“गद्दारांना संपविण्याची भाषा राऊत करत असतील तर त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील”; संजय राऊतांवर चमचेगिरीचा केला आरोप…
राज्याला वेळ देणारा असावा लागतो. तसेच पक्ष चालवताना घरात बसून चालवावा लागत नाही अशी खोचक टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
बुलढाणाः ठाकरे गटाकडून शिंदे गटावर गद्दारीचा शिक्का मारलेला असतानाच शिंदे गटाकडून मात्र या आरोपाला जोरदार प्रत्युत्तरही दिले जाते. खासदार संजय राऊत यांच्याकडून वारंवार शिंदे गटावर गद्दारीचा शिक्का मारला जातो, तर त्याला प्रत्युत्तर देताना आता संजय गायकवाड यांनी आम्ही गद्दार नसून खुद्दार असल्याचे सांगत पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार करत असताना संजय गायकवाड म्हणाले की, गद्दारांना संपविण्याची भाषा राऊत करत असतील तर त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील असा जोरदार प्रतिहल्ला त्यांच्यावर करण्यात आला आहे.
खासदार संजय राऊत हे काँग्रेस-राष्ट्रवादीची चमचेगिरी करताता त्यामुळे आता संजय राऊत हे शिवसेना पूर्पणे संपवल्याशिवाय गप्प राहणार नाही असा टोला त्यांना त्यांनी लगावला आहे.
तर त्याच वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी पक्षप्रमुख हा एकदम कार्यक्षम असावा लागतो.
राज्याला वेळ देणारा असावा लागतो. तसेच पक्ष चालवताना घरात बसून चालवावा लागत नाही अशी खोचक टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून जर कोणी फीट असेल तर एकनाथ शिंदे यांच्या रूपाने दिसतात अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांचा गौरव केला आहे.
शिवसेना ही सळसळत्या रक्तावर चालते, मात्र खरी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर चालते, आणि बाळासाहेबांचे विचार आमच्या रक्तात असल्याने आम्ही शिंदे गटाबरोबर गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधताना त्यांनी त्यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला जातो,
तर त्याला प्रत्त्युत्तर देताना ते म्हणाले की, आमच्यावर ज्याप्रमाणे संजय राऊत खोके घेतल्याचा आरोप करतात त्याचा प्रमाणे त्यांना प्रश्न आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचे तुम्ही किती खोके घेतले असा खोचक सवालही त्यांनी त्यांना केला आहे.
तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेला आहात. तर या दोन्ही पक्षाची चमचेगिरी करायचे तुम्हाला किती पैसे भेटतात असा सवालही त्यांनी त्यांना केला आहे.
तुम्ही उठसूठ काँग्रेस राष्ट्रवादीची वफादारी करता मात्र हे शिवसेनेचं उसळते रक्त होऊ शकत नाही. कारण सळसळते रक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे चमचेगिरी करणाऱ्यांनी उसळत्या रक्ताविषयी बोलण्याचा कोणताही अधिकार नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.