टीव्ही इंडस्ट्रीतील ‘रामायण'(Ramayan) ही मालिकेचा आजही प्रेक्षकांवर मोठा प्रभाव आहे. रामानंद सागर (Ramanand Sagar)सागर निर्मित रामायण मालिकेने कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात प्रभू रामचंद्राची प्रतिमा निर्माण केली. या मलिकेत प्रभू राम यांची भूमिका अभिनेता अरुण गोविल(Arun Govil) यांनी साकारली होती. प्रेक्षकांच्या मनात आजही त्यांची प्रतिमा प्रभू रामाची आहे. नुकताच याचा प्रत्यय आला.
तर झालं असं कि, रामायणात रामाची भूमिका साकारलेले अभिनेता अरुण गोविल रामलीलाच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निघाले होते. अरुण विमातळावर पोहचताच चाहत्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. चाहत्यांनी त्यांना विमातळावरच हार घालत त्यांचे चरण स्पर्श केले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आयएएस अधिकारी सुमिताने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंट वर शेअर केला आहे.
आपकी छवि क्या है औरों के हृदय में उससे ही आपकी महानता है।रामायण टीवी धारावाहिक को 35 वर्ष हो गए पर राम का चरित्र निभाने वाले अरुण गोविल आज भी सबके लिए प्रभु श्रीराम ही हैं। भावुक कर देने वाला क्षण। @arungovil12 pic.twitter.com/4nM979xQl3
— Dr Sumita Misra IAS (@sumitamisra) September 30, 2022
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की जेव्हा अरुण गोविल विमानतळावर येतात तेव्हा भगव्या रंगाची साडी नेसलेली महिला तसेच पुरुष पुढे येत अरुण यांच्या पाया पडत आहे, तसेच स्वतः सोबत आणलेली शाल त्यांच्या खांद्यावर टाकत त्यांनानमस्कार करत आहेत. या घटनेमुळे चकित झालेल्या अरुण यांनी संबंधित महिलेला हात जोडून नमस्कार केला आहे .
हा व्हिडीओ ट्विट करत सुमिताने लिहिले आहे, की रामायण मालिका टीव्हीवर येऊन ३५ वर्षेपूर्ण झाली. मात्र आजही प्रभू रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल हेच सर्वांसाठी भगवान श्रीराम आहेत. अरुण यांनीही आपल्या इन्स्टावरून हा व व्हिडिओ ट्विट केला आहे. विमातळावर अरुण गोविल यांना भेटून ती महिला भावूक झालेली दिसून येत आहे.