मुंबई : शिंदे भाजप सरकार दंगली घडवत आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे कोल्हापुरात उसळलेली दंगल थांबली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, कोल्हापुरात अजूनही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे. भंडारा येथील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याची ऑनलाईन नोंदणी बंद करण्यात आली आहे. पुण्यातील बोहरा मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. जुलै महिन्यात होणाऱ्या बोहरा समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मुख्यमंत्र्यांना केली विनंती. 23 जून रोजी देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची पाटणा येथे बैठक. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची माहिती. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
सातारा : कराडमधील प्रीतीसंगमावर कृष्णा कोयना नदीचा संगम झालेल्या ठिकाणी एका मुलीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. रेठरे धरण जिल्हा सांगली येथील सेजल बनसोडे ही मुलगी कराडमधील आपल्या नातेवाईकांकडे आलेली होती. कराडमधील नातेवाईक आणि ती आणि तिचे कुटुंबीय कराडमधील प्रीतीसंगम घाटावरती फिरण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान त्यातील काहीजणी नदीपात्रात उतरून पोहू लागल्या. एकूण चार मुली या नदीपात्रात उतरल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही होते. मात्र थोडे अंतर नदीमध्ये गेल्यानंतर चार पैकी एका मुलीचा हात सुटला आणि ती मुलगी नदीपात्रामध्ये बुडाली. नदीपात्रामध्ये बुडाल्यानंतर तिच्या नाका तोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला. साधारण दोन तास शोध घेतल्यानंतर या मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आले.
जळगाव : जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात वादळी पाऊस झालाय. त्यामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. घरांवरची पत्रे उडून गेली. विजेचे खांबही कोसळले. केळी बागा अक्षरशः जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर ठिकठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. रावेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. रावेर तालुक्यातील खानापूर, अभोडा, अजनाड, केऱ्हाळा, रसलपूर गावांमध्ये घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
ठाणे : ऑनलाईन गेमिंग धर्मांतरबाबत गाझियाबाद पोलिसांकडून मुंब्रास्थित आरोपी शहानवाज याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी आज शहानवाजच्या आईची मुंब्रा पोलीस ठाण्यात चौकशी केली. मुंब्रा पोलीस आणि गाझियाबाद पोलिसांनी आरोपीच्या आईची चौकशी करून सोडून दिले आहे. शहानवाज ज्या काही गोष्टी करत असत त्याबाबत काहीच माहिती नसल्याचे शहानवाजच्या आईने सांगितले आहे .ती भयभीत झाली असून तिच्या घराला अजून देखील कुलूप आहे.
गाझियाबाद पोलीस पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, नोएडा, महाराष्ट्र या पाच राज्यांत शहानवाजचा शोध घेत आहे. यासाठी वेगनेगळी पथकं तयार करण्यात आली आहेत. मुंब्रा पोलीस देखील याबाबत गाझियाबाद पोलिसांना सहकार्य करत आहेत.
पुणे : “आमची मविआ आहे. यात ताकद जास्त कोणाची, यापेक्षा पारंपरिक पद्धतीने कोण निवडणूक लढत आलं, चर्चा होत असते, आम्ही बैठकीत निर्णय घेऊ. आता कसबा विधानसभा आम्ही लढलो. सर्वांचं सहकार्य झालंच, हे आम्ही नाकारत नाही. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आम्ही लढवू आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं, अशीच विनंती आमची राहील”, असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मनसे नेते वसंत मोरे यांची भेट घेतलीय. अमोल कोल्हे यांनी वसंत मोरे यांची सदिच्छा भेट घेतलीय. अमोल कोल्हे कात्रज भागात होते. या दरम्यान खासदार कोल्हे यांनी मोरेंची भेट घेतली.
तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना ईडीने समन्स बजावलंय. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने 13 जूनला चौकशीसाठी बोलावलंय. दरम्यान याआधी अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची ईडीने गुरुवारी सुमारे 4 तास चौकशी केली. कोळसा घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजावलं होतं.
छत्रपती संभाजीनगर येथे 38 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ झाला. या शाखेचा आज 38 वा वर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत, नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार उदयसिंग राजपूत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
शिवसेनेची शाखा म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाचा श्वास!
३८ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ झाला. आज या शाखेचा ३८ वा वर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे,… pic.twitter.com/3SnXDgcd5H
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 8, 2023
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत खरीप पिकांच्या शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
धन्यवाद पंतप्रधान मा. @narendramodi जी !
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप पिकांच्या शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. pic.twitter.com/3sp4YKW8uT
— Girish Mahajan (@girishdmahajan) June 8, 2023
भोपाळ | मध्यप्रेदश राज्यातील सीहोरमध्ये बोअरवेलमध्ये एक चिमुरडी पडली होती. रेस्क्यु टीमच्या मदतीने त्या चिमुरडीला बाहेर काढण्यात आलं. मात्र दुर्देवाने त्या चिमुरडीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्या चिमुरडीला मृत घोषित केलं. दरम्यान बोअरवेलचे खड्डे न बुजवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान काय म्हणाले?
बच्ची बहुत छोटी थी। हमने बच्ची को बचाने के लिए सेना को भी बुलाया था। हमने कोशिश बहुत की। हम बोरवेल खुला छोड़ने वालों के ख़िलाफ़ विधिवत कार्रवाई करेंगे: सिहोर में बोरवेल में गिरने से 2.5 साल की बच्ची की मृत्यु की घटना पर मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान pic.twitter.com/jT51BiLfj0
— ANI_HindiNews (@AHindinews) June 8, 2023
औरंगजेबाचे तैल चित्र असलेला जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर व्हॉट्सअप स्टेटसला ठेवणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील चिंचाबाभरच्या सोहेल खान आणि जावेद खान या दोघांवर रिसोड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रिसोड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोणीही सामाजिक भावना दुखावणारे मेसेज,पोस्ट सोशल मीडियावर न टाकण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.
पुणे : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली मनसे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली आहे. अमोल कोल्हे आज पुण्यातील शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक भागाचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी कात्रज भागात असताना त्यांनी वसंत मोरे यांच्या निवस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. अमोल कोल्हे यांच्यासोबत आमदार चेतन तुपे हे देखील उपस्थित होते.
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारातील पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने 101 कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
वरोरा विधानसभा क्षेत्रात मनसेच्या तिकिटावर 2019 ची निवडणूक लढलेले रमेश राजूरकर यांना भाजपच्यावतीने विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 13 जूनला रोजी राजूरकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या विधानसभा प्रमुखांच्या यादीत रमेश राजुरकर यांचे नाव आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रमेश राजूरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बदललेली राजकीय समीकरणे बघता भाजपने नवा डाव टाकल्याचे चित्र दिसत आहे. याच क्षेत्रातून दिवंगत खासदार यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आमदार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदी आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील 84 लोकसभा मतदार संघाच्या प्रमुखांची घोषणा केली. त्यामध्ये लांडगे यांना शिरुरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभा मतदार संघ दौऱ्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रेणुका सिंह, प्रल्हादसिंह पटेल यांनी गेल्या वर्षभरात शिरूर लोकसभा मतदार संघात दौरे केले आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये लांडगे सक्रीयपणे सहभागी होते.
शिरुर लोकसभा मतदार संघातील भोसरी, खेड, जुन्नर, आंबेगाव, मंचर आणि हडपसर या सहाही विधानसभा मतदार संघांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. ग्रामीण आणि शहरी असा मतदार निश्चितपणे विकासाच्या मुद्यांवर भाजपासोबत आहे. त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे निभावणार असून, पक्षाने दिलेल्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्याचा आमचा निर्धार असल्याचं महेश लांडगे यांनी सांगितलं.
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परभणी जिल्ह्यात आगमन झालंं आहे. हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात आज आगमन झाले असून पुढीचे चार दिवस पालखीचा मुक्काम परभणी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये राहणार आहे. आज श्रीक्षेत्र त्रिधरा येथे पहिला मुक्काम असणार आहे. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येथे दाखल होत आहेत.
नुकताच जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्याबद्दल मोठे भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ते काय क्रांती करतात ते मला माहित नाही, पण सर्वोच न्यायालयाने क्रांती केलेली आहे आणि त्या क्रांतीच्या बाहेर ते जाऊ शकत नाहीत हे नक्कीच आहे. मला माहित आहे नार्वेकर अतिशय हुशार आहेत. पण सर्वोच्य न्यायालयाच्या न्यायमूर्तीने 141 पानात जे लिहून ठेवले ते अतिशय क्रांतिकारक आहे.
देशातील सर्वच पक्षांना एक दिशा दिली आहे. मला वाटते की नार्वेकर साहेब थोर आहेत, वकील आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हालाही काळतो. जेव्हा व्हीप शिवसेनेचा मान्य केलाय, जेव्हा गटनेता शिवसेनेचा मान्य केलाय, जेव्हा राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे हे मान्य केल, 90 दिवसात निकाल द्यायचा आहे हे मान्य केलाय, तर अजून कोणती मोठी क्रांती करणार आहेत.
सांगली येथील आम्ही शिवभक्त संघटनेने मिरज प्रांताधिकाऱ्यांकडे एक निवेदन देत मोठी मागणी केली आहे. यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. थेट या निवेदनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आलाय. आम्ही शिवभक्त संघटनेचे संस्थापक विकास सूर्यवंशी आणि काही शिव भक्तांनी हे निवेदन दिले आहे.
निवेदनात लिहिले की, औरंगजेबाच्या उदात्तीकरणाच्या निषेधार्थ राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी औरंगजेबाचे पोस्टर कोल्हापूर व अहमदनगरमध्ये जावून पोस्टर जाळून मोहीम चालू करावी आणि मिरजेमध्ये औरंगजेबाचे पोस्टर जाळण्याची परवानगी मिळणेबाबत
नाना पटोले यांनी गोंदियामधून सरकारवर सडकून टीका केलीये. थेट दंगे पेटवण्याचे आरोप सरकारवर केले आहेत. नाना पटोले म्हणाले की, कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये दंगा पेटविण्याचे काम सरकारने केले आहे. कोल्हापूर मधील दोन मुलांनी औरंगजेबचे स्टेटस लावले. यानंतर मुस्लिम समाजावर कारवाई करण्याची मागणी केली गेली.
या प्रकरणात पोलिसांनी कारवाई देखील केली. मात्र धर्माचे ठेकेदार आणि सरकार यांना हे प्रकरण पेटवायाचे असल्याने दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करायचे काम सरकार करते. सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्रालयाच्या हाकेवर वसतिगृहात दिवसाढवळ्या बलात्कार घालाय आणि सरकार झोपल आहे
नाना पटोले यांच्या वाढदिवसाला गोंदिया ,भंडारा जिल्ह्यामध्ये थेट भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे बॅनर लावले होते. यानंतर एकच चर्चा ही राजकिय वर्तुळात रंगण्यास सुरूवात झाली. खरोखरच मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाना पटोले हे आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता यावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देत मोठे भाष्य केले आहे.
गोंदिया ,भंडारा जिल्ह्यामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरबद्दल नाना पटोले यांना विचारण्यात आले असता यावर नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार की लोकसभेत जाणार हे वेळेवर सांगेन. म्हणजेच आता नाना पटोले यांनी लोकांमध्ये परत एकदा संभ्रम निर्माण केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी निलेश राणेवर सडकून टिका केलीये. इतकेच नाही तर थेट निलेश राणेची थेट लायकी देखील जितेंद्र आव्हाड यांनी काढलीये. थेट जितेंद्र आव्हाड यांनी निलेश राणेला कार्टून म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ह्यांना उत्तर देण्या इतकी त्यांची लायकीच नाहीये. कुठं शरद पवारांची उंची आणि कुठे हा चायनीज कार्टून
थेट जितेंद्र आव्हाड हे निलेश राणेला चायनीज कार्टून म्हणाले आहेत. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, कार्टून म्हणजे doremaan हे असतात ना त्यांच्यावर बोलायचे नसते, त्यांच्या बोलण्याची मजा घ्यायची असते.
नुकताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपाच्या तीन खासदारांनी एक पत्र पाठवले आहे. भाजपाच्या खासदारांनी थेट राहुल गांधी यांना पत्र पाठवल्याने अनेक चर्चा बघायला मिळत आहेत. खासदार राजवर्धन राठोड, पुमन महाजन आणि प्रवेश सिंह या तीन खासदारांनी हे पत्र राहुल गांधी यांना पाठवले आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या या खासदारांनी तब्बल नऊ पानांचे पत्र पाठवले आहे.
या पत्रात खासदारांनी प्रामुख्याने हे सांगितले आहे की, काँग्रेसच्या काळात देशात सर्वाधिक दंगे झाले आहेत. इतकेच नव्हे तर नेहरू गांधी घराण्याने काँग्रेस नेत्यांना कशी वागणूक दिली यावर देखील पत्रात भाष्य करण्यात आलंय. या पत्रात तिरस्काराचे दुकान काँग्रेसनेच उघडल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. या पत्रातून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टिका करण्यात आलीये.
नुकताच नाना पटोले यांनी चंद्रपूर लोकसभेबद्दल अत्यंत मोठे भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा होती की, चंद्रपूर लोकसभेचा काँग्रेस तर्फे सर्वे करण्यात आलायं. मात्र, यावर आता नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावर बोलताना नाना पटोले हे म्हणाले की, या अशा गोष्टींच्या चर्चा प्रामुख्याने चालत असतात. सध्या जागा वाटप झाले नाहीये. निवडणूका देखील लागल्या नाहीत.
इतकेच नाही तर याबाबत अजून कुठल्याच प्रकारची चर्चा देखील झाली नाहीये. निवडणुका लागल्यानंतर कोणता सर्वे करायचे ते केला जाईल, असेही नाना पटोले हे म्हणाले आहेत. आता नाना पटोले यांच्या विधानानंतर अनेक चर्चा या रंगताना दिसत आहेत.
निलेश राणे यांच्या वक्तव्याचे पुण्यात पडसाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात आंदोलन
निलेश आणि नितीन राणे यांच्या वक्तव्याचा निषेध
1 जुलै रोजी आव्हाडांनी केले मुंब्रा बंदचे आवाहन
400 पैकी 4 धर्मांतर दाखवा, राजीनामा देईल
जितेंद्र आव्हाड यांचे दावा करणाऱ्यांना आव्हान
दोन-चार विकृतांच्या कृतीने संपूर्ण कोल्हापूरला वेठीश धरणे चुकीचे
हे सर्व राजकारण असून निर्दोष लोकांना मारण्यात कुठला न्याय?
उर्मिला मातोंडकर यांनी दंगली भडकविणाऱ्यांविरोधात व्यक्त केला संताप
कुछ विक्रुत लड़कों की सोशल मिडिया पोस्ट की क़ीमत पुरा #कोल्हापूर क्यो चुकाए?सख्त कारवाई सिर्फ उनपर होनी चाहीएथी।जिनका इस सबसे कोई लेना देना नहीं ऐसे निर्दोष लोग पीटें जाए यह सब कहाँका इन्साफ़ हैं?
राजर्षि शाहुमहाराज और छत्रपति शिवाजी महाराज के संस्कार में घुले हुए #महाराष्ट्र…— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) June 8, 2023
देशातील गरिबांचे 80 हजार कोटी रुपये वाचल्याचा दावा
गेल्या 9 वर्षात गरिबांसाठी स्वस्त औषधं, लसीकरण इतर योजना
केंद्र सरकारने केला कोट्यवधी रुपये वाचविल्याचा दावा
आयुष्यमान योजनेमुळे देशातील गरिबांचे ८० हजार कोटी वाचले. गेल्या ९ वर्षात गरिबांसाठी स्वस्त औषधं, मोफत लसीकरण, मोफत डायलिसिस, अपघात विमा सारख्या अनेक योजना लागू झाल्या आहेत.#9YearsOfHealthForAll#9YearsOfSeva #9YearsOfModiGovernment pic.twitter.com/tonS0QKUyN
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 8, 2023
शहरात पर्यटन वृद्धीसाठी शासनाचा प्रयत्न
टेक एन्टरप्रिन्टर्स असोसिएशनसोबत सामंजस्य करार
आता पर्यटन वाढली चालना मिळणार-मंत्री मंगलप्रभात लोढा
नवीन अभियानाचा झाला शुभारंभ
दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरु करणारे पहिले राज्य
दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्ष बच्चू कडू यांची माहिती
नांदेड तरुणाच्या हत्येप्रकरणी आंदोलन
गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा
विद्या चव्हाण यांचा फडणवीसांवर निशाणा
जमीन, पिके आणि झाड्यांच्या नुकसान भरपाईचा मोबादला
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांची माहिती
जमीन मालकांच्या खात्यात जमा होईल रक्कम
चार मुलांनी धर्मांतर केल्याचं दाखवा, राजीनामा देईल
जितेंद्र आव्हाड यांचे आव्हान, राजकारण पेटले
चंद्रपूरचे कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर आता या लोकसभा क्षेत्रात नव्या खासदार उमेदवारीवरून पुढे आलेल्या एका सर्वेमुळे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वांमध्ये नाराजी पसरली आहे. ‘स्ट्रो पोल’ नावाच्या एका सर्वेक्षण संस्थेने चंद्रपूरच्या पुढच्या खासदाराबद्दल चाचपणी सुरू केली आहे. पाहणीचे निष्कर्ष बाहेर आल्यानंतर काँग्रेसच्या वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्यूला आठ दिवस होत नाही तोच उमेदवारीबाबत चढाओढ सुरू झाली आहे.
या सर्वेक्षण संस्थेने 7 नावे पुढे करत नागरिकांकडून कौल मागितला आहे, यातील निष्कर्ष पुढे आल्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी हा अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण करण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे. याप्रकरणी आपण प्रदेश काँग्रेसला अहवाल पाठवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यांना खासदार होण्याची घाई आहे, त्यातील काहींनी अशा प्रकारे प्रयत्न चालविला असल्याची चर्चा आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात पाणी टंचाईच्या प्रश्नासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धरणगावात विविध मागण्यांसाठी लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला पाण्याचा रिकामा हंडा घेवून सहभागी झाल्या. यावेळी ‘मंत्री मस्त शेतकरी त्रस्त’ अशा जोरदार घोषणबाजी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली. आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी मनसेतर्फे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील मन्यारखेडा या गावात पाणीटंचाईच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडामोर्चा काढण्यात आला होता. आता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याच धरणगावात पाणीटंचाई असल्याने त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन केले. बुधवारी धरणगावात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी सुरळीत पाणीपुरवठा झालाच पाहिजे, ‘पाणीपुरवठा मंत्री मस्त जनता मात्र त्रस्त’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आळंदी आणि देहू येथे येणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून आधिक गाड्यांचं नियोजन करण्यात आले आहे. गुरुवार 8 जूनपासून बससेवा सुरू होणार असून सोमवार, 12 जूनपर्यंत बससेवा सुरू राहणार आहे.
देहू आणि आळंदीसाठी एकूण 142 जादा बस सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट, महापालिका भवन हडपसर, पुणे रेल्वे स्थानक , निगडी ,भोसरी , हिंजवडी आणि चिंचवड स्थानकावरून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
काम करणाऱ्या हमालांना प्रती पोत्यामागे दर कमी मिळत असल्याने आज हमालांनी बंद पुकारला. तुमसर, मोहाडी तालुक्यातील तसेच मध्यप्रदेश येथील धान, गूळ विक्रीसाठी आणला जातो. तीन वर्षापासून प्रती पोतं साडेतीन रुपयेच मिळतात. मजुरांना प्रती पोतं, 10 रूपये हमाली द्यावी अशी मागणी घेऊन आज बाजार समितीच्या हमालांनी बंद करीत आक्रमक पवित्रा घेतला.
जो पर्यंत मागणी मान्य होणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील अशीही भूमिका हमालांनी घेतली.
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली. भाजप-सेनेचे 45 प्लस खासदार विजयी व्हावेत याचा संकल्प असेल. महाविजय हा संकल्प असेल.
संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी निवडणूक प्रमुखांची असणार आहे. आमदार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 200 प्लस निवडून यावे यासाठी आजपासून योजना करत आहोत. 288 निवडणुक प्रमुख आजपासून कामाला लागणार आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.
कोल्हापुरातील तणावाचे वातावरण अजून निवळत असताना त्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. पुसद, उमरखेड या संवेदनशील भागांमध्ये यवतमाळ पोलिस विशेष वॉच ठेवत आहेत.
सोशल मीडियावरही पोलिस लक्ष ठेवून आहेत. 31 पोलीस ठाण्यात नाईट पेट्रोलिंग तसेच फूट पेट्रोलिंगही वाढवण्यात आले आहे.
मला याची काही कल्पना नाही. आंब्याच्या झाडाला लोकं दगड मारतात, बाभळीच्या झाडाला नाहीत. पवार साहेब देशाचे वरिष्ठ नेते आहेत. मी निवडणूक फायद्यासाठी नफ्यासाठी लढत नाही तर सेवा करण्यासाठी निवडणूक लढवते.
पुण्यातील तीन लोकसभा मतदारसंघावर भाजपचे विशेष लक्ष आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देजबाबदारी देण्यात आली आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. हे तिघेही लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार मानले जातात. मात्र निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उमेदवारी मिळणार का, यावरती मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.
कोल्हापूरमध्ये घडलेल्या हिंसाचारावर धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रीया दिली आहे. कोल्हापुरात घडलं ते षडयंत्र होतं, पोलिसांनी मास्टरमाईंड शोधावा असे ते म्हणाले. कोल्हापूरात सर्व जाती धर्माचे लोकं गुण्यागोविंदानं राहतात, मात्र गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जाणिवपूर्वक जातीय तेढ निर्माण केला जात असल्याचा आरोप भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे.
सत्ता नसल्यामुळं सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्यासाठी हे कृत्य केल्या जात असल्याचा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. या सगळ्याच्या मागे कोण आहे हे शोधण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार अशी जहरी टिका भाजपचे नेते निलेश राणे यांनी केली आहे. शरद पवार फक्त आई वडीलांनी दिलेल्या नावापुरतेच हिंदू आहेत, त्यांनी धर्मांतर करावं आणि मुस्लिम समाजामध्ये जावं असे म्हणत टोकाची टिका केली आहे.
निलेश राणेंचे शरद पवारांबद्दलचे वक्तव्य लज्जास्पद- खासदार सुप्रिया सुळे
निलेश राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या टिकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीबद्दल असे बोलणे हे लज्जास्पद आहे, तसेच यावरून त्यांची संस्कृती दिसते असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ऑनलाईन गेमच्या माध्यमातून धर्मांतरणाचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुंब्रामध्ये 400 जणांचे धर्मांतरण केले गेल्याचा संशय वर्तवला जातोय. गाझियाबादमधील धर्मांतरण प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन समोर आले आहे.
या प्रकरणातील मुंब्रात राहाणारा आरोपी शहनवाज खान हा फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर घणाघात टिका केली आहे. सरकारला निवडणूकीसाठी औरंगजेबाची गरज पडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी औरंगाबाद येथे केला.
गद्दार पुन्हा निवडून येणार नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. औरंगाबादमधील पहिल्या शाखेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत आहेत.
संजय राऊत आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. येथे आयोजीत कार्यक्रमात ते बोलत आहेत. यावेळी त्यांनी सरकारवर निशाना साधला. शिंदे भाजप सरकार दंगली घडवत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
बाळासाहेबांनी मुंबईत जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा अनेकांना वाटले की मुंबई आणि ठाण्यापलिकडे शिवसेना जाणार नाही. मात्र आज शिवसेना चांद्यापासून ते बांद्यापर्यंत पोहचली असल्याचे संजय राऊत म्हणाले.
कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर टँकर वाहन उलटल्याने बोरिवलीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. टँकर मुंबईच्या दिशेने जात असताना पश्चिम एक्स्प्रेस महामार्गावर अचानक उलटला. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. घटनास्थळी वाहतूक पोलिसांचे पथक पोहचले आहे. त्यांनी वाहतूक सुरळीत सुरु करण्यास सुरुवात केली आहे.
पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांसाठी होणार भजन- अभंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 13 जून 2023 रोजी येरवडा कारागृहात स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्यभरातील 29 कारागृहातील कैदी भजन स्पर्धेत सहभागी होणार आहे. स्पर्धेत कोल्हापूर, तळोजा,अमरावती, पुणे, नागपूर आणि नाशिक कारागृहातील कैदी सहभागी होणार आहे.
अहमदनगरला कर्जत येथे एका युवकाने औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सध्या या प्रकरणी एकाला अटक केली असून आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांकडून देखील शांततेचा आवाहन करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अहमदनगर आणि कोल्हापूर येथील घटनेवरून गृह खात्यावर निशाणा साधला. राज्यातील तणाव म्हणजे गृह खात्याच अपयश असल्याचे खासदार सुळे यांनी म्हटले आहे. राज्यात एकीकडे महिलांवर अत्याचार होत आहेत, दुसरीकडे बेटी बचाव बेटी पढावच्या गप्पा मारल्या जात आहेत. दिल्लीत कुस्तीपटू तरुणींना आंदोलन करावे लागत आहे, हे केंद्र सरकारचे अपयश असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा बिबट्यांचा वावर असल्याचं उघड झालंय. अंबरनाथ शहरालगतच्या नालिंबी गावात एका फार्म हाऊसमध्ये बिबट्याने दोन बदकांवर हल्ला चढवत त्यांचा फडशा पाडला. तर दोन बदकं जखमी झाली आहेत. या ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा देखील आढळून आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “हर घर जल” या केंद्राच्या योजनेत जलजीवन मिशनची कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. मात्र, यातही राजकारण होत असल्यानं जळगाव जिल्ह्यातील अनेक गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील लोणवाडी बुद्रुक गावात गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पाणी टंचाई आहे. उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडत असताना नळाला पुरेसं पाणी येत नाही. यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने चांदीच्या मोजमापला सुरुवात झाली आहे. आगामी 1 महिन्यात जवळपास 200 किलो सोने अन् 4 हजार किलो चांदीचे मोजमाप करण्यात येणार आहे. तसेच त्याची शुद्धता तपासणी होणार आहे.
भाविकांनी अर्पण केलेले सोने, चांदीची मोजणी करुन त्यानंतर ते वितळविले जाणार आहे. दररोज 10 ते 6 या वेळेत मोजणी सुरु असणार आहे.
अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील कूकसा येथे एका ढोंगी बाबा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मूल बाळ करून देत असल्याचे सांगत ढोंगी बाबा संतोष बावणे ने केला एका विवाहित महिलेवर नदीकाठी बलात्कार. दरम्यान फरार ढोंगी बाबाला 24 तासात पोलिसांकडून कोकर्डा येथून अटक करण्यात आलीये. ही घटना दर्यापूर तालुक्यातील कुकसा इथे घडलीये. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासन दाखल झाले. या बाबाकडे दर पौर्णिमेला बाबाच्या घरी मोठ्या संख्येने मूल बाळ व्हावे यासाठी भक्तांची गर्दी होत असल्याची माहिती. बलात्कारासह जादूटोणा सह विविध कलमानुसार बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
रिलायन्स ज्वेलर्स दरोड्यातील चार संशयतांची रेखाचित्र पोलिसांकडून जारी करण्यात आलीयेत. संशयतांची माहिती मिळाल्यास पोलिसांची संपर्क साधा असं आवाहन करण्यात आलंय. पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचे आवाहन. त्याचबरोबर दरोडा प्रकरणी हैदराबाद मधून सहा संशयित ताब्यात घेण्यात आलेत.
मी काल मराठवाड्यात, विदर्भातील एका जिल्ह्यात होतो. मला सगळीकडे एक गोष्ट ऐकायला मिळाली की मागच्या अतिवृष्टी आणि गारपिटीत जी मदत जाहीर झाली ती अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. ही गोष्ट चांगली नाही. शेवटी काळ्या आईशी जो इमान राखतो, लोकांच्या भुकेचा प्रश्न मिटवतो त्या बळीराजाला शासनाने मदत केलीच पाहिजे, हा आग्रह आहे तो काही चुकीचा नाही. त्यांना सहकार्य करणं हा प्रयत्न माझ्यासारखे लोकसुद्धा करतील.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदार संघातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जोपर्यंत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडेची बदली होणार नाही तोपर्यंत शिवसेना शिंदे गटाला सहकार्य करणार नाही. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला. स्थानिक पातळीवर युती मान्य नाही अशा निषेधाच्या घोषणा देखील यावेळी शिवसेनेकडून देण्यात आल्या.
शिवसेनेचा आज औरंगाबाद शहरात मेळावा. हा मेळावा संजय राऊत यांच्या उपस्थितीत पार पडणार. निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा असं या मेळाव्याला नाव देण्यात आलंय. या मेळाव्याला अंबादास दानवे, विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे, यांची उपस्थिती आहे. मात्र या मेळाव्याला अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचं दिसून आलंय.
शहरीकरणाबरोबरच सुनियोजित शहरीकरण व्हायला पाहिजे. महापालिकेसाठी आम्ही आग्रही आहोत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस म्हणालेत. मी जर ॲक्टीव्ह नसतो तर 30 हजार कोटींचे नॅशनल हायवेज आले नसते. ॲक्टीव्ह नसतो तर बैलगाडीवरची बंदी उठली नसती. जी तीन आश्वासन दिली होती ती आता दोन पूर्ण झाली आहेत. किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज लागावा या मागणीसाठी मी अमित शहांना भेटलो. या कामासाठी मी कोणतेही राजकीय जोडे बाहेर ठेवायला तयार आहे याला तुम्ही भक्ती म्हणता का? आंब्याच्या झाडाला लोकं दगडं मारतात अशोकाच्या झाडाला नाही. काम बोलतं त्यामुळे अशा टीका होत राहणार, ही माझ्यासाठी शाबासकी आहे हा विश्वास आहे. माझ्यासाठी ही चांगली गोष्ट आहे.
आमदार वैभव नाईक यांची पत्रकार परिषद पार पडली. संभाजी नगरविषयी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात संभाजी नगरचा ठराव घेतला. त्यामुळे कोणी विरोध केला तरी शिवसेना ठाम आहे. पत्रकार परिषदेत निलेश राणेंवर टीका करताना ते म्हणाले, निलेश राणेंचा दोनदा खासदारकीला पराभव झाला आहे तर शरद पवार आठ वेळा खासदार झाले आहेत. शरद पवारांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.
कालची कोल्हापूरची दंगल म्हणजे भाजपने गेल्या काही दिवसात काढलेले मोर्चे. हे सगळं पद्धतशीरपणे सगळ सुरू आहे. मोर्चे काढणाऱ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आवर घालायला हवा होता. कर्नाटकमध्ये सरकारच्या विरोधात वातावरण होत तेव्हा गदेचा मुद्दा पुढे आणण्यात आला. दंगली घडवण्यासाठी भाग पाडलं जातंय. नितेश राणे हातात तलवारी घेण्याच्या भाषा करतात यावर गृहमंत्रालय काय कारवाई करते त्याकडे आमचे लक्ष आहे. राणे ज्या ज्या पक्षात जातात तिथे आपला गट करण्याचा प्रयत्न करतात. दुसरं कोण मोठ झालेलं राणेंना पाहवत नाही.
महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा पुतळा जाळणे, हा जर गुन्हा असेल. तर शंभरवेळा हा गुन्हा करायला तयार आहे. सरकारला काय करायचे ते करू द्या असं प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे दिली आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेची शाखा प्रत्येक नाक्यावर स्थापन करीत आहोत. त्या उपक्रमाच्या अंतर्गत दादरमधला शिवसेना भवनचा जो कॉर्नर आहे. तो नाका ऐतिहासिक आहे, त्याला महत्त्व आहे. म्हणून तिथे आम्ही ही शाखा करीतआहे. नाका तिथे शाखा हे खुलं व्यासपीठ आहे. लोकांनाही त्याचा फायदा होईल असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
अकोला शहरातील तापडिया नगर रेल्वे फाटक आज रात्रीपासून 3 दिवस बंद राहणार आहे. अकोला ते मैसांगकडे जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. रेल्वे गेटच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा मार्ग रात्रीचा बंद ठेवण्यात येणार आहे. अकोला शहरात येण्यासाठी अकोट फाईल मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आव्हान रेल्वेकडून करण्यात आले आहे.
कोल्हापूर आणि नगरमधील घटना महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणाऱ्या नाहीत. राज्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करायला हवी, शांतता राखा असं शरद पवारांनी जनतेला आवाहन केलं आहे. त्याचबरोबर जनतेनं शासकीय यंत्रणेचा मदत करावी असंही बारामती येथील पत्रकारपरिषदेत सांगितलं.
केंद्र सरकार लवकरच देशवासीयांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. विमान प्रवासाचे दर आणि इंधनांचे दर येत्या चार दिवसात कमी करणाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. विमानांच्या तिकीटाचे दर गगनाला भिडल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वच विमान कंपन्यांना दर कमी करण्याचे आदेश केंद्र सरकार देणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील लवकरच कमी करणार आहेत.
देशातल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीची तारिख ठरली. 23 जूनला बिहारच्या पटनामध्ये बैठक होणार. राहुल गांधी, नितीश कुमार यांच्या उपस्थितीत मोठी बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांची रणनीती बैठकीत ठरणार आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आलं आहे.
जेजुरी गावच्या ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. आंदोलकांची शरद पवारांसोबत बैठक ठरली होती. मात्र कालचं आंदोलनाला यश आल्याने सर्व ग्रामस्थांनी शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली. ग्रामस्थांच्या सगळ्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्यामुळे शरद पवारांनी समाधान व्यक्त केलं.
आळंदीत खासदार सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आळंदी मधील गाथा परिवाराच्या कीर्तन व प्रवचन प्रशिक्षण सांगता समारंभाच्या कार्यक्रमास सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणकडून ९५ टक्के कामे पूर्ण
पावसाळ्याच्या आगोदर रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणकडून ९५ टक्के कामे पूर्ण केली आहेत. पावसाळ्यात आपत्ती टाळण्यासाठी तसेच पावसाळ्यातले धोके ओळखून महावितरणने अनेक कामे पूर्ण केली आहेत. यामध्ये गंजलेले पोल बदलणे, वायरिंगचा ताण काढणे, अर्थिंग करणे, गार्डिंग करणे, डिस्ट्रिब्युशन बॉक्स खराब झालेले असल्यास त्याची दुरुस्ती, खराब वायर बदलणे, पिन इन्सुलेटर बसवणे, रोहित्रांची डागडुजी करणे, झाडे कटिंग करणे आदी कामे पूर्ण झाली आहेत.
गडचिरोली येथील प्रवाशांना अजूनही वृक्ष सावलीतच एसटीची वाट पाहावी लागत आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळे बसस्थानक नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुध्दा निधीची कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. भर उन्हातही दोनशे ते तीनशे प्रवासी दररोज बसच्या प्रतीक्षेत उभे असल्याचं पाहायला मिळत आहे.
संकष्टी चतुर्थीला रत्नागिरी जवळच्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संकष्टी चतुर्थीला गणपतीपुळ्यात २० हजार भाविक आल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रासह देशातील कानाकोपऱ्यातील भाविकांनी यावेळी हजेरी लावली
जेजुरी देवस्थान विश्वस्त निवडीचा वाद शमल्यानंतर देवस्थान शिष्टमंडळ गोविंद बागेत शरद पवारांच्या भेटीला गेले आहे. धर्मादाय आयुक्तांपुढील सुनावणीत जेजुरीतील वादावर तोडगा निघाला. जेजुरीतील चार स्थानिकांना मिळणार संधी आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांचीही उपस्थिती.
संजय राऊतमध्ये हिंमत आहे का पवार साहेबांना सांगण्याची. बाळासाहेब ठाकरेंची मागणी होती औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याचे. हे शरद पवारांना सांगण्याची हिंमत आहे का? मुंब्य्राच्या आमदारांनी महाराष्ट्रात दंगली होण्याचे भाष्य केलं होतं. दोन तीन महिन्याअगोदर जितेंद्र आव्हाडांना कसं कळलं होतं? कोल्हापूरच्या नेत्याला कसं कळलं की दंगली होणार आहेत? आव्हाडांच्या मतदरसंघात 400 लोकांना धर्मांतर करताना पकडलं. यावर अग्रलेख लिही. ज्यांना साधं संभाजी म्हणता येत नाही त्यावर तुम्हाला आक्षेप घेता येत नाही. अबू आझमीने औरंगजेबाला मानतो अस वक्तव्य केलं. जाहीरपणे गवगवा करतोय.तुला थुंकण्याची सवय आहे ना मग अबू आझमीवर थुंकून दाखव. काल मोठी घटना घडली आहे. नंदकिशोरवर रेड पडली आहे. तुझ्या मालकाने ज्याच्याकडे खोके ठेवले आहेत, मातोश्रीचा दुसरा खरा मालक हा आहे. तो गायब आहे की त्याला लपवलं आहे याची माहिती उद्याच्या सामन्यातून दे.
श्रीधर पाटणकर देश सोडण्याच्या तयारीत आहेत. म्हणून त्यांच्यावर लूक आऊट नोटीस काढावी. नंदकिशोरचे पैसे या पाटणकरकडे ठेवले आहेत. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचे पटत नाही. याचा पुन्हा एकदा पुरावा समोर आला आहे. संजय राऊत पण पगार भेटत नाही म्हणून जर शिंदेंना जाऊन भेटला तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. यांच्या ढुंगणावर आदित्यने भवोजीना आणून बसवलंय. अमोल मिटकरीला कोणीही बाजारात विकत घेऊ शकतो. माझा चेक जर पोचला तर ते माझ्या बाजूने बोलतील. म्हणून अशा व्यक्तीवर बोलण उचित नाही.
कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर आहे. कालच्या राड्याप्रकरणी 36 जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवू नये, असे पोलील अधीक्षकांनी आवाहन केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त करण्यात आला होता. आज रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. शहराती दुकानांच्या बाहेरील सीसीटीव्ही तपासणार. सीसीटीव्ही तपासून पुढील कारवाई करणार. सोशल मीडियावर स्टेटस ठेवणारे कॉलेजचे विद्यार्थी आहेत. एका मुलाचं स्टेटस इतरांनी कॉप करुन ठेवलं.
कोल्हापूर वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील एका तरुणाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याचा प्रकार बुधवारी समोर आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. वरणगे पाडळीतील एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलवर औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्याचे हिंदुत्ववादी संघटनांच्या निदर्शनास आहे. सुमारे 700 ते 800 च्या जमावाने संबंधित तरुणाच्या घरावर चाल करून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक रात्री उशिरा गावात दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकचा चालक जागीच ठार झाला तर क्लीनर अपघातग्रस्त ट्रक खाली अडकला आहे. क्लिनरला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
तलासरीतील आमगाव जवळील पारसी डेअरी येथे धावत्या आयशर टेम्पोला आग लागली. गुजरातकडून मुंबईकडे मालवाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोने पेट घेतला. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत टेम्पोसह टेम्पोतील लाखोंच साहित्य जळून खाक झालं. चालकाच्या प्रसंगाधावानामुळे सुदैवाने जीवितहानी नाही. अग्निशमन दलाची गाडी अजूनही घटनास्थळी न पोहचल्याने टेम्पो जळून खाक झाला.
निवडणुका आल्या की शरद पवारांना मुस्लिम आठवतात, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार, असे वादग्रस्त ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केलं आहे. भाजपची हीच संस्कृती आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
किरकोळ कारणावरून चायनीज दुकानाची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गेला. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नाशिकच्या अशोक नगर परिसरात रविवारी रात्री घटना घडली. टेबल आणि खुर्च्यांची मोडतोड करत कॅश काऊंटरवरुन अकरा हजार रुपयांची रोकड घेऊन हल्लेखोर पसार झाले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांसाठी आवश्यक असणाऱ्या प्रबोधनपर साहित्य निर्मिती करणाऱ्या चैत्र क्रिएशन्स अँड पब्लिसिटी या संस्थेने पर्यावरण सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे यांनी पर्यावरण विषयक जनजागृती वाढवायची असेल तर शालेय जीवनापासूनच लहान मुलांवर तसेच संस्कार करणे गरजेचे आहे, असं म्हटलं आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी “झाडाचे बी शाळेत आणल्याशिवाय मुलांना शाळेत प्रवेश नाकारणे ही आजच्या पर्यावरणाची गरज” असल्याचे देखील आपल्या या कार्यक्रमातील भाषणात म्हटले आहे.
संजय राऊतांचं मानसिक संतुल बिघडलंय हे आजच्या त्यांच्या भूमिकेमुळे सिद्ध झाले आहे. औरंग्याच्या औलादींना पाठिशी घालण्याची वेळ राऊंतावर आलीय, का तर सत्तेचा लोभ. म्हणूनच आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राऊत काहीही बोलत आहेत. माझा राऊतांना सवाल आहे, कोल्हापूर आणि संगमनेर येथे हिंदुंना जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न झाला, याचं समर्थन करताय?. हिंदुंचा आणि अस्मितांचा अपमान होत असताना आणि औरंग्याचं उदात्तीकरण केलं जातं असताना यावर बोलायला राऊंतांची दातखिळी बसलीय का? केशव उपाध्ये यांचा सवाल.
पुण्यातील 22 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. लग्नाचं आमिष दाखवत सैफ नामक तरुणानं मुलीला पळवून नेल्याचं उघडकीस आलं आहे. दिल्लीतील नोएडात मुलीला नेलं असल्याची माहिती मिळते. घटनेची गांभीर्य लक्षात घेता पुणे पोलिसांची एक टीम दिल्लीला रवाना झाली आहे. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
एरव्ही उन्हाळ्यात बरसणारा अवकाळी पावसाने मृग नक्षत्र सुरू होऊनही आता हजेरी लावली नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागतेय. उन्हाच्या झळा अधिकच्या जाणवत असल्याने पाण्याची गरज वाढलीय. मात्र गावातील जलस्रोत आटल्याने अनेकांना दुरदुरुन पाणी आणावे लागतंय. कुणी डोक्यावर तर कुणी मोटारसायकलवर पाणी आणून आपल्या गरजा भागवत आहेत. नायगाव, मुखेड आणि कंधार तालुक्याला पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा जाणवत असून ग्रामस्थांचा अर्धा दिवस पाणी आणण्यात जातोय.
सांगलीतील रिलायन्स ज्वेल्समधील दरोजा प्रकरणी हैदराबादमधून सहा जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडून सांगलीतील दरोड्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळणार. शनिवारी एका व्यक्तीने रिलायन्स ज्वेल्सची रेकी केल्याचे देखील तपासात उघड झाले. रविवारी हा दरोडा पडला होता. आरोपींनी मुंबईजवळून कारची तर दुचाकीची गुलबर्ग्यातून खरेदी केल्याचे तपासात समोर आलं आहे.
तुमचं गृहखाते फेल आहे. आम्ही काम करतो आम्हाला माहिती कळते. मेरिटनुसार निर्णय घ्यावा लागेल. त्यांच्या मनात घटनाबाह्य असेल तर जनता दाखवेल. मला त्या खुर्चीवर विश्वास आहे. घटनेवर आधारित निर्णय घ्यावा. निवडणूक आयोगावर विश्वास नाही. खरेदी विक्री व्यवहार झाला मी समोर बोलतोय. न्यायालयाने देखील त्यावर बोललं आहे. त्यांना नव्वद दिवसात निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी वेळ काढूपणा केला तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा संजय राऊत यांनी इशारा दिला.
“कोल्हापुरातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. यात कोल्हापुरातील जनतेचा सहभाग नव्हता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर करण्यासाठी कोल्हापुरात बाहेरून लोकांना आणलं होतं हे मला माहीत आहे. मी राज्याच्या गृहमंत्र्यांना आवाहन करतो की तुमच्याकडे इंटेलिजन्स नसेल तर तुम्ही आमच्याकडून माहिती घ्या. तुम्ही जर हिंदुत्वाविषयी बोलत असाल तर तुमचं हिंदुत्व इतकं कमकुवत आहे का की तुम्ही एखाद्या शहरातील कार्यक्रमात कुणाचा फोटो उचलला तर मग तुमचं हिंदुत्व धोक्यात येईल?”, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
सिहोर जिल्ह्यातील मुंगोली गावात 6 जून रोजी खेळताना बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षीय मुलीला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरूच आहे. तज्ज्ञांचे पथक रोबोटसह घटनास्थळी दाखल झाले आहे. रोबोटच्या मदतीने मुलीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
#WATCH | Madhya Pradesh | Rescue operation continues to rescue the 2.5-year-old girl who fell into a borewell while playing, in Mungaoli village of Sehore district on June 6.
A team of experts has arrived at the spot with a robot. Efforts are being made to rescue the child, with… pic.twitter.com/lkVLOtlR8z
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 8, 2023
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे राखीव साठा वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता पाणीसाठी वाढला आहे. सध्या सातही धरणांत 11 टक्के पाणीसाठा असला तरी राखीव साठा धरून 18 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांत मिळून सध्या केवळ 11.14 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. राखीव साठा वापरण्याची परवानगी दिल्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे पाणी पुरणार आहे. राखीस साठा धरून सध्या 18.67 पाणीसाठी उपलब्ध आहे.
पत्नीसोबत असलेल्या संबंधाच्या संशयावरून सुरेश कुमावतने दिनेश प्रजापतीची हत्या केली आहे. दिनेशच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंद होताच पोलिसांनी तपास सुरू केला. सुरेशकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मित्र दिनेशचा मृतदेह पुरल्यानंतर पीडितेच्या पालकांना सुरेशने व्हिडीओ आणि मेसेज पाठवला. दिनेश आत्महत्या करणार असल्याचा व्हिडीओ त्याने आईवडिलांना पाठवला होता.
कोल्हापूर शहर, जिल्ह्यात सर्वत्र जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे. सध्या शहरात सर्वत्र शांतता असली तरी तणावाचं वातावरण आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
#WATCH | Maharashtra | Visuals from Kolhapur this morning where a bandh was called by some Hindu organisations yesterday. Tensions broke out during protests yesterday over some youth allegedly posting objectionable posts on social media with a reference to Aurangzeb. pic.twitter.com/5zby9QPGDp
— ANI (@ANI) June 8, 2023
संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात 12 जून रोजी एकत्रित येणार आहेत. पालखीदरम्यान मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर दिशेने शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी असेल. पालखी सोहळ्यातील काही वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार असून पालखीचे ‘लाइव्ह लोकेशन’ कळणार आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान शहरात वाहतूक नियमनासाठी शंभर कर्मचारी तैनात राहणार आहेत. त्याचप्रमाणे पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र ॲप तसेच सीसीटीव्हीद्वारे वाहतुकीवर ‘वॉच’असेल. पालखी मार्गावरील मेट्रोची कामे बंद ठेवण्यात येणार आहेत.
पुण्यातील लष्करातील एका निवृत्त कर्नलला तब्बल तीन कोटी रुपयांचा सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. 72 वर्षांच्या या कर्नलची आयुष्यभराची कमाई या सायबर चोरट्यांनी लंपास केली आहे. सुरुवातीला व्हॉट्सअप मेसेजवर या निवृत्त कर्नलला ऑनलाईन कमाईतून लाखो रुपये कमावण्याचे अमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला कर्नल यांना पैसैही मिळाले. त्यानंतर चोरट्यांनी स्वतः गुंतवणूक करण्यास सांगितलं आणि पैसे लंपास केले.
ओडिशातील भीषण रेल्वे अपघातानंतर भारतीय रेल्वेतील रिक्त पदांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेत ‘क’ संवर्गातील जवळपास 59 हजार पदे सध्या रिक्त आहेत. मध्य रेल्वेत 28 हजार आणि पश्चिम रेल्वेत 30 हजार ‘क’ संवर्गातील पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे.
मोसमी वारे पुढील 48 तासांत केरळमध्ये दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळ किनाऱ्यावर ढगाळ वातावरण तयार झालं असून मोसमी पाऊस सक्रीय होण्यास ही अनुकूल स्थिती आहे. दरम्यान ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने अतितीव्र रुप धारण केलं आहे. येत्या तीन दिवसांत वादळ उत्तर, उत्तर-पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकणाला याचा धोका नाही.
क्रिती सनॉन आणि ओम राऊत यांनी बुधवारी सकाळी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन श्री व्यंकटेश्वर यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तिथून निघताना ओम राऊत यांनी क्रितीच्या गालावर हलका ‘किस’ केला. याच गुडबाय किसवरून वाद निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर….
आज विश्व महासागर दिवस 2023 आहे. या प्रसंगी चेन्नईत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आहेत. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नेतृत्वात विभिन्न संघटना समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी एकवटल्या आहेत.
#WATCH | Chennai, Tamil Nadu: As today is World Ocean Day, Union Earth Science Minister Kiren Rijiju participates in beach cleaning programme at Besant Nagar Beach pic.twitter.com/8IEUFwjVPm
— ANI (@ANI) June 8, 2023
तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने चांदीच्या मोजमापला सुरुवात झाली आहे. जवळपास 200 किलो सोने व 4 हजार किलो चांदीची मोजमाप व शुद्धता मोजणी होणार. भाविकांनी अर्पण केलेले सोने व चांदीची मोजणी करुन त्यानंतर ते वितळविले जाणार आहे. दररोज सकाळी 10 ते 6 या वेळेत मोजणी होणार. जिल्हाधिकारी तथा संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी हा निर्णय घेतला आहे. पुजारी मंडळ अध्यक्ष यासह 10 जणांच्या समितीच्या उपस्थितीतीत हे मोजमाप पार पडणार आहे. देवीला नवसपूर्ती म्हणून अनेक भाविक सोने चांदी स्वरूपात दान करतात. 15 वर्षानंतर तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने चांदीची मोजणी करुन वितळविलं जाणार. शिवकालीन व पुरातन दागिने वगळता भाविकांनी अर्पण केलेले सोने चांदी वितळविले जाणार.
Ind vs Aus WTC Final Day 2 : पहिल्या दिवशी केलेली एक चूक टीम इंडियाला टाळावी लागेल. आता प्रश्न हा आहे की, दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा प्लान काय असेल? मॅचमध्ये पुनरागमन करण्यासाठी टीम इंडिया काय करणार?वाचा सविस्तर…..
पंजाब : अमृतसरला 7 जूनला एका संयुक्त तपास अभियानात बीएसएफचे जवान आणि पंजाब पोलिसांनी एक पाकिस्तानी ड्रोन जप्त केलं. या ड्रोनने अमृतसरच्या भैनी राजपुताना गावाजवळ भारतीय हवाई हद्दीच उल्लंघन केलं होतं.
पंजाब: अमृतसर में 7 जून को एक संयुक्त तलाशी अभियान में बीएसएफ के जवानों और पंजाब पुलिस ने एक पाकिस्तानी ड्रोन बरामद किया, जिसने अमृतसर में भैनी राजपुताना गांव के पास भारतीय हवाई क्षेत्र का उल्लंघन किया था।
(फोटो सोर्स- बीएसएफ पंजाब का ट्विटर हैंडल) pic.twitter.com/KFLiEp7WL6
— ANI_HindiNews (@AHindinews) June 8, 2023
नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यातील खळबळजनक घटना. आरोपीने कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केला. विशाल कुऱ्हाडे असं आरोपीच नाव आहे. विशालने कोठडीत फरशीने हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. अंबड पोलिस ठाण्यात आत्महत्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. एका विशिष्ट समाजाच्या युवकाने औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी ग्रामस्थांनी बंदचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी मिरजगाव पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांना समन्स पाठवलय. 13 जुलैला हजर राहून म्हणणं मांडण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. 13 जूलैला कागदपत्रांसह म्हणणं मांडा कोर्टाचे आदेश. शिवाजीनगर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश वाय एल मेश्नाम यांनी समन्स बजावलय. सुषमा अंधारेंनी पुण्यातील सत्र न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा केलाय