प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलीची दर्यादिली, एका झटक्यात 123 कोटी रुपये दान; काय आहे प्रकरण?

| Updated on: Aug 28, 2023 | 2:58 PM

पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या लेकीने 123 कोटी रुपयांचे दान केलं आहे. त्यामुळे ती अधिकच चर्चेत आली आहे. पाकिस्तान आर्थिक संकटांना सामोरे जात असताना अब्जाधीशाच्या लेकीने हे पाऊल उचलल्याने तिचं कौतुक होत आहे.

प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलीची दर्यादिली, एका झटक्यात 123 कोटी रुपये दान; काय आहे प्रकरण?
shanna khan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कराची | 28 ऑगस्ट 2023 : पाकिस्तान सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानी नेते जंग जंग पछाडत आहे. पण हे आर्थिक संकट पिशाच्चासारखं त्यांच्या मानगुटीवर बसलं आहे. असं असलं तरी पाकिस्तानात अब्जाधीशांची संख्याही कमी नाहीये. शाहिद खान हे पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांना पाकिस्तानातील अंबानीही म्हटलं जातं. मात्र, सध्या शाहिद खान यांच्यापेक्षा त्यांची मुलगी शन्ना खान हिची सर्वाधिक चर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे.

पाकिस्तानातील अब्जाधीश शाहिद खान आणि त्यांचे कुटुंबीय दान देण्यात नेहमीच आघाडीवर असतात. एकीकडे देश आर्थिक संकटात असताना त्यांच्या मुलीने म्हणजे शन्ना खान हिने एक दोन नव्हे तर 123 कोटी रुपये दान केले आहेत. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. शन्ना ही सामाजिक कार्यात अधिक रस घेते. जगुआर फाऊंडेशन नावाची एक संस्था ती चालवते. या संस्थेच्या माध्यमातून तिने मोठी रक्कम दान केली आहे. शन्ना खानची नेटवर्थ 20 कोटी डॉलर आहे. त्यातील तिने 123 कोटी रुपये दान केले आहेत. हॉस्पिटल, अॅनिमल हेल्थ आणि ऑन्कॉलॉजी प्रोग्राम्ससाठी तिने ही रक्कम दान दिली आहे. तिच्या या दर्यादिलीमुळे पाकिस्तानात सध्या तिची जोरदार चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियापेक्षा सामाजिक कार्यात व्यस्त

शन्नाचा जन्म 1986मध्ये अमेरिकेत झाला होता. तिने तिथेच शिक्षम घेतलं. वुल्फ पॉइंट अॅडव्हायझर्सचे एमडी जस्टिन मॅककेबे यांच्यासोबत तिचं लग्न झालंय. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची ही मुलगी सोशल मीडियावर कमी आणि सामाजिक कार्यात अधिक व्यस्त असते.

हे सुद्धा वाचा

स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कमाई

शन्ना सामाजिक कार्यात सतत काहींना काही करत असते. अनेक पातळ्यांवर तिचं काम सुरू असतं. त्यामुळेच तिने जगुआर फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन करून सढळ हाताने मदत देण्यास सुरुवात केली आहे. शन्ना ही युनायटेड मार्केटिंग कंपनीची को-ऑनर आहे. तिने खासगी कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.

12 अब्ज डॉलरची संपत्ती

शन्नाचे वडील शाहिद खान हे पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते अब्जाधीश आहेत. पाकिस्तानातील अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा पहिला नंबर लागतो. त्यांची 12 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. अनेक कंपन्यांचे ते मालक आहेत. अनेक क्षेत्रात त्यांचं काम सुरू आहे. लाहौर येथे जन्मलेले शाहीद खान हे अमेरिकेत राहतात. त्यांची फ्लेक्स न्यू गेट नावाची कंपनी ऑटो मोबाईल पार्टस बनवतेय. अमेरिका, ब्राझिल, मॅक्सिको, चीन आणि स्पेनमध्ये त्यांचे 62 प्लांट आहेत.