, आणि अवकाळी पावसामध्ये भिजलेला कांदा  शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला टाकून दिलेला आहे, जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यात ठीक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कांद्याचे ढीग पडलेल्या चे चित्र दिसून येत आहे. कांद्याला भाव नाही आणि पावसात भिजलेल्या कांदा शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला टाकून दिला आहे.
  • 15 May 2023 09:36 AM (IST)

    बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचा आरोप

    सांगली – जतच्या भाजपा माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणी जतचे भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.विजय ताड खून प्रकरणी भाजपा माजी नगरसेवक उमेश सावंत यांच्यावर बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजप चे माजी आमदार विलासराव जगताप केला आहे,

  • 15 May 2023 09:35 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहवर बैठक

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहवर बैठक

    आषाढी यात्रा पंढरपूर 2023 जादा प्रवासी वाहतूक नियोजन ,मूल जि.चंद्रपूर येथे स्वतंत्र आगार उभारणी व सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे अजामीन पात्र गुन्हा ठरवण्याबाबत महत्वाची बैठक

    दुपारी तीन वाजेच्या सुमारास आयोजित बैठक

  • 15 May 2023 09:27 AM (IST)

    मनपाच्या पथकाकडून चार महिन्यात 322 किलो प्लास्टिक जप्त

    नाशिक : मनपाच्या पथकाकडून चार महिन्यात 322 किलो प्लास्टिक जप्त
    अँकर : प्लास्टिक मुळे पर्यावरणाला धोका होत असल्याने नाशिक महापालिकेने प्लास्टिक विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या कालावधीत तब्बल 322 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. 81 केसेस मधून तब्बल चार लाख तीस हजारांचा दंड देखील वसूल करण्यात आलाय. ‘हरित नाशिक स्वच्छ नाशिक’च्या अंतर्गत प्लास्टिक विरोधात जनजागृती देखील करण्यात केली जात आहे. प्लास्टिक बाळगणाऱ्या विरोधात पहिल्यांदा पाच हजार, दुसऱ्यांदा दहा हजार तर तिसऱ्यांदा पंचवीस हजार रुपयांचा दंड अशी कारवाई केली जाते.
  • 15 May 2023 09:24 AM (IST)

    या घटनेचे पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील भेट घेणार

    अहमदनगर

    शेगाव येथील दगडफेकीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील घटनास्थळी भेट देणार

    काल रात्री छत्रपती संभाजी महाराजांचे मिरवणुकी दरम्यान झाली होती दगडफेक

    दगडफेकीनंतर अनेक दुचाकी आणि चार चाकी वाहनांची करण्यात आली होती तोडफोड

    या घटनेचे पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील भेट घेणार

  • 15 May 2023 09:15 AM (IST)

    पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार,

    – पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार,

    – पुरंदरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे करणार भाजपमध्ये प्रवेश,

    – भाजपच्या मिशन बारामतीला मोठं यश,

    – अशोक टेकवडेंच्या भाजप प्रवेशामुळे सुप्रिया सुळेंना मोठा धक्का,

    – उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या अशोक टेकवडे करणार भाजप प्रवेश

  • 15 May 2023 09:14 AM (IST)

    नागपूरात पारा ४४ पार, उष्माघाताचा धोका वाढला

    – नागपूरात पारा ४४ पार, उष्माघाताचा धोका वाढला

    – नागपूर मनपाच्या तीन रुग्णालयात कोल्ड वॅार्ड सज्ज
    – तीन रुग्णालयात हिट स्ट्रोकच्या रुग्णांसाठी ३० बेड सज्ज
    – उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा वाढता धोका
  • 15 May 2023 09:12 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली जाणार मागणी

    ब्रेक- मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिल्यानंतर आता मुंबईच्या बीकेसी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला बाळासाहेब ठाकरे कॉम्प्लेक्स म्हणजेच बीटीसी असं नाव देण्यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही

    मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली जाणार मागणी

    -ही मागणी मान्य होणार का हे पाहणं महत्त्वाचं, मातोश्रीच्या आसपासचा बीकेसी परिसर हा संपूर्ण देशामध्ये उद्योगासाठी प्रख्यात आहे…

  • 15 May 2023 09:12 AM (IST)

    दरडोई उत्पन्नात कोल्हापूर जिल्हा पडला पिछाडीवर

    दरडोई उत्पन्नात कोल्हापूर जिल्हा पडला पिछाडीवर

    दरडोई उत्पन्नात आशिया खंडात आघाडीवर असणारा कोल्हापूर जिल्हा आता राज्यात सातव्या क्रमांकावर

    वारंवार येणारा महापूर,कोरोना,अवकाळी संकटाचा परिणाम

    मागच्या वर्षी त्या तुलनेत दरडोई उत्पन्नात वाढ राज्यात मात्र पिछाडीवरच

    मागच्या वर्षी एक लाख 77 हजार इतकं होत दरडोई उत्पन्न

    यावर्षी दोन लाख 8 हजार इतकं दरडोई उत्पन्न

  • 15 May 2023 09:12 AM (IST)

    ऐन कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा ओव्हर फ्लो

    कोल्हापूर

    ऐन कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा ओव्हर फ्लो

    बंधाऱ्यावरील पाणी पातळी पोहोचली साडेसोळा फुटांवर

    कोयना धरणातून कर्नाटकला एक टीएमसी जादा पाणी सोडल्याचा परिणाम

    ऐन उन्हाळ्यात राजापूर बंधाऱ्यावरून वाहतय पावसाळ्याप्रमाणे पाणी

    बंधाऱ्यावरील वाहत्या पाण्यातून वाहनधारकांची धोकादायक वाहतूक सुरूच

  • 15 May 2023 09:11 AM (IST)

    ठाकरे UBT पक्षाचे आमदार ऍड अनिल परब आज विधान भवन सचिवांची भेट घेणार

    ठाकरे UBT पक्षाचे आमदार ऍड अनिल परब आज विधान भवन सचिवांची भेट घेणार

    सकाळी 11 वाजता घेणार भेट

    सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात येणार आहे

    परदेश दौऱ्यावर असलेले विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर आज दुपारी मुंबईत दाखल होत आहेत

  • 15 May 2023 09:10 AM (IST)

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर

    दौऱ्यात आज पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकासकामांच करणार उद्घाटन

    संध्याकाळी पुण्यातील विश्नांतवाडीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा मेळावा

    मेळाव्यात देवेंद्र फडणवीस करणार संबोधित

    आगामी निवडणूकीची भाजपनं तयारी केली सुरू

    वडगावशेरी मतदारसंघात आज भाजपाचा मेळावा

    देवेंद्र फडणवीस पुण्यावर स्वतः लक्ष ठेऊन आहेत

    आज कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्ष संघटनेचाही आढावा घेणार…

  • 15 May 2023 09:10 AM (IST)

    राज्यासाठी दिलासादायक बातमी

    ब्रेक

    राज्यासाठी दिलासादायक बातमी

    मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता

    हवामान तज्ञांनी व्यक्त केला अंदाज

    राज्यातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता आता कमी होणार

    बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोखा चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे

    मोखा चक्रीवादळामुळे राज्यात उष्णतेची लाट तयार झाली होती

    आज मोखा चक्रीवादळ शांत होईल आणि त्याचा फायदा मान्सूनसाठी होईल

    यामुळे मान्सून वेळेवर येण्याची शक्यता आहे

  • 15 May 2023 09:10 AM (IST)

    जमावाची बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ समोर आलेत

    छत्रपती संभाजी नगर शहरात गाडीचा धक्का लागल्यामुळे हमखास मैदान परिसरात जमावाची बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ समोर आलेत या व्हिडिओत जमावाने थेट पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली असून संरक्षणासाठी पोलीस कर्मचाऱ्याला एका क्लब हाऊसच्या कंपाउंड मध्ये जाऊन स्वतःचे संरक्षण करावा लागल्याची माहिती समोर आली आहे

  • 15 May 2023 09:07 AM (IST)

    राज्यासाठी दिलासादायक बातमी, मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता

    हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

    राज्यातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता आता कमी होणार

    बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोखा चक्रीवादळाची तीव्रता झाली कमी

    मोखा चक्रीवादळामुळे राज्यात उष्णतेची लाट तयार झाली होती

    आज मोखा चक्रीवादळ शांत होईल आणि त्याचा फायदा मान्सूनसाठी होईल

    यामुळे मान्सून वेळेवर येण्याची शक्यता आहे

  • 15 May 2023 08:57 AM (IST)

    ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माचा अपघात; चाहत्यांकडून काळजी व्यक्त

    अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन हे रविवारी तेलंगणामधल्या करीमनगर याठिकाणी कार्यक्रमासाठी निघाले

    हिंदू एकता यात्रेत सहभागी होण्यासाठी जाणार होती चित्रपटाची टीम

    रस्त्यात चित्रपटाच्या टीमचा अपघात

    अदा शर्माने ट्विट करत दिली हेल्थ अपडेट, वाचा सविस्तर..

  • 15 May 2023 08:53 AM (IST)

    नाशिक | शहर होणार आता सुरक्षित

    200 सीसीटीव्हींसह 200 पब्लिक अँडरेसिंग सिस्टीमद्वारे राहणार नजर

    स्मार्ट सिटी कंपनीकडून 60 कोटी रुपये खर्च करून उभारले जाणार आपत्ती व्यवस्थापन केंद्र

    आपत्तीकाळात महापालिका आणि पोलीस यांच्याकडे असणारा प्रत्येकी दोन ड्रोन

  • 15 May 2023 08:46 AM (IST)

    नाशिक | पावसाळ्यापूर्वी धोकादायक वाडे रिकामे करण्याचे आदेश

    मनपा अतिरिक्त आयुक्तांनी विभाग प्रमुखांना दिल्या सूचना

    मालक किंवा भाडेकरूंनी वाडा खाली न केल्यास पोलीस बंदोबस्त तैनात करून वाडा खाली करण्याचा इशारा

    तसेच त्याचा खर्च देखील संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचा इशारा

    याअगोदरच शहरातील धोकादायक 1186 वाडे, इमारती यांना बजावण्यात आल्या नोटीसा

  • 15 May 2023 08:41 AM (IST)

    नाशिक | प्लास्टिकविरोधात महापालिकेची धडक कारवाई

    जानेवारी ते एप्रिल या कालावधीत तब्बल 322 किलो प्लास्टिक जप्त

    81 केसेसमधून 4 लाख 30 हजारांचा दंड वसूल

    ‘स्वच्छ सर्णेक्षण 2023’ अंतर्गत नागरिकांना प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन

  • 15 May 2023 08:36 AM (IST)

    शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत उद्या नाशिक दौऱ्यावर

    नाशिक पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात काल दाखल केला गुन्हा

    गेल्या शुक्रवारी पत्रकार परिषदेत केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत गुन्हा

    सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर पत्रकार परिषदेत मांडली होती भूमिका

    नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊतांवर उद्या स्थानिक पोलीस कारवाई करणार का, याकडे लक्ष

  • 15 May 2023 08:27 AM (IST)

    नाशिक | आजपासून 15 दिवस शहर पोलीस हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश लागू

    पोलिसांच्या परवानगी शिवाय मोर्चा, आंदोलनास राहणार बंदी

    या कालावधीत स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास असेल बंदी

    आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा

  • 15 May 2023 08:20 AM (IST)

    अमरावती | अकोला येथील दंगलीनंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द

    अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या अकोला येथील परीक्षा रद्द

    अकोलामध्ये संचारबंदी असल्याने परीक्षा पुढे ढकलल्या

    अकोला शहरात होणाऱ्या 11 केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलल्या आहेत

    परीक्षेसंदर्भात विद्यापीठाकडून पुढील तारखा जाहीर करण्यात येतील

  • 15 May 2023 08:11 AM (IST)

    पुणे | राज्यात विनापरवानगी गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांना दणका

    22 साखर कारखान्यांना 176 कोटींचा दंड

    साखर आयुक्तांचे कारवाईचे आदेश

    राज्यात जवळपास 35 लाख टन विनापरवानगी ऊस गाळप

    साखर आयुक्तालयाने 28 जुलै 2022 च्या निर्णयानुसार साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी गाळप परवाना प्राप्त करून घेण्याबाबत कारखान्यांना लेखी सांगण्यात आले होते

    मात्र या निर्णयाची पूर्तता न करता राज्यात काही कारखान्यांनी विनापरवानगी गाळप सुरू केले

    त्याच अनुषंगाने साखर आयुक्त आता या कारखान्यांवर कारवाई करणार आहेत

  • 15 May 2023 08:04 AM (IST)

    अकोला | दोन गटांमधील राड्यानंतर आज अकोला शहरात शांतता

    ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त, 500 पेक्षा अधिक पोलीस तैनात

    परिस्थिती पाहून संचारबंदीमध्ये दुपारी हळूहळू सूट दिली जाण्याची शक्यता

    अकोला शहरातील इंटरनेट सेवा बंद

  • 15 May 2023 07:45 AM (IST)

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्यावरून मुंबईला जाताना एका प्रवासी कारचा अपघात

    या अपघातात एक प्रवासी ठार

    अपघातग्रस्त गाडीतून पाच जणांचे कुटुंब प्रवास करत असताना अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्यामुळे अपघात झाला

    यात एक ठार तर अन्य चार जण किरकोळ जखमी झाले,

    घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले आहेत

    या अपघातामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही

  • 15 May 2023 07:20 AM (IST)

    एअर इंडियाची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा 20 मेपासून होणार सुरु

    नागपूर – मुंबई विमानसेवा 20 मेपासून सुरू होणार असून 28 ऑक्टोबरपर्यंत राहील

    एअर इंडियाचे एआय-1613 हे विमान20 मे रोजी सकाळी 11 वाजता मुंबईहून उड्डाण भरून नागपुरात येणार

    हेच विमान एआय-1614 बनून नागपुरातून दुपारी 12 : 5 वाजता मुंबईसाठी उड्डाण भरेल

    एअर इंडिया कंपनीने नियमित विमानसेवेऐवजी अतिरिक्त उड्डाण भरण्याचा निर्णय घेतलाय

    विमान 20 मे ते 28 ऑक्टोबरपर्यंत उड्डाण भरेल, त्यानंतर ते नियमित म्हणून उड्डाणाची शक्यता आहे

    एअर इंडियाच्या या विमानामुळे अन्य विमान कंपन्यांच्या तिकीटदरात घसरण होण्याची शक्यता

    एअर इंडियाच्या या अतिरिक्त विमानसेवेमुळे प्रवाशांना दिलासा

  • 15 May 2023 07:17 AM (IST)

    संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला चौपाटी आणि सिंहगड किल्ला आज पर्यटकांसाठी राहणार बंद

    खडकवासला चौपाटी आणि सिंहगड किल्ला आज दुपारी 2 पर्यंत राहणार बंद

    कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक ही कार्यवाही करण्यात आल्याने पर्यटक मात्र नाराज

    खडकवासला धरणाला लागून असलेल्या उन्नत प्राद्योगिक संरक्षण संस्था (डीआयएटी) येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येणार

    सुरक्षेच्या कारणास्तव व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून खडकवासला चौपाटी आणि सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

  • 15 May 2023 07:15 AM (IST)

    सासवडच्या श्री संत सोपानकाका देवस्थानला श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टची मदत

    सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट करणार मदत

    सोपानकाका यांच्या चांदीच्या पालखीसाठी दगडूशेठ मंदिरातर्फे पाच लाख रुपयांचा निधी

    यंदाच्या वारीत श्री संत सोपानकाका यांच्या पादुका चांदीच्या पालखीत पंढरपूरला नेण्यात येणार

  • 15 May 2023 07:15 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पुणे दौरा

    पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमधील विविध कार्यक्रमांना देवेंद्र फडणवीस लावणार हजेरी

    पुणे महानगरपालिकेच्या अनेक विकास कामांचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

    देवेंद्र फडणवीस शहर भाजप पदाधिकाऱ्यांना देखील करणार संबोधित

    18 मे रोजी पुण्यात पार पडणार आहे भाजपा कार्यकारणीची बैठक

    तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दौरा हा महत्त्वाचा मानला जात आहे

  • 15 May 2023 07:13 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नवी मुंबईत, नवी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

    मनसे अध्यक्ष दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत

    काल त्यांनी अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला

    राज यांनी काल उल्हासनगर आणि बदलापूरची शहर कार्यकारिणी बरखास्त केली

    राज ठाकरे आज नवी मुंबईत येत असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

Published On - May 15,2023 7:10 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.