कांदा खाल्ल्याशिवाय जेवण जात नाही पण बाहेर जाताना खाऊ शकत नाही? तोंडाचा वास दूर करण्यासाठी करून बघा ‘हे’ उपाय

| Updated on: Aug 26, 2023 | 11:05 PM

कांदा सतत खाल्ल्याने आपलं अनेक आजारांपासून संरक्षण होऊ शकतं. कांद्याचा वापर आपण मसाल्यात, भाजीत करतो. कांद्याची भजी देखील सगळ्यांना आवडतात. कच्चा कांद्याचे सुद्धा खूप फॅन आहेत. पण तुम्हाला याची कल्पना असेलच की कच्चा कांदा खाल्ल्यावर तोंडाचा किती वास येतो.

कांदा खाल्ल्याशिवाय जेवण जात नाही पण बाहेर जाताना खाऊ शकत नाही? तोंडाचा वास दूर करण्यासाठी करून बघा हे उपाय
Follow us on

मुंबई: कांदा! अनेकजण असे आहेत ज्यांना कांदा खायला खूप आवडतो. कांदा, लोणचं, काकडी, कोशिंबीर याशिवाय लोकांना जेवण जात नाही. कांद्यामध्ये सल्फर, पोटॅशियम, झिंक इत्यादी अनेक पोषक घटक असतात. कांदा सतत खाल्ल्याने आपलं अनेक आजारांपासून संरक्षण होऊ शकतं. कांद्याचा वापर आपण मसाल्यात, भाजीत करतो. कांद्याची भजी देखील सगळ्यांना आवडतात. कच्चा कांद्याचे सुद्धा खूप फॅन आहेत. पण तुम्हाला याची कल्पना असेलच की कच्चा कांदा खाल्ल्यावर तोंडाचा किती वास येतो. तोंडाला वास येत असेल तर मग करायचं? यावर काय उपाय आहे? जाणून घेऊया.

कांदा आणि लिंबाचा रस

जेवण करताना कच्चा कांदा खायचा असेल तर तो लिंबाच्या रसात बुडवून खा. होय! लिंबासोबत जर कांदा खाल्ला तर त्याने तोंडाचा वास येत नाही. तोंडाचा वास येत असेल तर हा उपाय एकदा करून बघा. हा उपाय केलात तर तुम्ही रोज कांदा खाऊ शकता.

बडीशेप

बडीशेप माऊथ फ्रेशनर आहे. याने तोंडाचा वास येत नाही. जर तुम्ही जेवणासोबत कच्चा कांदा खात असाल तर त्यानंतर बडीशेपचे सेवन करू शकता. बडीशेप न चुकता खा, तोंडाचा वास येऊ नये म्हणून चांगला उपाय आहे. बडीशेप सारखेच इतरही काही माऊथ फ्रेशनर असतील तर तुम्ही तेही खाऊन तोंडाचा वास दूर करू शकता.

वेलची

वेलची सुद्धा माऊथ फ्रेशनर आहे. तोंडचं आरोग्य सांभाळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. वेलची खाताच तुम्हाला फरक दिसेल. हे माऊथ फ्रेशनर पचनासाठी देखील उत्तम असतात, ते पचनात मदत करतात. वेलचीचा सुगंध तीव्र असतो.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)