Hair Care Routine : आजकाल बरेच लोकं कोरड्या केसांच्या (dry hair) समस्येमुळे वैतागलेले असतात. त्यामुळे केस जास्त गळतातही , आणि पातळही होता. काहीवेळा यामुळे केस दुभंगण्याची (split ends) समस्या देखील जाणवते. जास्त उशीर होण्यापूर्वी केसांची योग्य काळजी घेणे उत्तम ठरते. केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचाही वापर करू शकता.
हे नैसर्गिक पदार्थ केसांना खोलवर पोषण देण्याचे काम करतात व इतर समस्यांपासूनही बचाव होण्यास मदत मिळते. केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी वापरू शकता, ते जाणून घेऊया
खोबरेल तेलाने करा मसाज
खोबरेल तेल गरम करूनही तुम्ही ते केसांना लावून मसाज करू शकता. खोबरेल तेल थोडे गरम करा. ते केसांवर व टाळूवर 10 मिनिटे मसाज करा. त्यानंतर सुमारे 40 मिनिटे हे तेल राहू द्या. थोड्या वेळाने केस सौम्य शाम्पूने धुवा. तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खोबरेल तेलाने टाळूची मालिश करू शकता.
खोबरेल तेल आणि अंडं
कोरड्या केसांच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि अंडं यांचा वापर करू शकता. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून स्काल्पवर लावा आणि अर्धा तास तसेच राहू द्या. त्यानंतर डोकं कव्हर करावं. थोड्या वेळाने केस धुवून घ्या. हा हेअर पॅक तुम्ही आठवड्यातून तीनदा वापरू शकता. यामुळे तुमचे केस मऊ होण्यास मदत होईल.
दही आणि खोबरेल तेलाचा पॅक
अर्धा कप दह्यात २ ते ३ चमचे खोबरेल तेल मिसळा. हे दोन्ही मिक्स करून केसांना लावा. दही आणि खोबरेल तेलाचा पॅक अर्धा तास डोक्यावर ठेवा. नंतर केस सौम्य शांपूने धुवा.
खोबरेल तेल आणि केळं
कोरड्या केसांना मऊ करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि केळ्याची पेस्ट देखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात ३ चमचे तेल घेऊन त्यात केळी मॅश करा. आता ही पेस्ट केसांना पॅकप्रमाणे लावा. यानंतर स्वच्छ पाण्याने केस स्वच्छ धुवा. मऊ केसांसाठी तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोनदा हा हेअर मास्क वापरू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)