K Chandrashekar Rao pandharpur : पंढरपुरात येण्याआधी चंद्रशेखर राव यांचा मटणावर ताव
K Chandrashekar Rao pandharpur : के. चंद्रशेखर राव यांचा हा महाराष्ट्र दौरा भक्तीच्या बरोबरीने महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी महत्वाचा आहे. केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीने आता महाराष्ट्रवर लक्ष केंद्रीत केलय.
सोलापूर : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. त्यांनी उस्माबादच्या उमरग्यामध्ये दुपारच भोजन घेतलं. के चंद्रशेखर राव पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. उद्या ते पंढरीत विठूरायाच दर्शन घेतील. के. चंद्रशेखर राव यांचा हा महाराष्ट्र दौरा भक्तीच्या बरोबरीने महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी महत्वाचा आहे. केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीने आता महाराष्ट्रवर लक्ष केंद्रीत केलय.
तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष सत्तेवर आहे. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामागे अनेक राजकीय उद्देश आहेत. तत्पूर्वी आज 600 गाड्यांचा ताफा घेऊन चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाला.
चंद्रशेखर राव यांचा मटणावर ताव
चंद्रशेखर राव यांनी आधी उस्मानाबादच्या उमरग्यामध्ये आले. तिथे त्यांन कार्यकर्त्यांसह दुपारच भोजन घेतलं. पंढरपुरात येण्याआधी केसीआर यांनी मटणावर ताव मारला. वारीला जाताना मांसाहार टाळला जातो. चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरात येताना मटणावर ताव मारल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ शकते. आता त्यांचा ताफ उमरग्यातून सोलापूरच्या दिशेने रवाना झाला आहे.
राष्ट्रवादीचा नेता बीआरएसमध्ये प्रवेश करणार
उद्या पंढरपूरात ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत. के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत त्यांच अख्ख मंत्रिमंडळही आलं आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते भागीरथ भालके तेलंगण राष्ट्र समिती या पक्षामध्ये प्रवेश करतील. रविवारी पंढरपुरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भालके यांनी ही घोषणा केली. “अडचणीच्या काळात प्रमुख नेता गेल्यानंतर आमच्या पाठिशी ज्या पद्धतीने उभं रहायला पाहिजे होतं, तसं कोणी राहिलं नाही. आमच्यावरच टिकाटिप्पणी झाली, त्यामुळे नक्कीच स्वाभिमानाला ठेच लागली” असं भारत भालके म्हणाले. चंद्रशेखर राव यांच्या BRS चा महाविकास आघाडीला फटका बसू शकतो. म्हणूनच आतापासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केसीआर यांच्यावर टीका सुरु झाली आहे.