त्वचेची स्पेशल काळजी घ्यायची आहे ? या पदार्थांसह करा ग्लिसरीनचा वापर, मिळेल नैसर्गिक चमक

| Updated on: Aug 22, 2023 | 4:59 PM

त्वचेवरील चमक कायम ठेवण्यासाठी आणि चांगली, नितळ त्वचा मिळविण्यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशा वेळी काही नैसर्गिक गोष्टींसोबत ग्लिसरीनचा वापर उत्तम ठरू शकतो.

त्वचेची स्पेशल काळजी घ्यायची आहे ? या पदार्थांसह करा ग्लिसरीनचा वापर, मिळेल नैसर्गिक चमक
Image Credit source: freepik
Follow us on

Skin Care Tips : कोणताही ऋतू असला तरी स्किन केअरची (skin care) गरज प्रत्येकालाच असते. कारण चमकदार आणि सुंदर त्वचा मिळवणं हे खूप चॅलेंजिंग असतं. अशा वेळी ग्लिसरीनचा वापर आपल्यासाठी उत्तम ठरू शकतो. स्किन केअरसाठी ग्लिसरीनचा (Glycerin for skin care) समावेश करून, आपण चमकदार (glowing skin) आणि टॅनमुक्त त्वचा मिळवू शकतो.

मात्र केवळ ग्लिसरीन वापरल्याने हवे ते परिणाम मिळू शकत नाहीत. यासाठी ग्लिसरीनसह काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून पहा. त्याच्या मदतीने तुम्हाला त्याचे त्याचे सर्व फायदे मिळू शकतात. ग्लिसरीनचे काही उत्तम उपयोग आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.

गुलाब पाणी आणि ग्लिसरीन

गुलाब पाणी आणि ग्लिसरीन यांच्या एकत्र वापराने त्वचेचा कोरडेपणा दूर होऊ शकतो.यासाठी ग्लिसरीनमध्ये गुलाबपाणी मिसळून ते चेहऱ्याला लावाने आणि काही वेळाने साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते आणि चेहरा तेजस्वी दिसू लागतो.

मुलतानी माती व ग्लिसरीनचा वापर

त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी आपण मुलतानी माती आणि ग्लिसरीनचा वापर करू शकतो. यासाठी एका बाऊलमध्ये मुलतानी माती घेऊन त्यामध्ये थोडे ग्लिसरीन मिसळावे व ते चेहऱ्याला लावावे. थोड्या वेळाने साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. यामुळे त्वचेचा ताजेपणा कायम राहतो.

मध आणि ग्लिसरीन

स्किन केअरमध्ये मध आणि ग्लिसरीनचा वापर करून तुम्ही पिगमेंटेशनपासून आराम मिळवू शकता. तसेच ॲक्ने आणि पिंपल्स यांपासून मुक्त होण्यासाठी देखील ग्लिसरीन आणि मधाचा वापर सर्वोत्तम ठरतो. या दोघांच्या वापराने चेहऱ्याची चमकही कायम राहते.

लिंबू व ग्लिसरीनचा वापर

त्वचेला खाज येणे, बॅक्टेरिया आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि ग्लिसरीनची मदत घेऊ शकता. यासाठी ग्लिसरीनमध्ये लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावा आणि काही वेळाने चेहरा ताज्या पाण्याने धुवा. यामुळे तुमचा चेहरा चमकदार आणि डागरहित होण्यास मदत मिळेल. मात्र याचा वापर करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करावी. कारण लिंबाचा रस हा सर्वांच्याच त्वचेला सूट होईलच असे नाही.

ग्लिसरीनचे फायदे

ग्लिसरीन हा त्वचेसाठी सर्वोत्तम मॉयश्चरायझिंग एजंट मानला जातो. त्यामुळे ग्लिसरीनच्या वापराने तुम्ही त्वचेचा ओलावा कायम राखू शकता तसेच पिंपल्स, ॲक्ने आणि चेहऱ्यावरील डागांच्या समस्येलाही बाय-बाय म्हणून शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)