मुंबई | 27 ऑगस्ट 2023 : मुंबई-गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) आज पहाटेपासून जागर पदयात्रेला सुरुवात झाली आहे. मनसेचे युवानेते अमित ठाकरे (Amit tackeray) यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली असून सरकारला जागे करण्यासाठी १६ किलोमीटर पायी पदयात्रा होणार आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी जागर यात्रा सुरू होण्यापुर्वी शिव मंदिराचे दर्शन घेतले आहे. गेल्या 17 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे. झालेलं काम किती निकृष्ठ दर्जाचं होतं, हे दाखवण्यासाठी आज जागर यात्रा काढली आहे. त्यामुळे लोकांना मनसेची ताकद किती आहे हे सुध्दा समजेल असं मनसेच्या एका नेत्याने वक्तव्य केलं आहे. जागर पदयात्रेत मनसेचे अनेक नेते कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
गांधीनगर | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. उद्या (28 ऑगस्ट) सकाळी अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. औरंगाबादच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री गुजरातला गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीड | “पश्चिमकडे पडणारे पाणी पूर्वेकडे वळवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही अडीच वर्षे उद्धव ठाकरेच्या मंत्री मंडळात होतो नंतर ते सरकार पडले. मात्र त्यानंतर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सत्तेत सामील झालो” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
बीड | “कांद्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा अनेकांचे फोन आले. विरोधक कायम काहीतरी चुकीची माहिती देतात. मी धनंजयला दिल्लीला जायला सांगितले. धनंजय गेला आणि जास्तीत जास्त मदत करण्याची विनंती केली. त्यावर अमित भाई शाह यांनी तात्काळ 2 लाख मेट्रिक टन कांदा 24 रुपये प्रतिकिलो रुपयाने खरेदी केला.
“मी देखील शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो. शेतकरी हीच माझी जात आहे. शेतात पाणी आल्याशिवाय शेती होत नाही. जलसंपदा मंत्री असताना खूप कामं केले”, असं अजित पवार म्हणाले.
बीड | महाराष्ट्रातील सर्वाना सांगायचे आहे की, आम्ही महायुतीत असलो तरी सर्व जाती धर्माचे लोकांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. केंद्र आणि राज्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाच्या असतात. 1 रुपयाच्या पीक विम्यामुळे अनेकांनी विमा उत्तरवला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 4500 कोटींचा बोजा आला मात्र आम्ही तो सहन करतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव कार्य करणार.”, असा शब्द अजित पवार यांनी बीडमधील जाहीर सभेतून शेतकऱ्यांना दिला.
बीड | “आम्ही राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतला. राजकारणात कोणी कायमचा दुश्मन आणि कायमचा मित्र नसतो. हे राजकारण आहे”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच “मराठवाडा ही संतांची भूमी आहे. बीड ही कष्टकरी बांधवांची भूमी आहे. आम्ही महापुरुषांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होणारी माणसं आहोत. बीडची जनता ही राजकारण, समाजकारणाबाबत जाणकार आहोत” असं म्हणत अजित पवार यांनी बीडमधील जनतेचे कौतुक केलं.
बीड | अजितदादा तुमचे नेते आहेत तर त्यांना पाठिंबा देऊन टाका. पवारसाहेब तुम्ही काय बोलता?, हे आम्हाला समजतच नाही. आधी तुम्हीच सत्तेत सहभागाच्या बैठका घेत होतात. गुगलीमध्ये स्वत:चा गडी बाद करतात का?, असे अनेक प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर घणाघात केला.
बीड | “राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजित पवार हेच आहेत. जनतेचा महासागर सांगतोय राष्ट्रवादी अजित दादांसोबतच”, असं छगन भुजबळ बीडमधील जाहीर सभेत म्हणाले.
बीड | जुलै महिन्यात अजित पवार यांच्यासोबत पहिल्या फळीतील नेते भाजपसोबत सत्तेत सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत फुट पडली. मात्र राष्ट्रवादीत फुट पडली नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आता बीडमधील जाहीर सभेत प्रफुल्ल पटेल यांनीही राष्ट्रवादीत फुट नाहीच, असं स्पष्ट केलं.
धनंजय मुंडे म्हणाले की, मला अनेक जणांनी म्हंटले, भगवान बाबांच्या गडाचा पायथा माहिती नाही. मी भगवान बाबाचा भक्त म्हंटले तर ठीक होते पण मी पण वंजारी असे साहेबासमोर म्हणणे कितपत योग्य आहे. दादांना कोण लबाड म्हणत असेल तर हे शोभते का? त्यामुळे त्यांच्यावर कोणाचे संस्कार आहेत हे माहिती नाही. साहेबाचे तर नक्की नाही.
बीड | “कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्यासमोरच जाहीर सभेत 2019 च्या पहाटेच्या शपथविधीवरुन मिश्किल टोला लगावला. मला पहाटे उठण्याची सवय नाही, मला 2019 चं माहिती नाही”, असं म्हणत धनजंय मुंडे यांनी मिश्किल टोला लगावला.
बीड | “शरद पवार यांनी माझा इतिहास काढला. तर लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे हा माझा इतिहास आहे. माझी कर्तबगारी पवारांच्या पुस्तकात, हाच माझा इतिहास आहे. विधानपरिषदेतील माझ्या कामगिरीचं पवारांच्या पुस्तकात कौतुक केलं आहे”असं धनजंय मुंडे म्हणाले. ते बीडमधील जाहीर सभेत बोलत होते.
बीड | बीडमधील जाहीर सभेतून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “जिल्ह्याने साहेबांना भरपूर प्रेम दिले पण जिल्ह्यातील जनतेला शरद पवार साहेबांनी काय दिले हा प्रश्नचिन्ह आहे”, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
दादांनी दोन महिन्यात घेतलेले निर्णय हे कामगार, महिला भगिनीसाठी आहे, असे बीडच्या सभेत रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. पुढे रुपाली चाकणकर म्हणाल्या की, संकल्प आणि सिद्धी असलेले लोकांना सहज पार करतात. वो आकाश क्या जिसमे तारे ना हो, वो समदंर क्या जिसमे पाणी ना हो….और ओ जिंदगी क्या जिसमे संघर्ष ना हो…
बीडमधील अजित पवार यांच्या सभेत बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, आजची सभा उत्तरसभा नव्हे, तर जनतेच्या उत्तरदायित्वासाठी सभा आहे. बीडमधील दुष्काळ कायम मिटवण्यासाठी आजही सभा आहे. मी जे बोलतो, ते करून दाखवतो, असा अजित पवार यांचा स्वभाव आहे. एकच वादा, अजित दादा असं उगचं म्हणत नाही, असंही मुंडे यांनी म्हटलं.
बीड | “मला अनेकांनी विचारले की, 27 तारखेची सभा 17 तारखेला झालेल्या सभेला उत्तर आहे का? मी नम्रपणे सांगितले की ही उत्तर सभा नाही तर ही सभा उत्तरदायित्वाची सभा आहे”, असं कृषिमंत्री धनंजय मुंडे बीडच्या जाहीर सभेत म्हणाले.
दादांनी दोन महिन्यात घेतलेले निर्णय हे कामगार, महिला भगिनीसाठी आहे. दोन दिवसात रक्षा बंधन आहे आणि महाराष्ट्रातील महिला भगिनीना ओवाळणी देणार. एखाद्या वटवृक्षाखाली एखादे वृक्ष वाढत नसले तरी त्याची पाळमुळं फार खोलवर पसरलेली असतात. काल बारामतीतील स्वागताने ते दाखवून दिले – रुपाली चाकणकर (अध्यक्ष, राज्य महिला आयोग)
बीड : येथील सभेत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणाचा निषेध करतो. आम्ही उठाव नाही, तर सामूहिक निर्णय घेतला. त्यानंतर सत्तेत सहभाग घेतला. राज्यातील रुग्णालयांचा एम्सच्या धर्तीवर विकास करणार आहोत, असं आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.
बीड जिल्ह्याची बारामती करण्यासाठी आपण जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे, असे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे. आमदार प्रकाश सोळंके हे बोलत होते. पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राची स्थापना होऊन 64 वर्षे झाली पण मराठवाडा दुष्काळमुक्त झाला नाही. आमची तहान भगवायची असेल तर कोकण आणि नाशिक मधून पाणी गोदावरी खोऱ्यात आणावे लागेल
प्रत्येक वेळी अजितदादा गुन्हेगार कसे काय होऊ लागले आहेत, असे मोठे विधान बीडमधून अमरसिंह पंडित यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, राज्याच्या राजकारणात प्रत्येकवेळी अजितदादा विलन का?. यापुढे आम्ही साहेबांचे फोटो लावणार नाहीत. मी अजितदादाचा कार्यकर्ता आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बीडमध्ये सभा घेतली. त्यानंतर अजित पवार यांची सभा बीडमध्ये होत आहे. या सभेला प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित आहेत. अजित पवार हे शरद पवार यांच्या बीडमधील सभेनंतर ही सभा घेत असल्याने अजित पवार काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंगोलीतील सभेसाठी आजुबाजूच्या जिल्ह्यातून माणसे आणण्यात आली, असा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला. खंडणी वसूल करुन, अधिकाऱ्याकडून पैसे घेऊन ही सभा घेतल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा नसल्याचा टोला ही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. अजित पवार हे बीडमध्ये सभेसाठी रवाना झाले आहे. त्यापूर्वी ट्विट करत त्यांनी टीका केली. बारामतीमधील विकासाची कामं पाहता, अजित पवार हे कामाला खरंच दादा आहेत, असा टोला त्यांनी हाणला.
देश चंद्रावर पोहचला आहे. पण देशातील काही लोक घरात बसून काम करत होते, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. आम्ही त्यांना करंट दिला आणि ते लाईनवर आले, असा चिमटा ही त्यांनी काढला. हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी सर्वांवरच तोंडसूख घेतले.
हिंगोली | “राज्यात दुष्काळ आहे आणि देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. टरबूजालाही पाणी लागतं”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचं नाव न घेता टरबूज असा उल्लेख केला. “फडणवीस यांना मी बोलणं सोडलं मागे मी त्यांना कलंक बोललो,त्यांना फडतूस गीडतुस बोललो तर बोबाटा झाला. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
हिंगोली | आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन हे अहमदाबादमधीन नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलंय. उद्धव ठाकरे यांनी अहमदाबादमध्ये सामन्याचं आयोजन केल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंगोलीतील जाहीर सभेतून प्रश्न विचारला आहे. तुमच्या स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना चालतो, हे कुठलं देशप्रेम आहे, असा प्रश्न उपस्थित करुन ठाकरे यांनी मोदींना देशप्रेमाची आठवण करुन देण्याचा प्रयत्न करुन केला.
हिंगोली | एनडीएचा अमिबा झालाय, असं म्हणत उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवरुन केलेल्या टीकेला टीकेने उत्तर दिलं आहे. आम्हील इंडिया तुम्ही घमेंडिया झाला आहात, असं शब्दात ठाकरे यांनी हल्लाबोल केला. तसेच इंडिया म्हणून आम्ही एकत्र आल्यानंतर पंतप्रधान घसरले”, असंही ठाकरे म्हणाले.
हिंगोली | उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील जाहीर सभेतून आमदार संतोष बांगर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “ज्या गद्दाराला आपण नाक समजून पूजा केली, उलट तोच आपल्यालाच डसायला लागला. तुला पुंगी वाजवली तुला दूध पाजलं. मटक्याचे अड्डे चालवणाऱ्या हिंदुत्ववादी मानायचे का, उद्धटपणा येथे चालणार नाही”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बांगर यांचा समाचार घेला.
हिंगोली | उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील जाहीर सभेतून एकनाथ शिंदे गटावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. मी गद्दारावर वेळ घालनार नाही. मी तुमच्याशी बोलायला आलो आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर हल्लाबोल केला.
हिंगोली | उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे हिंगोलीतील सभास्थळी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे हे शिवसेनेतील पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच हिंगोलीत सभा घेणार आहेत. या सभेतून उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार, याकडे राजकीय विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
नगराध्यक्ष हेमन्द्र ठाकरे आणि 10 राष्ट्रवादीचे आणि 1 भाजप नगरसेवक थेट बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. शनिवारी शरद पवार यांनी बच्चू कडू कोण ओळखत नसल्याचा वक्तव्य केलं होतं.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित आहेत. वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठात हा कार्यक्रम होणार आहे.
उद्धव ठाकरे यांची आज हिंगोलीत जाहीर सभा आहे. पण ठाकरे यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी करु नका.. अशा सूचना पोलिसां दिल्या आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे नांदेडच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
अमित ठाकरे यांनी महामार्गावर १५ किमीचा पायी प्रवास पूर्ण केला आहे. मुंबई – गोवा महामार्गावर मनसेची कोकण जागर यात्रा सुरु आहे. रायगडच्या कोलाडमध्ये आज संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरे यांची सभा होणार आहे.. त्यामुळे आज होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अभिनेते भाजप खासदार सनी देओल यांच्या मुंबईतील जुहू इथल्या बंगल्याच्या लिलावाची नोटीस मागे घेण्यात आली. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सनी दोओल यांना वाचवलं मात्र नितीन देसाई यांना वाचवण्यात आलं नाही, त्यांना स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं…’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप सरकरावर निशाणा साधला आहे…. वाचा सविस्तर
नुकताच ‘ड्रीम गर्ल 2’ प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेत्री अनन्या पांडे स्टारर ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर समाधान कारक कमाई करताना दिसत आहे. पण ‘गदर 2’ सिनेमा प्रदर्शनानंतर 16 व्या दिवशी इतिहास रचला आहे. महत्त्वाचं म्हणजे शनिवार – रविवार असल्याचा फायदा सिनेमाला होताना दिसत आहे…. वाचा सविस्तर
सनी देओलला एक न्याय कारण ते भाजपाचे खासदार आहेत. कारण ते स्टार प्रचारक आहेत . मग आमच्या महाराष्ट्राच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय का? तुम्ही नितीन देसाईला मरू दिलं त्याच्या स्टुडिओचा लिलाव होऊ दिला, असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत.
गेले 17 वर्षे पूर्ण न झालेला मार्ग पाहून मनसे जागर यात्रेत कोकणच्या रस्त्यावर उतरला आहे. हे लोक बोलतायत पूर्ण करतोय मग एखादा पॅच दाखवावा जो व्यवस्थित आहे. महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाला हे एवढ्या वर्षात दिसत आहे. बॅनरमधून देखील दिसत आहे. यांच्याशी चर्चा काय करणार आणि हेच सत्तेत आहेत. खळ खट्याक काय करणार इथे लोकांचे गुडघे लोकांचे तुटायला लागलेत, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे. अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार आणि उत्तरक्रिया आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
आज श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी आहे. त्यानिमित्त विठूरायाच्या दर्शना करता जवळपास तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. दर्शनाची रांग विठ्ठल मंदिरापासून पाच किलोमीटर लांबपर्यंत आहे. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग चंद्रभागा वाळवंट, हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. शिवभक्त आणि विष्णुभक्ताचे प्रतीक म्हणून आजच्या एकादशीला महत्त्व आहे. पहाटेपासूनच विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरिता भाविकांनी गर्दी केली आहे.
श्री विठ्ठलाच्या दर्शना करता जवळपास तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. श्रावणातील एकादशी निमित्त माऊलींचे दर्शन घेण्यासाठी भाविका दाखल झाले आहेत. दर्शनाची रांग विठ्ठल मंदिरापासून पाच किलोमीटरपर्यंत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती झाली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शनिवारी याबाबत निर्णय घेण्यात आला. कुलसचिव प्रफुल्ल पाटील यांनी यासंबंधीचे परिपत्रक जाहीर केले आहे.
चिपळूणमधून मनसेची पदयात्रा सुरू झाली आहे. पदयात्रेच्या माध्यमातून मनसेने शक्ती प्रदर्शन केले आहे.
मनसेचे नेते वसंत मोरे वैभव खेडेकर पदयात्रेत सहभागी झाले आहेत. परशुराम घाटातून पद यात्रेला सुरुवात झाली आहे.
मनसेच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी डोंबिवलीत भाजपकडून खुले चर्चासत्र आयोजित केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई ठाणे डोंबिवली पट्ट्यातील कोकणी चाकरमान्यांना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत शिवसेना ठाकरे गटाकडून खड्डेमुक्त महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अंधेरी पश्चिमेत तहसीलदार कार्यालयच्या समोर रस्त्यावर पडलेला खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून पालिकेच्या निषेध करण्यात आला. तसेच अंधेरी पश्चिमेत तहसीलदार कार्यालयापासून ते संपूर्ण जुहू परिसर जेवी पीडी रोड पर्यंत ठाकरे गटाकडून खड्डेमुक्त महारॅलीचे आज आयोजन करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेली 17 वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाकडे राज्यकर्त्यांच लक्ष वेधण्यासाठी जागर यात्रा काढण्यात आली आहे. मुंबई-गोवा मार्गावरील विविध ठिकाणच्या गावातून टप्याटप्याने ही जागर यात्रा असणार आहे. मनसे आमदार राजू पाटील आणि बाबू वागसकर यांच्या नेतृत्वाखाली नागाठणे ते खांबपर्यंत जागर यात्रा असणार आहे.
मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झालेली आहे. हा मार्ग लवकरात लवकर करण्यात यावा, निकृष्ट दर्जाचे काम देखील करण्यात आलेलं आहे. अनेकांचे बळी गेले आहेत अशी प्रतिक्रिया महिला मनसे पदाधिकाऱ्याने दिली आहे.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची आज उध्दव ठाकरे यांची आज दुपारी जाहीर सभा होणार आहे. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. पक्ष फुटीनंतर उध्दव ठाकरे पहिल्यांदाचा हिंगोली दौऱ्यावर आहेत. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर, खासदार हेमंत पाटील यांनी पक्षातून काढता पाय घेतल्यानंतर पहिली सभा आहे. हिंगोली शहरात ठाकरे गटांकडून मोठी बॅनर बाजी करण्यात आली आहे.
अमित ठाकरेंसोबत मनसेचे कार्यकर्ते आणि नेते आहेत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्याचबरोबर मनसेचे काही नेते टप्याटप्याने सहभागी होणार आहेत.