नवी दिल्ली : भारतातील नाण्यांची एक वेगळी कथा आहे. एक रुपयाच्या नाण्याचा इतिहास विशेष आहे. कारण त्यावेळी देशात वेगवेगळ्या नाण्यांचं चलन होतं. हे नाणे व्यापारात अडचण निर्माण करत होते. याच अडचणींचा सामना करण्यासाठी एक रुपयांचे नाणे आणण्यात आलं. आजपासून २६६ वर्षांपूर्वी १९ ऑगस्ट रोजी १७५७ मध्ये भारतात नाण्याच्या रुपात पहिल्यांदा एक रुपया तयार झाला. सुरुवातीला हे मर्यादित प्रमाणात होते. पण, इतिहासात ही तारीख नोंदवली गेली.
एक रुपयांच्या किमतीचे नाणे ईस्ट इंडिया कंपनीने जारी केले. हे नाणे कोलकात्यात तयार झाले. प्लासीची लढाई संपली होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटीशराज सुरू झाले होते. ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीला हे नाणे मुघल प्रांतात चालवले.
त्यावेळी वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नाणी होती. व्यवसायात अडचणी येत होत्या. १८३५ साली युनिफार्म कॉईन अॅक्ट पारीत झाला. देशात एकचं नाणे प्रचलित झाले. वेगवेगळ्या नाण्यांचे चलन संपुष्ठात येऊ लागले. तेव्हापर्यंत इंग्रजांनी संपूर्ण देशावर ताबा मिळवला होता. नाण्यावर ब्रिटिश सत्ताधाऱ्यांचे फोटो छापले जात होते. यापैकी महाराणी व्हिक्टोरियाचा फोटो प्रमुख स्थानी होता.
ईस्ट इंडिया कंपनीने १६१३ मध्ये पहिल्यांदा नाणे तयार करणारी कंपनी सुरतमध्ये स्थापित केली. त्यानंतर अहमदाबाद आणि बॉम्बे येथे कंपनीची स्थापना झाली. परंतु, एक रुपयांचे नाणे पहिल्यांदा कोलकात्यात तयार झाले. ती तारीख होती १९ ऑगस्ट १७५७.
एक रुपयांचे नाणे पहिल्यांदा कोलकात्यात तयार झाले. त्यापूर्वी गोल्ड, कॉपर, सिल्व्हरचे नाणे राहत होते. त्यांना अनुक्रमे कॅरोलिना, एंजलीना आणि कॉपरून म्हटले जात होते. स्वतंत्र भारताव्यतिरिक्त १९५० पर्यंत ब्रिटीशकालीन नाणे देशात प्रचलित होते. त्यानंतर भारताने स्वतःचे नाणे तयार केले. १९६२ मध्ये एक रुपयांचे नाणे प्रचलित झाले. ते आजही बाजारात आहे. त्याच्या डिझाईनमध्ये बदल झाला. परंतु, नाण्याच्या किमतीत बदल झाला नाही.