Maharashtra Breaking Marathi News Live | अमोल मिटकरी यांची सरकारवर टीका, वारकऱ्यांवर झालेला हल्ला हा निंदनीय

| Updated on: Jun 12, 2023 | 7:10 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | अमोल मिटकरी यांची सरकारवर टीका, वारकऱ्यांवर झालेला  हल्ला हा निंदनीय
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज कसोटीचा अंतिम सामना खेळला जात आहे. यावेळी भारता विजय खेचून आणून इतिहास घडवणार की सामना ड्रॉ करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिक, रत्नागिरीसह राज्याच्या अनेक भागात पाऊस. वातावरणात गारवा. पालखी सोहळ्या दरम्यान पुणे शहरात ड्रोन वर बंदी. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. इनामदार वाड्यातील पहिल्या मुक्कामानंतर आज सकाळी 10 च्या सुमारास पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. यासह राज्य आणइ देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Jun 2023 09:34 PM (IST)

    अमोल मिटकरी यांची सरकारवर टीका, वारकऱ्यांवर झालेला हल्ला हा निंदनीय

    मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा अन्यथा वारकरी समाज ही शासकीय पूजा होऊ देणार नाही. वारकऱ्यांवर इंग्रजांप्रमाणे लाठी हल्ला करण्यात आला, ही बाब अतिशय निंदनीय आहे, असे मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. हिंदुत्वाच्या नावाने बोंब मारणारे दिसत नाही. नितेश राणेंवरती नाव न घेता टीका केली. तसेच तुषार भोसले यांच्यावर टीका केली. दोषी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना विठुरायाची शासकीय पूजा करू देणार नाही, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला.

    वारकरी संप्रदायावर पोलिसी बळाचा वापर केल्याची घटना आज घडली. नियोजनाचा अभाव आणि केलेल्या नियोजनातील गलथान कारभारामुळे ही गोष्ट घडल्याचं समजत आहे. वारीच्या वैभवशाली परंपरेवर हात उचलणाऱ्या या नाकर्त्या सरकारने स्वतःच्या कारकिर्दीवरच हा काळा डाग लावून घेतला आहे. मी या घटनेचा त्रिवार निषेध करतो, असंही अमोल मिटकरी म्हणाले.

  • 11 Jun 2023 09:04 PM (IST)

    रावेर पीपल बँकेवर लोकमान्य पॅनलचा झेंडा ; ज्ञानेश्वर महाजन यांचा मोठ्या मतांनी पराभव

    जळगाव :
    रावेर पीपल बँकेवर लोकमान्य पॅनलने झेंडा रोवला आहे.  रावेर पीपल को-ऑपरेटिव बँकेच्या 2023 ते 2028 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 13 जागांसाठी सहकार पॅनल व लोकमान्य पॅनलने प्रत्येकी 13 उमेदवार दिले होते. त्यापैकी सहकार पॅनलला 6 जागांवर विजय मिळवता आला तर लोकमान्य फायनलने 7 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे पीपल बँकेवरवर लोकमान्य पॅनलने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
    सहकार पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर महाजन यांचा मोठ्या मतांनी पराभव झाल्याने चर्चेचा विषय ठरला होता
  • 11 Jun 2023 08:51 PM (IST)

    वर्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला आग; दोन तासानंतर आगीवर नियंत्रण

    वर्धा :

    वर्ध्याच्या प्रशासकीय भवनातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सायंकाळी अचानक आग लागली आहे. त्या  कार्यालयातील एका भागात लागलेल्या आगीत कागदपत्रे जळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  या आगीचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अधिकारी, कर्मचारी दाखल झाल्यानंतर आग विझवण्यासाठी अग्रिशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. ही आग  दोन तासांनंतर अटोक्यात आणली आहे.

  • 11 Jun 2023 08:36 PM (IST)

    वारकरी झटापट प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा खुलासा

    आळंदी,पुणे

    आळंदी पोलीस वारकरी झटापट प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून खुलासा देण्यात आला आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, आळंदीत लाठीमार झालेला नाही,  तर किरकोळ झटापट झाली असल्याचे पोलीस आयुक्त चौबे यांनी सांगितले.  पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या.  त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले. त्यावेळी काही व्यक्ती बॅरिकेडस तोडून आतामध्ये आल्याने झटापट झाली. त्यामुळे त्यावेळी लाठीचार्ज नाही तर थोडी झटापट झाल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

  • 11 Jun 2023 08:26 PM (IST)

    केंद्र-राज्याच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी प्रयत्नशील ; देवेंद्र फडणवीस

    नागपूर :

    मी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यात जाण्याचा निर्णय घेतला.  कारण केंद्र आणि राज्याच्या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहचत आहेत की नाहीत याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुख्यमंत्री असताना कुठलाच पालकमंत्री नव्हतो मात्र आता 6 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे.  त्यामुळे मी मागील पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडून काम कसं करायचं त्याचे मार्गदर्शन मागितले आहे.  आपल्यासोबत युतीत निवडून आले आणि उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी आपली साथ सोडली आणि महाविकास आघाडीत गेले असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही त्यांनी केली आहे.   बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत राहायचं नाही या प्रेरणेने निर्णय घेतला आहे, त्यामुळे हे आपलं सरकार आलं आहे.

  • 11 Jun 2023 08:15 PM (IST)

    वारकऱ्यांवर लाठीमार करण्यापर्यंत शिंदे-फडणवीसांच्या मुजोर पोलिसांची मजल; नाना पटोले

    मुंबई :

    महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप राज्य सरकारच्या पोलिसांनी केले.  शांततेत पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर लाठीमार करण्यापर्यंत शिंदे-फडणवीसांच्या मुजोर पोलिसांची मजल गेली आहे. वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या मुजोर पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

  • 11 Jun 2023 08:01 PM (IST)

    Gujarat Biparjoy | सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीला हवामान खात्याकडून यलो अलर्ट

    गांधीनगर | शेजारील राज्य गुजरातमधून मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. द्वारका आणि वलसाडमधील समुद्र खवळला आहे. समुद्र किनारी जोरदार लाटा उसळत आहेत. वेगात वारा वाहतोय. हवामान खात्याकडून सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • 11 Jun 2023 07:52 PM (IST)

    Ganpatipule | गणपतीपुळे इथे समुद्राला उधाण, पर्यटक जखमी

    रत्नागिरी | रत्नागिरी गणपतीपुळे इथे समुद्राला उधाण आलं आहे. या समुद्राला आलेल्या उधाणामुळे पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. समुद्रकिनारी असलेल्या दुकानांचंही या उधाणामुळे नुकसान झालंय.

  • 11 Jun 2023 07:46 PM (IST)

    Amit Shah On Pm Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा गौरव वाढवला : अमित शाह

    “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकालात भारताचं नाव संपूर्ण जगात वाढवण्याचं काम केलं. मोदींनी जगभरात देशाचा गौरव वाढवला. जगात मोदी जी कुठेही जातात तिथे त्यांच्या स्वागतात मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या जातात. ही घोषणाबाजी मोदीजी आणि भाजपसाठी नाही, तर देशातील 130 कोटी जनतेसाठी आहे”, असं अमित शाह यांनी म्हटलंय.

  • 11 Jun 2023 07:41 PM (IST)

    येणाऱ्या 50 वर्षात भाजपाला कोणीही हरवू शकत नाही; केशव प्रसाद मौर्य

    सांगली : येणाऱ्या पन्नास वर्षात भाजपाला कोणीही हरवू शकत नाही.  भाजपा हे वर्तमान आहे आणि भाजप हेच भविष्य आहे असं मत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी व्यक्त केले. सांगली जिल्ह्यातील तासगाव दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी भाजपविषयी हे मत व्यक्त केले.  भाजपचे जे विरोधक आहेत. ते आता घाबरले आहेत. कारण नरेंद्र मोदी हे चांगले काम करत आहेत. त्यामुळे हे घाबरून गेले आहेत.  त्यामुळे हे सर्व एकजूट होऊन नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी एकत्र येत आहेत. मात्र नरेंद्र मोदी 100 वर्षे भारताला पुढे घेऊन जाणार आहेत. 2024 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
  • 11 Jun 2023 07:28 PM (IST)

    Lathi Charge on Varkari | वारकरी-पोलिसांमध्ये झटापट, राजकारण तापलं, जयंत पाटील यांची सरकारवर टीका

    आळंदी/पुणे | महाराष्ट्राला वारीची ३०० वर्षाची परंपरा आहे. या तीनशे वर्षांच्या परंपरेत प्रथमच वारीच्या पवित्र परंपरेला गालबोट लागलंय. पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केलाय. या लाठीचार्जवरुन आता राजकारण पेटलंय. पोलिसांनी केलेल्या या लाठीचार्जवरुन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. “तीनशे वर्षांमध्ये कधीही न झालेली गोष्ट शिंदे फडणवीस सरकारने करून दाखवली आहे. हि घटना अत्यंत निषेधार्ह आहे,” असं ट्विट करत जयंत पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केलीय.

    “वारकऱ्यांवर झालेल्या या लाठीचार्जवरुन हिंदूत्ववादाचा डंका पिटणारे शिंदे फडणवीस सरकार ढोंगी आहे, हेच यातून सिद्ध होते”, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय. तसेच “सरकारने संयत अशा वारकरी बांधवांना काठी उगारायला लावू नये”, असा इशाराही जयंत पाटील यांनी सरकारला दिलाय.

  • 11 Jun 2023 07:17 PM (IST)

    Mumbai Rain | पावसाच्या आगमनामळे मुंबईकर सुखावले

    मुंबई | अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईत अखेर पावसाचं आगमन झालं आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईकरांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागला. कडक उन्हामुळे शरीराची लाहीलाही झाली होती. सूर्यनारायणाच्या प्रकोपामुळे अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. त्यामुळे प्रत्येक मुंबईकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. अखेर आता मुंबईत पावसाची एन्ट्री झाल्याने सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच वातावरणात गारवा आला आहे.

    मुंबईत पाऊस आला रे

  • 11 Jun 2023 07:01 PM (IST)

    मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

    मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे ओंकारनगरीमधील जनता बँक एटीएम जवळ एक मोठी घटना घडली. एका वानराला शॉक लागून उंचावून ते खाली पडले. त्यावेळी सोबतच्या इतर वानरांनी माणसाला लाजवेल अशा पध्दतीने सदर वानराच्या कानात फुंगले आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी त्याला पाणी पाजले. वीस मिनिटानंतर वानर उठून बसले. काही वेळा ते पुन्हा पहिल्यासारखे उड्या मारत निघून गेले. या सर्व घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होतोय.

  • 11 Jun 2023 06:51 PM (IST)

    आळंदीतील घटनेचा सुप्रिया सुळे यांनी केला निषेध, थेट केली ही मोठी मागणी

    सुप्रिया सुळे यांनी नुकताच आळंदी येथे घडलेल्या घटनेचा ट्टीट करून निषेध केला आहे. वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध असो, असेही सुप्रिया सुळे या म्हणाल्या आहेत. जे आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे, यापुर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. माऊलींच्या दिंडीसोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले आहे. हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

  • 11 Jun 2023 06:44 PM (IST)

    गॅस दाहिणी प्रकल्पाचे अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

    कैलास स्मशानभूमीतील गॅस दाहिणी प्रकल्पाचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. सातारा शहरासह 13 ग्रामपंचायतींना या गॅस दाहिणीचा होणार उपयोग होणार आहे. दुर्धर आजार, टीबी, कॅन्सर, कोवीड या आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी या गॅस दाहिणीचा वापर केला जाणार आहे.

  • 11 Jun 2023 06:40 PM (IST)

    वाऱ्यामुळे वसईत झाड कोसळण्याची घटना 

    जोराच्या वाऱ्यामुळे वसईत झाड कोसळल्याची घटना नुकताच घडलीये. वसई विरारच्या पश्चिम किनारपट्टी भागात वादळाचा प्रभाव अधिक दिसत आहे. वसईच्या गुरुनानक परिसरात ही घटना घडली आहे. झाड कोसळताना सीसीटीव्हीत कैद झाले. हे झाड थेट रस्त्यावरील कारवर कोसळले आहे. भिंतीमुळे कारचे फार काही नुकसान झाले नाहीये. सुदैवाने झाडे कोसळताना तिथे कोणी नागरिक उपस्थित नव्हते.

  • 11 Jun 2023 06:28 PM (IST)

    मंठा तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

    जालना जिल्हातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जवळपास एक तास तळणी परिसरात मुसळधार पाऊस झालाय. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांचे चांगलीच तारांबळ झाल्याचे बघायला मिळाले. मात्र, पेरणीसाठी शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.

  • 11 Jun 2023 06:20 PM (IST)

    पोलीस अधिकारी शेखर बागडे यांच्या मालमत्तेची चाैकशी करण्याची मागणी  

    वरिष्ठ पोलीस अधिकारी शेखर बागडे यांच्या बदलीच्या मागणी नंतर आता भाजपच्या नेत्यांनी शेखर बागडे यांच्या मालमत्तेविषयी चौकशी करण्याची मोठी मागणी केली आहे.  शेखर बागडे व त्यांच्या कुटुंबाच्या नावे 50 ते 60 कोटीहून अधिक रुपयाची मालमत्ता असल्याचे दस्तावेज देत ईडी सीबीआयकडे चौकशी करण्याचे निवेदन देण्यात आले.

  • 11 Jun 2023 06:15 PM (IST)

    बिपर जॉय चक्रीवादळ मुंबईत धडकले

    नुकताच बिपर जॉय चक्रीवादळ मुंबईत धडकले आहे. यामुळे मुंबईमध्ये सोसाट्याचा वारा सुटला आहे. समुद्र देखील खवळल्याचे दिसत आहे. समुद्र किनारी असलेल्या घरांना लाटा धडकत आहेत. हवामान खात्याने अगोदरच याविषयी माहिती दिली होती.

  • 11 Jun 2023 06:10 PM (IST)

    खासदार निधीतून 25 लाख खर्च करून उभारण्यात आली व्यायाम शाळा

    ठाणे लोकसभाचे खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून भाईंदरच्या नवघर येथे व्यायाम शाळेचे लोकार्पण नुकताच करण्यात आले आहे. भाईंदर पूर्व नवघर येथे लोकमान्य टिळक सभागृहाच्या शेजारी असलेल्या व्यायाम शाळेचे लोकार्पण करण्यात आले. खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून 25 लाख निधी खर्च करून उभारण्यात आली आहे ही व्यायाम शाळाला.

  • 11 Jun 2023 05:52 PM (IST)

    इंदापूर येथे बैलगाडा घुसला थेट नदीपात्रात

    इंदापुर येथील बैलगाडा शर्यतीत एक विचित्र प्रकार समोर आला. या शर्यतीत सहभागी झालेला एक बैलगाडा स्पर्धेचे ठिकाणी असलेल्या नदीपात्रात घुसला. मालकासह हा बैलगाडा नदीपात्रात घुसल्याने आयोजकांसह प्रेक्षकांची धावपळ उडाली. त्यांनी बैलांना आवर घालण्याचा प्रयत्न केला.

  • 11 Jun 2023 05:45 PM (IST)

    गाझियाबाद धर्मांतरण प्रकरणी अलिबागमधून एकाला अटक

    गाझियाबाद धर्मांतरण प्रकरणात अलिबाग येथून एका जणाला अटक करण्यात आली. मुंब्रा पोलिसांनी ही कारवाई केली. शहानवाज खान याला पोलिसांनी अलिबाग येथून अटक केली. ठाणे आणि गाझियाबाद येथील पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीने साथीदारांच्या मदतीने मुंब्रातील 400 जणांचं धर्मांतरण केल्याचा संशय आहे

  • 11 Jun 2023 05:34 PM (IST)

    अनेक ठेकेदारांनी माझ्या शिव्या खाल्या

    ठेकेदारांकडून कधीच लक्ष्मीचं दर्शन घेतलं नाही, अनेक ठेकदारांनी माझ्या शिव्या खाल्या. एक-दोन ठेकेदारांनी तर मारण्यापर्यंत वेळ आल्याचा किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितला. बुलढाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ठेकेदारांकडून मालपाणी घेतला नाही, त्यांनी रस्त्याचे खराब काम केल्यास त्यांना धडा शिकविल्याचे त्यांनी सांगितले.

  • 11 Jun 2023 05:30 PM (IST)

    पक्ष बांधणीसाठी श्रीनगर येथे राज्यप्रमुखांसोबत बैठकीचे सत्र

    पक्ष वाढ आणि संघटनेच्या बांधणीसाठी श्रीनगर येथे शिवसेनेच्या 11 राज्य प्रमुखांसोबत आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीनगर येथील हॉटेल रेडीसनमध्ये ही बैठक पार पडली. याविषयीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषदेत देत आहे. भाजपसोबत युती करण्याच्या घटने मागची कारणे शिंदे यांनी सांगितली.

  • 11 Jun 2023 05:22 PM (IST)

    पाण्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

    राज्यात पाण्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय झाली पाहिजे. शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करुन उत्पन्न वाढविणं गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर झाल्या. त्यामागे पाण्याचा अभाव हेच कारण असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 11 Jun 2023 05:17 PM (IST)

    जातीभेद, धार्मिकभेद करणाऱ्यांविरोधात समाजात संताप

    जातीभेद, धार्मिकभेद करणाऱ्यांविरोधात समाजात संताप वाढत असल्याचे मत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मांडले. मुंबई विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी त्यांची भेट घेतली. राज्यातील धार्मिक दंगली, मागासवर्गातील तरुणांचा खून याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करत काही दुख व्यक्त केल्याचे म्हणणे आव्हाड यांनी मांडले.

  • 11 Jun 2023 05:12 PM (IST)

    शरद पवार अध्यक्ष तर सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याप्रकरणात इतर पक्षांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या उत्तर भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना या घडामोडींविषयी विचारणा केली असता, त्यांनी खोचक टोला लगावला. मविआ काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर मुलाला त्यांनी मंत्री बनवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदी शरद पवार तर कार्याध्यक्ष पदी सुप्रिया सुळे झाल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

  • 11 Jun 2023 05:04 PM (IST)

    राष्ट्रवादी पक्ष लॉबिंगने चालत नाही

    राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल याविषयीची घोषणा केली होती. या निवडीवरुन भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोंडसूख घेतले होते. घराणेशाहीचा आरोप करण्यात आला. त्याला प्रतित्युर देताना सुप्रिया सुळे यांनिी राष्ट्रवादी पक्ष लॉबिंगने चालत नसल्याचा टोला लगावला.

  • 11 Jun 2023 04:56 PM (IST)

    भारतातील विमान पाकिस्तानच्या हद्दीत अन्…

    नवी दिल्ली : अमृतसर येथून अहमदाबादला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान खराब हवामानामुळे पाकिस्तानमधील लाहोरजवळच्या भागात भरकटलं होतं. जवळपास 30 मिनिटांनंतर भारतीय हवाई हद्दीत परत येण्यापूर्वी प्रवेश केला असून आता गुजरातपर्यंत गेल्याची माहिती समजत आहे.

  • 11 Jun 2023 04:48 PM (IST)

    जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

    जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. उत्तर जपानमधील होक्काइडो येथे भूकंप झाला. होक्काइडोमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर इतकी होती. आतापर्यंत जावितहानी आणि इतर नुकसान झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

  • 11 Jun 2023 04:33 PM (IST)

    एकनाथ शिंदेंनी गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घेतली प्रत्यक्ष भेट

    श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री कश्मीर दौऱ्यावर असून येथे असून यावेळी त्यांनी मनोज सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.

  • 11 Jun 2023 04:24 PM (IST)

    सुप्रिया सुळे यांचा सत्कार समारंभ

    पुणे : राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांचा सत्कार समारंभ झाला. यावेळी कार्यक्रम स्थळी राष्ट्रवदीकडून मोठया प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. या सत्कार समारंभावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी भला मोठा हार आणण्यात आला होता.

  • 11 Jun 2023 04:17 PM (IST)

    केंद्री मंत्री नितीन गडकरींचा पैठणमध्ये दौरा

    पैठण : संभाजीनगर पैठण रस्त्याच्या विस्तारीकरणदरम्यान तोडण्यात आलेल्या 51 वडाच्या झाडांचे पुनररोपन करण्यात आले होतं. याच झाडांना पालवी फुटली असून या झाडांची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत. संभाजीनगरजिल्ह्यातील पैठण शहरातील वनविभागाच्या जमिनीवर झाडांची पाहणी होणार असून काही वेळात नितीन गडकरी दाखल होणार आहेत.

  • 11 Jun 2023 04:10 PM (IST)

    पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट

    पुणे : आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. वारकऱ्यांची गर्दी झाल्यानं पोलिसांना वारकऱ्यांना आवरणं झालं कठीण झालं होतं. मंदिराच्या बाहेर हा सर्व प्रकार घडला असून मानाच्या वारकऱ्यांनाच फक्त मंदिरात प्रवेश आहे. मात्र इतर वारकरी आतमध्ये जाण्यासाठी आग्रह करत आहेत.

  • 11 Jun 2023 03:47 PM (IST)

    कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा

    भाजपाचे काकासाहेब तापकीर सभापती तर अभय पाटील उपसभापती पदी विजयी

    कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपाचे आमदार राम शिंदे गटाने या निवडणूकांमध्ये भाजपाची सरशी झाली तर राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांना धक्का बसला आहे. कर्जत बाजार समितीच्या सभापती पदी काकासाहेब तापकीर आणि उपसभापती अभय पाटील हे विजयी झाले आहेत.

    रोहित पवारा यांच्या गटाची मतं फुटल्याने शिंदे यांच्या गटाचे सभापती आणि उपसभापती निवडून आले आहेत. दोन्ही गटाच्या 9-9 जागा आल्याने या निवडणूकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र सभापती पदासाठी 9 मतदान तर राष्ट्रवादीचे एक मत बाद झाल्याने भाजपचा विजय झाला. भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी आमदार रोहीत पवारांची या निवडणूकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली होती.

  • 11 Jun 2023 03:35 PM (IST)

    उगाच स्वप्न बघण्यात अर्थ नाही – अजित पवार

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल या दोघांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर अजित पवार नाराज झाले असल्याचे बोलले जात होते. ते आमदार अपात्र ठरल्यानंतर भाजपात जातील अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. मात्र, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीव्ही नाईन मराठी चॅनलशी बोलताना उगाच मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहण्यात काही अर्थ नसल्याचे म्हटले आहे.

    राज्यातील विधानसभा अध्यक्षांसमोर होणाऱ्या सुनावणीनंतर जरी 16 आमदार अपात्र ठरले तरी राज्यातील सरकारकडे बहुमत असणारच आहे, त्यामुळे उगाच स्वप्न पाहण्यात काही अर्थ नाही अशी प्रतिक्रीया राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील 288 पैकी 16 आमदारांनी काय फरक पडणार आहे असे अजित पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,  ‘288 मधून 16 गेले तर उरतात 272 त्यांच्याकडे 137 आमदार आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे दोन ते तीन आमदाराने जरी आपली बाजू मांडण्यासाठी हेअरिंगसाठी वेळ मागितली तरी एक वर्षे गेले तसेच पुढचे एक वर्षे कसं गेलं हे तुम्हाला कळणार नाही आणि आम्हालाही कळणार नाही असेही मिश्कील शैलीत अजित पवार यांनी स्पष्ट करीत केले आहे. नंतर मात्र हे माझे म्हणणे तुम्ही म्हणता तसे अपात्र झाले तर यावर माझे उत्तर आहे. खरे काय ते विधानसभेचे अध्यक्ष बोलू शकतील. तेच पक्षांतर बंदी कायद्यानूसार योग्य तो निर्णय देतील अशी पुस्ती त्यांनी जोडली.

  • 11 Jun 2023 03:02 PM (IST)

    लोकसभा निवडणूका ऑक्टोबरमध्ये लागल्या तर नवल वाटू नये- प्रकाश आंबेडकर

    लोकसभा निवडणूका ऑक्टोबरमध्ये लागल्या तर नवल वाटू नये असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. भाजप भीतीचं वातावरण तयार करून निवडणूक जिंकू पाहतयं असा आरोपही त्यांनी केला.

  • 11 Jun 2023 02:56 PM (IST)

    मुंबईतील नाले कोणामुळे तुंबत आहेत- राज ठाकरे

    नाले तुंबन्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांवर निशाना साधला आहे. राज्याबाहेरील लोकं मुंबईत येऊन झोपड्या उभ्या करतात असा घणाघात राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईमध्ये आधी पाच नद्या होत्या त्यातील चार नद्या मारून टाकल्या असेही राज ठाकरे म्हणाले.

  • 11 Jun 2023 02:48 PM (IST)

    कोल्हा लांडग्यांनी वाघाच कातडं पांघरलं आहे- संजय राऊत

    कोल्हा लांडग्यांनी वाघाच कातडं पांघरलं आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाना साधला. खरा वाघ आल्यावर कातडं काढून पळ काढतात मग नंतर त्यांचीच शिकार होते, असेही राऊत महणाले. तर जंगलातील कितीही प्राणी एकत्र आले तरी वाघाची शिकार करू शकत नाही असे देवेंद्र फडणवीस नांदेड येथील सभेत बोलले होते

  • 11 Jun 2023 02:39 PM (IST)

    मुख्यमंत्री शिंदे श्रीनगरमधील राजभवनात दाखल

    मुख्यमंत्री शिंदे जम्मुचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या भेटीला श्रीनगर येथे दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा तीन दिवसीय दौरा असणार आहे. या दरम्यान ते कटरा येथील वैष्णो देवीचे दर्शन घेण्याची शक्यता आहे. पर्यटनाशी संबंधीत अनेक मुद्यांवर जम्मुचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • 11 Jun 2023 02:28 PM (IST)

    रामलीला मैदानावर आम आदमी पार्टीचं शक्ती प्रदर्शन

    आम आदमी पार्टीने दिल्लीच्या रामलीला मैदानावर भव्य रैली आयोजीत केली आहे. केंद्र सरकारने दिल्ली सरकारचे अधीकार काढून घेत्यामुळे ही रैली काढण्यात आली आहे. या रैलीमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल उपस्थीत आहेत.

  • 11 Jun 2023 02:20 PM (IST)

    राष्ट्रवादी पक्ष लॉबींगनं चालत नाही- सुप्रिया सुळे

    कार्याध्यक्ष पदाच्या निवडीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष लॉबींगने चालत नाही, राष्ट्रवादीत सर्वांना विचारून निर्णय होतात असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. दादांचा मुड फक्त भाजपलाच कळतो का असा प्रश्न विचारत त्यांनी अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांवर भाजपला टोला लगावला. याशिवाय मला आणि दादाला टार्गेट केलं जातं असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

  • 11 Jun 2023 02:13 PM (IST)

    महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन

    महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन झाले असुन मान्सुननं दक्षिण कोकणातील भाग व्यापला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. काल संध्याकाळ पासूनच ठगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. मान्सुनच्या आगमनानं बळीराजा सुखावला आहे तसेच सामान्यानाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

  • 11 Jun 2023 01:53 PM (IST)

    अमळनेर शहरात तणावपूर्ण शांतता

    दंगलीनंतर अमळनेर शहरात दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता आहे. कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. अमळनेर शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 48 तासांची संचारबंदी लागू केली आहे. आता संचारबंदीला 24 तास उलटले, कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडलेला नाही.

  • 11 Jun 2023 01:43 PM (IST)

    अपघातात तिघांचा मृत्यू

    मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर मधील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातिवली येथे भरधाव बाईकने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण झाला. या अपघातात बाईकवरील ट्रिपल सीट असलेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला . या अपघातात विक्रमगड तालुक्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिन्ही मयत वसईतील एका कारखान्यातील कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 11 Jun 2023 01:33 PM (IST)

    दोन लाख विद्यार्थ्यांना देणार पुस्तके

    धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी केली आहे. विद्यार्थी यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके अन् गणवेश देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या व खासगी अनुदानित शाळेतील 1 लाख 87 हजार विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत. त्याच गणवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

  • 11 Jun 2023 01:23 PM (IST)

    दोन युवक वाहून गेले

    नाशिकच्या दारणा नदीवरील महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्यात सिन्नर फाटा भागातील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत या तरुणांचे शोधकार्य सुरु होते. चेहडी येथील दारणा नदीला आवर्तन सुरु आहे. नाशिक महापालिकेच्या चेहडी बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आले आहे. या ठिकाणी चार युवक अंघोळीसाठी गेले होते. यातील दोन युवक सिद्धार्थ गांगुर्डे आणि राहूल महानुभाव हे दोघे पाण्याच्या उलट्या प्रवाहात सापडल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही. त्यांच्या एका सहकारी मित्राने घरी येऊन ही घटना सांगितली. त्यांनी त्वरीत आग्निशमन दलास कळविले. रात्री उशिरापर्यंत या युवकांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.

  • 11 Jun 2023 01:19 PM (IST)

    भाजपने आधी सहकरी पक्षाला संपवले – सुळे

    भाजपने विरोधकांना संपवण्याआधी स्वत:च्या सोबत असणाऱ्या सहकारी पक्षाला संपवले. आता विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दिल्लीतून पक्षाची नवीन फळी घोषित केली. हा विषय आपणास माहीत नव्हता. आपण मुंबईत होतो, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

  • 11 Jun 2023 01:08 PM (IST)

    वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये- पोलिसांचे आवाहन

    समाज माध्यमांमध्ये विविध धार्मियांच्या भावना भडकावणाऱ्या पोस्ट आढळून येत आहेत. या प्रकारच्या पोस्ट कोणीही टाकू नये, हा दखलपात्र अपराध आहे. अल्पवयीन मुलेसुद्धा अशा पद्धतीच्या पोस्ट टाकायचं आढळून आले आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी अशा मुलांच योग्यप्रकारे प्रबोधन करावे, असे आवाहन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे अशा पद्धतीच्या पोस्ट नागरिकांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करावा, जेणे करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आवाहन त्यांनी केले.

  • 11 Jun 2023 01:04 PM (IST)

    यंदा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळण्याची शक्यता – राज ठाकरे

    यावेळच्या पावसामध्ये कोकणात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतील. यासाठी मला वाटतं प्रशासनाने देखील जागरुक राहिलं पाहिजे. एखाद्या भागामध्ये बाहेरच्या लोकांनी किती यावं आणि असलेली सिस्टेम किती बिघडवावी.. नाले सफाई इत्यादी विषय निघतात, पण नाले कोणामुळे तुंबत आहेत. बाहेरुन लोकं येणार नाल्यांच्या बाजूने झोपड्या उभ्या करणार.. असं देखील राज ठाकरे म्हणाले…

  • 11 Jun 2023 01:01 PM (IST)

    बिहारचा पूल का पडला – राज ठाकरे

    सर्व कठीण प्रसंगामध्ये मनसेचे कार्यकर्ते धावून जातात. मनसेच्या कामांचे कौतूक होते. परंतु मनसेला मतदान का होत नाही, असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला. प्रशासकीय यंत्रणेमुळे अनेक दुर्घटना घडतात, बिहारमध्ये नुकताच पडलेला पूल त्याचे उदाहरण आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

  • 11 Jun 2023 12:58 PM (IST)

    मनसेच्या कामांचं कौतुक होतं मग मतदान का करत नाहीत? – राज ठाकरे

    सर्व कठीण प्रसंगांमध्ये मनसेचे कार्यकर्ते धावून जातात. इतर पक्षांनी जे काम केलं नाही ते आपण केलं पाहीजे असं देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे रस्ते, साधन सुविधा विभागाच्या वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने म्हणाले. मनसेच्या कामांचं कौतुक होतं मग मतदान का करत नाहीत? असा प्रश्न देखली याठिकाणी राज ठाकरे यांनी विचारला

  • 11 Jun 2023 12:49 PM (IST)

    मुंब्रा आता मिनी पाकिस्तान झाला आहे – नितेश राणे

    मुंब्रा याठिकाणी ४०० लोकांचं धर्मांतर झालं आहे आणि ही गोष्ट खरी आहे. मुंब्रा आता मिनी पाकिस्तान झाला आहे.. असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. एवढंच नाही तर, मुंब्रा याठिकाणी हिंदूंवर आत्याचार सुरू आहे. मुंब्रा याठिकाणी राहणाऱ्या हिंदूंबरोबर आम्ही उभे आहोत.. असं देखील निकेश राणे म्हणाले. तुम्ही मुंब्रामध्ये मुखमोर्चा काढण्या आधी कलनगर सामना वर मोर्चा काढा.. असं देखील निकेश राणे म्हणाले.

  • 11 Jun 2023 12:44 PM (IST)

    उध्दव ठाकरेंचा कामगार संजय राऊत यांना अमित शहांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याची हिंमत नाही – नितेश राणे

    बाळा साहोबांचा शब्द हा बंदुकीचा गोळीसरखा होता. उध्दव ठाकरे यांनी कधी दिलेले शब्द पाळला नाही. जे त्यांच्या घरी खोके पोचवतात वसुली करतात त्यांचे दिलेले शब्द ठाकरे पाळतात. संजय राऊत यांना हिंमत असेल तर ट्रिपल तलाकवर बोलून दाखवावं. उध्दव ठाकरेंचा कामगार संजय राऊत यांना अमित शहांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याची हिंमत नाही.. असं नितेश राणे म्हणाले.

    खरा वाघ बगायचे असेल तर आरेत जावे खरे वाघ कसे असतात ते दिसतील आणि वाघाला सांगायची गरज भासत नाही खरी वाघाची चाल कळते.. मालकाच्या मुलाला मिईव मिईव आवज काढला तरी भीती वाटते वाघाची डरकाळी लांबची गोष्ट.. असं देखील नितेश राणे म्हणाले..

  • 11 Jun 2023 12:30 PM (IST)

    Bigg Boss OTT 2 मध्ये होणार मिया खलीफा हिची एन्ट्री! ॲडल्ट स्टारला मोठी ऑफर

    Bigg Boss OTT 2 मध्ये मिया खलीफा हिची एन्ट्रीची चर्चा; सीझन 2 यशस्वी करण्यासाठी निर्मात्यांची जोरदार तयारी…ॲडल्ट स्टारला देण्यात आलीये मोठी ऑफर?… वाचा सविस्तर

    ‘बिग बॉस ओटीटी 2’ शोची सुरुवार १७ जून पासून होणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’ प्रेक्षकांनी जियो सिनेमावर पाहता येणार आहे. यावेळी ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये जंगल थीम असणार आहे. पहिल्या सीझनची विजेती अभिनेत्री दिव्या अग्रवाल होती. आता ‘बिग बॉस ओटीटी 2’ची ट्रॉफी कोण घरी घेवून जातं पाहणं मजेशीर असणार आहे.

  • 11 Jun 2023 12:13 PM (IST)

    ठाकरेंनी शाहांच्या प्रश्नांची उत्तर द्यावीत – गिरीश महाजन

    तुम्ही मुख्यमंत्री असताना घरात बसून राहिलात, एकही दिवस मंत्रालयात आला नाहीत… अशी टीका गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी तत्त्वांशी तडजोड केली. ठकरेंनी शाहांच्या प्रश्नांची उत्तर द्यावीत असं देखील गिरीश महाजन म्हणाले…

    ठाकरेंनी स्वतःचा पक्ष संपवला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कळेल परिस्थिती काय आहे.. असं देखील गिरीश महाजन म्हणाले…

  • 11 Jun 2023 12:04 PM (IST)

    पुणे | कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यावर सुप्रिया सुळे थेट पुण्यात

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यावर सुप्रिया सुळे थेट पुण्यात दाखल झाल्या आहेत. पुण्यातील गांधी भवनात गांधी स्मारकाला सुप्रिया सुळे यांच्याकडून अभिवादन करण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडून नागरिकांच्या ,कलाकारांच्या, उद्योगपतींच्या, भेटीगाठीला सुरुवात झाली आहे. राहुल देशपांडे देखील सुप्रिया सुळे यांच्या भेटीला आले आहेत..

  • 11 Jun 2023 11:58 AM (IST)

    ओडिशातील ४२ जनावरे तेलंगणात नेत असताना महाराष्ट्र सीमावर्ती भागात पोलिसांनी पकडले

    गडचिरोली जिल्ह्यातीस ओडिशातील ४२ जनावरे तेलंगणा राज्यात नेत असताना महाराष्ट्र सीमावर्ती भागात पोलिसांनी पकडले. एका ट्रकमध्ये ४२ जनावरे कोंबून नेत असताना पोलिसांच्या तपासणी दरम्यान लक्षात आलं. या जनावरांना असरअली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जीवनदान दिले आहे. यामध्ये तेलंगणातील दोन आरोपी आणि नागपूर येथील एक आरोपीला अटक करण्यात आली.

  • 11 Jun 2023 11:52 AM (IST)

    बॉलिवूड अभिनेता साहिल खान आणि इतरांविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल

    आंबोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीने अभिनेता साहिल खान याच्याविरुद्ध ऑनलाइन सोशल मीडियावर बदनामीचा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता साहिल खान वर सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप आहे.पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या तक्रारीवरून विविध कलमांखाली एफआयआर नोंदवून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मनीष गांधी असे तक्रारदाराचे नाव असून तो इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम करतो.

  • 11 Jun 2023 11:50 AM (IST)

    बीडच्या मध्यवर्ती बस स्थानकाची मोठी दुरावस्था, मूलभूत सुविधाच नाही

    बीडच्या मध्यवर्ती बस स्थानकाची मोठी दुरावस्था पाहायला मिळतेय. जिल्ह्यातील मध्यवर्ती बस स्थानक असताना देखील हे बस स्थानक प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्यापासून दूर आहे. या बस स्थानकातून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. तर 400 हून अधिक बस फेऱ्या याच बस स्थानकातून होत असतात. बस स्थानकातील दोन्ही पाणपोई बंद अवस्थेत आहेत. तर पावसाचे पाणी साचल्याने बस स्थानक परिसराला तळ्याचं स्वरूप आले आहे.

  • 11 Jun 2023 11:45 AM (IST)

    मान्सूनपूर्व पेरणीला वेग, चोपडा तालुक्यातील मजूर टंचाईवर शेतकऱ्यांची मात

    मान्सूनपूर्व पेरणीला आता वेग आला असून मजूर टंचाई असल्याने शेतकरी आता पारंपरिक अवजारे न वापरता नवनवीन तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात शेतीची कामे करू लागला आहे. जळगाव जिल्ह्यात शेतकरी मान्सूनपूर्व पेरणी शेतात करू लागल्याने शेतमजूरांची वाढती रोजंदारी शिवाय वेळेवर शेतमजूर उपलब्ध होत नसल्याने याला पर्याय म्हणून बाजारात अगदी सहजपणे एक माणूस सहजगत्या चालवू शकतो, असे पेरणी यंत्र आणून त्याद्वारे मका आणि अन्य वाणाची शेतीयंत्राद्वारे कमी खर्चात आणि कमी वेळात पेरणी करू लागले आहेत. चोपडा तालुक्यातील लासूर येथील प्रगतशील शेतकरी विश्वास पाटील यांनी बाजारातून पेरणी यंत्र आणून आपल्या शेतात मका वाणं पेरणी केलीय. 10 मजुरांचे काम या यंत्रामुळे एकट्या मजुराने करणे शक्य आहे. यामुळे शेकऱ्याला आर्थिक आणि वेळेची बचत करता आली आहे.

  • 11 Jun 2023 11:42 AM (IST)

    अमरावती जिल्ह्याच्या बोराळ्यात खारपान पट्ट्यातील गोड पाण्याच्या प्रकल्पाची गडकरींकडून पाहणी

    अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथे पूर्णा नदीच्या खारपाण पट्ट्यातील खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्याच्या ऐतिहासिक प्रयोगाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. खाऱ्या पाण्याला गोड पाण्यात रूपांतर करणारा हा पहिला प्रायोगिक प्रयोग असून या प्रयोगामुळे अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील ८९४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, या प्रकल्पाला प्रायोगिक तत्वावर शासनाने दीड कोटी रुपये दिले आहेत. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर या तीन जिल्ह्यांमध्ये साडेनऊशे अशा प्रकारचे प्रकल्प उभारून हा जिल्हा खालपान मुक्त होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पामुळे जमिनीपासून केवळ ५० फुटांवर गोड पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. खारपण पट्ट्यातील खाऱ्या पाण्यामुळे ओलित करणे शक्य नव्हते मात्र या प्रकल्पामुळे आता खारपण पट्यातील शेतकरी 2 ते 3 पिके घेऊ शकणार आहे. खाऱ्या पाण्यातील झिंग्यांना बाहेर देशात मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी झिंग्याच्या शेतीवर भर द्यावी त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी 50 लाख रुपयाचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा पत्र दिले आहे. या ठिकाणी तलाव बांधून खाऱ्या पाण्यातील झिंगे तयार झाले तर संपूर्ण जगात एक्स्पोर्ट करता येईल, येथे शेतकरी समृद्ध होईल असे यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळ यांनी सांगितले

  • 11 Jun 2023 11:29 AM (IST)

    शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई

    शहापूर तालुक्याच्या कोथले या आदिवासी गावात भीषण पाणी टंचाई आहे. सकाळी 8 वाजता पाण्याचा एक टँकर कोथले गावापासून 2 किलो मीटर अंतरावर असलेल्या दरी मधील विहीरीत टाकला जातो. विहिरीपर्यंत टँकर जात नाही, साधरण 800 मीटरवरून विहीरीत पाईपने पाणी टाकले जाते. सकाळी 6 वाजल्यापासून महिला भगिनी टँकरची वाट बघत बसलेल्या असतात. टाकलेला पाण्याचा एक टँकर अर्धा तास ही पुरत नाही. हंडाभर पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत आहे. तर काही महिलांना पाणी सुद्धा मिळत नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी टँकरची वाट बघत रहावे लागत असल्याचे वास्तव शहापूर तालुक्याच्या कोथले या गावात आहे.

  • 11 Jun 2023 11:23 AM (IST)

    तुकोबांच्या चरणी आमदार रोहित पवार लीन

    जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी आकुर्डीकडे प्रस्थान ठेवण्यापूर्वी इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे दर्शन आमदार रोहित पवार यांनी घेतले. महाराष्ट्राचे कल्याण होऊ दे, भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील राजकारण पातळी खालावून समाजकारण वजा होत आहे. तर महाराष्ट्रतील राजकारण हे समाजकारण जास्त होऊ दे अशी तुकोबांच्या चरणी प्रार्थना केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदी सुप्रिया सुळे यांच्या नियुक्तीवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, सुप्रिया सुळे यांना 15 वर्षांचा दिल्लीतील अनुभव आहे. त्याचा फायदा पक्षाला होईल त्यामुळेच पवार साहेबांनी हा निर्णय घेतला आहे.

  • 11 Jun 2023 11:19 AM (IST)

    गेल्या ९ वर्षातील योजनांची माहिती देणारी व्हॅन आषाढीवारीत दिसणार – चंद्रकांत पाटील

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब घराण्यातून असल्यामुळे त्यांनी देशातील गरीब लोकांसाठी अनेक योजना या गेल्या नऊ वर्षात आणल्या आहेत. यामुळेच या योजनांची माहिती देणारी व्हॅन आषाढीवारीमध्ये सगळ्यांना दिसून येईल, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले तर भारताची प्रतिमा जगात काहीशी वाईट होती, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यवस्थित केली. जी २० निमित्त पाहुणे पुण्यात येत असल्यामुळे त्यांच्यासाठी आषाढी वारी ही नवीन आहे. याच आषाढी वारीचे चित्र त्यांना उद्या अनुभवता येईल यामुळेच उद्या विशेष आयोजन पुण्यात करण्यात आल्याची माहिती चंद्रकात पाटील यांनी दिली.

  • 11 Jun 2023 11:11 AM (IST)

    सातारा महामार्गावर भीषण अपघात, खाजगी बस पलटी अन् 4 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर

    सातारा महामार्गावर वरवे गावाच्या हद्दीत भीषण अपघात घडला. 4 वाहन एकमेकांना धडकल्यानं हा अपघात झालाय, वाहनांमध्ये 2 कंटेनर आणि 2 बसचा समावेश आहे. यामध्ये खाजगी बस पलटी झाल्यानं 4 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. वाहनं पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य करण्यात आलं आहे. अपघातानंतर काहीकाळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.

  • 11 Jun 2023 11:07 AM (IST)

    मुंबईत आज मनसेचा पाचवा वर्धापन सोहळा

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे रस्ते, साधन सुविधा व आस्थापना विभागाचा आज पाचवा वर्धापन सोहळा होतोय. मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे हा वर्धापन सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. आपत्ती व्यवस्थापनात भरीव कामगिरी केलेल्या मनसैनिकांचा आणि इतरांचा आज या कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे.

  • 11 Jun 2023 10:56 AM (IST)

    रानगव्याच्या हल्ल्यात युवक जखमी

    रानगव्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे. समुद्रपुर तालुक्यातील रासा शिवारात ही घटना घडली, जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • 11 Jun 2023 10:50 AM (IST)

    राजस्थानच्या राजकारणात आज मोठा भूकंप ?

    राजस्थानच्या राजकारणात आज मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट मोठा निर्णय घेणार असल्याची सगळीकडं चर्चा आहे. आज राजेश पायलट यांची पुण्यतिथी आहे. वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त सचिन पायलट मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. सचिन पायलट काँग्रेसला सोडचिट्टी देणार ? संपूरण देशाचे लक्ष लागलं आहे.

  • 11 Jun 2023 10:43 AM (IST)

    महाराष्ट्र शासनाद्वारे पीसीआरएस ॲप विकसित, रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार

    खड्डेमुक्त रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे पीसीआरएस ॲप विकसित केले आहे. या माध्यमातून वाशिमच्या सार्वजनिक विभागाने जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांनी पीसीआरएस हा अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करून घ्यावा. त्याचबरोबर सार्वजिनक बांधकाम विभागाला रस्त्याच्या स्थितीसह खड्याबाबत तक्रारी केल्यास त्याचे ७२ तासांत निरसन होणार होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.

  • 11 Jun 2023 10:22 AM (IST)

    मुलीला न्याय मिळावा यासाठी आरपीआयकडून आंदोलन

    चर्चगेट वसतिगृहातील मुलीच्या हत्येनंतर न्याय मिळावा, यासाठी आरपीआयचे कार्यकर्ते आज साडेअकरा वाजता कांदिवली रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन करणार आहेत.

  • 11 Jun 2023 10:14 AM (IST)

    अमित शहांच्या डोक्यात अजूनही ठाकरे आणि शिवसेनेचं भय कायम – संजय राऊत

    कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून भाजप निवडणुकीच्या प्रचारात आहे. अमित शहांच्या डोक्यात अजूनही ठाकरे आणि शिवसेनेचं भय कायम आहे. महाराष्ट्रातील जनता अमित शहांपेक्षा ठाकरेंवर अधिक विश्वास ठेवते अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवरती केली.

    शहांनी विचारलेल्या प्रश्नावर भाजपने चिंतन करायला हवं, भाजपने केलेल्या चक्रव्यूहात सध्या तेचं अडकले आहेत. शिवसेनेतून फुटलेल्या गटाला भाजपने आता मांडीवर बसवलं आहे. शिवसेना आणि ठाकरे हे खरे वाघ आहेत असं उत्तर राऊतांनी फडणवीसांना दिलं आहे. कोल्हे आणि लांडगे वाघाचं कातडं घालून फिरत आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

  • 11 Jun 2023 10:07 AM (IST)

    मल्टीमीडिया प्रदर्शिनी व्हॅनचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते

    पालखी मार्गांवर जाणाऱ्या मल्टीमीडिया प्रदर्शिनी व्हॅनचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री यांच्या हस्ते या गाड्यांचे अनावरण झाले. या वाहनांवर कला पथक यांचे प्रदर्शन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत योजनांच्या माहिती एलईडी टिव्ही वरुन देण्यात येणार आहे. ही दोन्ही वाहने संत तुकाराम महाराज पालखी आणि त्याबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी बरोबर पंढरपूरपर्यंत असतील.

  • 11 Jun 2023 10:05 AM (IST)

    वर्ध्यात पोलिस पथकाकडून ४६ हजारांचा दारुचासाठा जप्त

    वाहन, दारू साठ्यासह चार लाख ४६ हजारांचा मुद्देमाल वर्धा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने ही कारवाई केली आहे.

  • 11 Jun 2023 10:00 AM (IST)

    बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासांत तीव्र रुप धारण करणार

    बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासांत तीव्र रुप धारण करणार असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर जाणवू शकतो. मात्र मुंबईला त्याचा फारसा धोका नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे 700 किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला 630 किमीवर आहे. आगामी 24 तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि गुजरातमध्येही जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

  • 11 Jun 2023 09:55 AM (IST)

    अरुणाचल प्रदेशात 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप

    अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यात सकाळी 6.34 च्या सुमारास 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

  • 11 Jun 2023 09:49 AM (IST)

    इंडिगोच्या दिल्ली-चेन्नई फ्लाइटचं आपत्कालीन लँडिंग

    इंडिगोचं दिल्ली-चेन्नई फ्लाइट (6E-2789) शनिवारी रात्री टेक-ऑफच्या तासाभरात इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतलं. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमानाने आपत्कालीन लँडिंग केलं. विमानात 230 हून अधिक प्रवासी होते. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी दिली माहिती.

  • 11 Jun 2023 09:42 AM (IST)

    ओडिशातील रेल्वे अपघातप्रकरणाच्या तपासासाठी बहनगा रेल्वे स्थानक बंद

    ओडिशातील रेल्वे अपघाताची चौकशी सीबीआयने हाती घेतली आहे. पुढील आदेशापर्यंत बालोसर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर कोणतीही रेल्वेगाडी थांबणार नाही. सीबीआयने हे स्थानक आपल्या ताब्यात घेऊन इथलं लॉग बुक आणि उपकरणं तपासासाठी जप्त केली आहेत. तिथं 2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात 288 लोकांचा मृत्यू झाला होता. तर एक हजार 208 जण जखमी झाले होते.

  • 11 Jun 2023 09:35 AM (IST)

    पुणे : पालखी सोहळ्यासाठी पुण्यनगरीदेखील सज्ज

    उद्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल होणार आहेत. 12 आणि 13 जूनला दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असतील. तर 14 तारखेला सकाळी 6 आणि 7 वाजताच्या सुमारास दोन्ही पालख्यांचं पुण्यातून प्रस्थान होणार आहे. निवडुंगा विठोबा मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी मुक्कामी असेल. निवडुंगा विठोबा मंदिराकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

  • 11 Jun 2023 09:28 AM (IST)

    झारखंडमधील बंदचा आज दुसरा दिवस

    रांची : झारखंड स्टेट स्टुडंट्स युनियनने (JSSU) राज्य सरकारच्या 60-40 फॉर्म्युल्यावर आधारित नवीन भरती धोरणाविरोधात संप सुरू केला आहे. आज बंदचा दुसरा दिवस आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. “आम्ही गस्त घालत आहोत, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्या इथं परिस्थिती सामान्य आहे,” अशी माहिती डीएसपी प्रकाश सोय यांनी दिली.

    पहा व्हिडीओ

  • 11 Jun 2023 09:21 AM (IST)

    अंबरनाथमधील कारखान्याच्या आगीत एकाचा मृत्यू, पाच जखमी

    अंबरनाथमधल्या एका रासायनिक कारखान्यात शनिवारी दुपारी स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला. तर पाच कामगार जखमी झाले आहेत. अंबरनाथच्या पश्चिमेकडील एमआयडीसीत ‘ब्ल्यू जेट हेल्थकेअर’ कंपनीत ही दुर्घटना घडली. या कंपनीतील नायट्रिक ॲसिडच्या टाकीतून गळती झाल्यानंतर स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत सूर्यकांत जिमात या कामगाराचा मृत्यू झाला.

  • 11 Jun 2023 09:14 AM (IST)

    येत्या 48 तासांत मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमनाचा अंदाज

    बिपरजॉय चक्रीवादळ 24 तासांत तीव्र होण्याचा अंदाज असून मुंबई-ठाण्याला फारसा धोका नाही. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात जोरदार वाऱ्यांमुळे धूळ आणि वाळूचे लोट पसरले आहेत. तर समुद्रही खवळलेला आहे. वादळी वाऱ्यामुळे मुंबईसह उपनगरात 16 वृक्ष उन्मळून पडले. येत्या 48 तासांत मोसमी पाऊस महाराष्ट्रात आगमनाचा अंदाज वर्तवला जात आहे.

  • 11 Jun 2023 09:08 AM (IST)

    अभिनेते मंगल ढिल्लन यांचं निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी

    लुधियाना : मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते मंगल ढिल्लन यांचं आज (रविवार) निधन झालं. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. जवळपास महिनाभरापासून ते लुधियाना इथल्या एका रुग्णालयात दाखल होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • 11 Jun 2023 09:01 AM (IST)

    एकनाथ खडसे प्रकाश आंबेडकरांबद्दल काय म्हणाले?

    संसद भवनाचे उद्घाटन अलीकडच्या कालखंडात होऊन गेलय. ज्या वास्तुचे उद्घाटन झाले आहे, परत त्या वास्तूचे उद्घाटन करण्याची भूमिका प्रकाश आंबेडकर घेत असतील तर समाजाला कितपत हे पचेल हे मला नाही सांगता येणार, असं एकनाथ खडसे म्हणाले.

  • 11 Jun 2023 08:58 AM (IST)

    पावसाआधी क्रिकेट विश्वाला नवीन टेस्ट चॅम्पियन मिळणार?

    भारत आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी सामना अत्यंत रंगात आला आहे. आजच्या शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी भारताला पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. तर भारताला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियालाही आपली रणनीती बदलावी लागणार आहे. वाचा सविस्तर….

  • 11 Jun 2023 08:56 AM (IST)

    Amazon Forest : Amazon च्या खतरनाक जंगलात ‘त्या’ 4 मुलांची 40 दिवस मृत्यूशी झुंज, कसे राहिले जिवंत?

    Amazon च जंगल इतकं भितीदायक का मानलं जातं? महत्वाच म्हणजे ही 4 मुल Amazon च्या जंगलात कशी जिवंत राहिली? या मुलांना शोधण्यासाठी एक देशाने कसं राबवलं रेसक्यू ऑपरेशन? वाचा सविस्तर…..

  • 11 Jun 2023 08:55 AM (IST)

    जम्मू-काश्मीरमधून एकमेव मुलगी UPSC परीक्षेत पास

    जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातून सिमरन बाला UPSC परीक्षा पास झाली. यावर्षी जम्मू-काश्मीरमधून UPSC परीक्षा पास होणारी ती एकमेव मुलगी आहे. “जम्मू-काश्मीरमधून ही परीक्षा पास होणारी मी एकमेव मुलगी आहे. याचा मला अभिमान आहे” असं सिमरन बालाने सांगितलं.

  • 11 Jun 2023 08:33 AM (IST)

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा आज 4 वाजता संपन्न होणार आहे. देवस्थानकडून याची जय्यत तयारी झाली आहे. प्रस्थान सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रम असून पहाटे 4 वाजता घंटानादाने प्रस्तान सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. त्यानंतर काकडा आरती, पावमान अभिषेक, पांचानामृत व दुधाभीशेक, महाअभिषेक करण्यात आले असून 9 वाजता काल्याच्या कीर्तनाला सुरवात होईल.

  • 11 Jun 2023 08:30 AM (IST)

    डीके शिवकुमार महाकालेश्वरच्या दर्शनाला

    “महाकालेश्वरने कर्नाटकाच्या जनतेची सेवा करण्यासाठी सरकार दिलं आहे. मी निवडणुकीआधी सुद्धा इथे आलो होतो. आज आम्ही एका कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. कर्नाटकातील सर्व महिलांना बसने मोफत प्रवास करता येणार आहे. आम्ही जी पाच आश्वासन दिली, त्याची अमलबजावणी करणार आहोत” असं कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितलं.

  • 11 Jun 2023 08:19 AM (IST)

    प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैकच्या कारचा भीषण अपघात

    प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉसची विनर रुबीना दिलैकच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिच्या कारचा चक्काचूर झाला आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर….

  • 11 Jun 2023 08:14 AM (IST)

    यवतमाळमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या

    यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढलय. अक्षय कैथवास नामक तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शहरातील पांढरकवडा मार्गावरील घटना आहे. पैशाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती आहे. हत्येचे cctv फुटेज व्हायरल झालय.

  • 11 Jun 2023 08:09 AM (IST)

    कल्याण नंतर आता सोलापूर जिल्ह्यात भाजपा-शिवसेनेमध्ये धुसफूस

    कल्याण नंतर आता सोलापूर जिल्ह्यात देखील भाजपा-शिवसेनेत धुसफूस सुरु झाली आहे. शिंदे गटाच्या नेत्यांना भाजपाचे पालक मंत्री, खासदार वेळ देत नाहीत. फक्त भाजपच्याच नेत्यांची कामे होतात असा तक्रारीचा सूर आहे. आमची कामे न करता भाजपा, शिवसेनेच्या नेत्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप शिंदे गटाचे संपर्कप्रमुख संजय कोकाट यांनी केलाय.

  • 11 Jun 2023 08:00 AM (IST)

    कल्याण पूर्व चिंचपाडा गावात भंगाराच्या दुकानाला भीषण आग, दुकान जळून खाक

    कल्याणच्या चिंचपाडा परिसरात एका भंगारच्या दुकानाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत भंगारचं दुकान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. रहिवाशी वस्तीमध्ये हे भंगारच दुकान असल्याने आग लागल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. आग विझवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

  • 11 Jun 2023 07:56 AM (IST)

    घरात एकटी असल्याची संधी साधून तरुणीवर अत्याचार, कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना

    कल्याण पूर्वेत एका तरुणीवर घरात घुसून तरुणाने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या बहिणीने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच मानपाडा पोलिसांनी काही तासांतच सागर गाडे नराधमाला अटक केली आहे. घरात एकटी अससल्याची संधी साधून तो तिच्यावर अत्याचार करत असल्याचं उघड झालं आहे.

  • 11 Jun 2023 07:46 AM (IST)

    नाशिकच्या कळवण, सुरगाणाच्या घाट माथ्याला पावसाने झोडपले, सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस

    नाशिकच्या कळवण, सुरगाणा येथील घाट माथ्याला लागून असलेल्या भागाला पावसाने चांगलेच झोडपले आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणीं झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी घरांची छते देखील उडाली. कनाशी, अभोना, बोरगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी उकाड्यापासून हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

  • 11 Jun 2023 07:32 AM (IST)

    पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलीस प्रशासन सज्ज, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    पालखी सोहळा बंदोबस्तासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह 6000 पोलीस कर्मचारी पुणे शहरात तैनात असणार आहे. 12 आणि 13 जूनला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात मुक्कामी असणार आहे. त्यामुळे पालखी मार्ग, विसावा, मुक्कामाचे ठिकाण आदी ठिकाणी सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. G-20 च्या पाहुण्यांना पालखी सोहळा पाहण्यासाठी FC रोडवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 11 Jun 2023 07:30 AM (IST)

    संत तुकाराम महाजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, हजारो वारकरी एकवटले

    जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. इनामदार वाड्यातील पहिल्या मुक्कामानंतर आज सकाळी 10 च्या सुमारास पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. देहूच्या वेशीवर असलेल्या अनगड शहा बाबा दर्ग्याच्या ठिकाणी पालखीची पहिली आरती होईल. मग, पुन्हा पंढरपूरच्या दिशेने पालखी मार्गस्थ होईल. दरम्यान, आजचा मुक्काम हा पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात असेल. शहरातील शेकडो नागरिक याठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात.

  • 11 Jun 2023 07:16 AM (IST)

    बुलडाण्यातील खामगाव शहरात भयंकर आग, आगीमुळे संपूर्ण वस्तीच रिकामी केली

    बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या लक्कडगंज परिसरातील एका प्लास्टिक आणि ऑईल पेंट गोडाऊनला काल रात्री भीषण आग लागली. आगीचे लोट जवळच असलेल्या वस्तीमध्ये शिरत असल्याने तत्काळ वस्ती खाली करण्यात आली. आगीने उग्र रूप धारण केल्याने आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. गोडाऊनला आग लागल्याने गोडाऊनच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. अग्निशमन दलाने रात्री उशिरा या आगीवर नियंत्रण मिळविले असून या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

  • 11 Jun 2023 07:14 AM (IST)

    यवतमाळमध्ये तरुणाची गोळी झाडून हत्या, आरोपी फरार

    यवतमाळ शहराच्या नागपूर रोडवरील मलिक लॉनजवळ एका 27 वर्षीय तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप घटनास्थळी दाखल झाले. अक्षय कैथवास असं मृतकाचे नाव असून पैशाच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे.

  • 11 Jun 2023 07:11 AM (IST)

    पालखी सोहळ्या दरम्यान पुणे शहरात ड्रोनवर बंदी, पोलिसांचे आदेश

    पालखी सोहळ्यादरम्यान छायाचित्रणासाठी ड्रोन वापरता येणार नाही.12 जून ते 15 जून दरम्यान ड्रोन कॅमेऱ्यावर शहरात बंदी घालण्यात आली आहे. पुणे पोलीस प्रशासनाचे आदेश.पालखी काळात ड्रोनच्या वापराचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. म्हणून पुणे पोलिसांकडून ही बंदी घालण्यात आली आहे. तसेच या काळात पोलीस शहरात ड्रोनवर विशेष लक्ष ठेवणार असून त्याचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे.

Published On - Jun 11,2023 7:07 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.