अरेरे, शत्रूसोबतही असं घडू नये! लग्नाच्याच दिवशी प्रसिद्ध गायकाने घेतला अखेरचा श्वास

लग्नानंतर काही तासांतच प्रसिद्ध गायकाचं निधन; हृदय पिळवटून टाकणारी पत्नीची पोस्ट

अरेरे, शत्रूसोबतही असं घडू नये! लग्नाच्याच दिवशी प्रसिद्ध गायकाने घेतला अखेरचा श्वास
Country singer Jake FlintImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 3:06 PM

अमेरिका: प्रसिद्ध कंट्री सिंगर जेक फ्लिंट याने त्याची पार्टनर ब्रेंडाशी लग्न करण्यासाठी अनेक स्वप्नं पाहिली होती. हे स्वप्न त्याने सत्यातही उतरवलं होतं. मात्र आनंदाच्या या काही क्षणांनंतर सर्वकाही उद्ध्वस्त झालं. लग्नानंतर काही तासांतच जेकनं अखेरचा श्वास घेतला. त्याच्या या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 37 वर्षीय जेकच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्यावेळी आम्ही एकत्र लग्नाचे फोटो पाहायला पाहिजे होतं, त्यावेळी मी पतीच्या अंत्यविधीसाठी कपडे घेतेय, अशी हृदयद्रावक पोस्ट जेकच्या पत्नीने सोशल मीडियावर लिहिली आहे.

26 नोव्हेंबर रोजी शनिवारी जेक आणि ब्रेंडाचं लग्न पार पाडलं. याच दिवशी रात्री झोपेत जेकनं अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. जेकच्या निधनावर चाहते सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.

जेकच्या पत्नी पोस्ट-

‘खरंतर यावेळी आम्ही सोबत बसून लग्नाचे फोटो पहायला पाहिजे होतं, मात्र मला माझ्या पतीच्या अंत्यविधीसाठी कपडे निवडावे लागत आहेत. एवढं दु:ख कोणाच्याच नशिबी येऊ नये. माझं हृदय जेकसोबतच निघून गेलंय. त्याने परत यावं अशी माझी अतोनात इच्छा आहे. मी आणखी सहन करू शकत नाही, मला त्याची गरज आहे’, अशा शब्दांत ब्रेंडाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

लग्नासाठी जेकनं सर्कसचा तंबू भाडेतत्त्वावर घेतला होता. नॉर्मन इथला वन-मॅन बँड माइक हॉस्टी याला त्याने लग्नात परफॉर्म करण्यासाठी बोलावलं होतं.

जेक फ्लिंटने कमी वयात संगीतविश्वात पाऊल ठेवलं होतं. 2016 मध्ये त्याने ‘आय ॲम नॉट ओके’ हा पहिला म्युझिक अल्बम प्रदर्शित केला. व्हॉट्स युअर नेम, लाँग रोड बॅक होम, काऊटाऊन, फायरलाइन यांसारख्या गाण्यांमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.