जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील राजकारण उन्हाळ्यातील पाऱ्याप्रमाणे प्रचंड वाढले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आज पुन्हा एकदा खडसे आणि महाजन यांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची ईडी आणि सीबीआयची चौकशी लावल्यामुळे, एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर मकोका लावला असल्याचे जाहिर वक्तव्य केले होते. त्यामुळे खडसे आणि महाजन हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यावरूनच आजही त्यांनी एकमेकांवर टीका केली आहे.
आज मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.
त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून वाटेल त्या प्रकारची टीका करत असतात. त्यामुळे सध्या एकनाथ खडसे यांचे डोकं तपासायला लागणार आहे असा खोचक टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.
खडसे आणि महाजन यांच्यामध्ये आता एकमेकांवरील आरोपामुळे जुंपली असून एकनाथ खडसे यांनीही त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपवर आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर त्यातच आता गिरीश महाजन यांच्यावर मकोका कायदा लावण्यात आल्याने गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, एकनाथ खडसेंचं डोकं तपासायला लागणार आहे,
कारण त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांना इशारा देत म्हटले आहे की, मला तुम्ही जास्त बोलायला लावू नका, मी तोंड उघडलं तर लोकं तुमच्या तोंडाला काळ लावतील असा त्यांनी इशाराही त्यांना दिला आहे.
तर त्यांचे डोकं तपासायला लागणार असा टोला त्यांनी खडसेंना लगावल्यानंतर आता एकनाथ खडसे यांनीही पलटवार केला आहे. माझं डोकं ठिकाणावर आहे, तुम्ही चिंता करू नका आधी या सरकारचं डोकं ठिकाणावर आणा असा सल्ला एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिला आहे.
कापसाच्या भाव वाढीसाठी विधानसभेतही आवाज उठायचा नाही का, त्यात तुम्ही शेतकऱ्याचे पोरं आहात की नाही? असा सवालही त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना केला आहे. तुम्ही विदेशात फिरता मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास तुम्हाला वेळ आहे की नाही असा जोरदार प्रत्युत्तर त्यांनी त्यांना दिले आहे.