Sambhaji Bhide | संभाजी भिडेंची मोठी कायदेशीर अडचण, पोलीस चौकशीसाठी बोलवणार?
Sambhaji Bhide | पोलिसांनी बजावलेल्या नोटीसचा अर्थ काय?. आरोपीला अटक करण्यापूर्वी दिली जाते, तशी नोटीस. संभाजी भिडे यांच्याविरोधात, अटकेची कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
अमरावती : शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केली. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका सुरु आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन सुरु आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात, अटकेची कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. संभाजी भिडे यांची वक्तव्य तपासून योग्य ती कारवाई करु असं सरकारने म्हटलं आहे.
या नोटीसचा अर्थ काय?
दरम्यान आता अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडेंना गुन्ह्याच्या संदर्भाने नोटीस पाठवली आहे. पोलीसांनी चौकशीला बोलावल्यास संभाजी भिडेंना पोलिसात किंवा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. आरोपीला अटक करण्यापूर्वी दिली जाते, तशी नोटीस पोलिसांनी दिली आहे.
कुठल्या कलमांतर्गत नोटीस
भिडे यांना, पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करावे लागणार आहे. पोलिसांनी कायद्याच्या कलम 41 (1) (अ) नुसार संभाजी भिडेंना नोटीस पाठवली आहे. संभाजी भिडे यांचा दौरा रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार दौरा रद्द झाल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाद नको म्हणून दौरा रद्द. औरंगाबादहून संभाजी भिडे सांगलीला रवाना झाले आहेत.