गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात नागझिरा-नवेगावबांध जंगल पसरला आहे. या जंगलात आधी ११ वाघ होते. दोन वाघिणी आणखी चंद्रपूर जिल्ह्यातून आणून सोडण्यात आल्या. त्यामुळे या जंगलात वाघांची संख्या १३ झाली आहे. त्यापैकी एका वाघिणीच्या बछड्याचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना काल रात्री घडली. एका कारच्या धडकेत नर वाघ गंभीर जखमी झाला. जखमी वाघाला उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा येथे हलविण्यात येत होते. मात्र वाटेतच त्या वाघाचा मृत्यू झाला. सदर नर वाघ हा नवेगाव नागझिरा तील T 14 वाघिणीचा 2 वर्षाचा बछडा होता. म्हणजे या जंगलातील तो राजकुमार होता. आज सकाळी 5 वाजता पासून त्याला रिसक्यु करण्याचे प्रयत्न सुरु झाले. सकाळी 7:30 वाजता त्या वाघाला जेरबंद करण्यात यश आले. त्याला उचारासाठी नागपूर येथे नेण्यात येत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.
कारच्या धडकेत या राजकुमार वाघ गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला आणि पाठीला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. या अपघाताची माहिती वनविभाग गोंदियाला मिळाली. वनविभागाने रात्री पासूनच त्या वाघाला शोधण्याचे काम सुरू केले.
सकाळी 5 वाजतापासून त्या राजकुमाराला पकडण्याचे प्रयत्न सुरु केले. सकाळी 7:30 वाजता जखमी वाघाला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर त्याला नागपूर येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. तो वाघ हालचाल करू शकत नव्हता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.
या वाघाचे शवविच्छेदन नागपूर येथील गोरेवाडा येथे करण्यात येणार आहे. त्याच्यावर अंतिम संस्कार नागपूर येथे करण्यात येणार आहेत. मुरदोली जंगल परिसरात नेहमी वाघांचे आणि इतर जंगली प्राण्यांची ये-जा असते.
हायवेमुळे नेहमी वन्यप्राणी कधी जखमी होतात, तर कधी मृत्यूमुखी पडतात. अपघात झालेला परिसरातील हा रस्ता नागझिरा-नवेगाव कॉरिडॉरमधून जातो. वनविभाग आणि प्रशासनाने उपाय योजना करावी, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे.