Karnataka Election Results 2023: कर्नाटकच्या निकालाचा सोशल मीडियावर धुमाकूळ, भन्नाट memes!

| Updated on: May 13, 2023 | 1:02 PM

Karnataka Assembly Election Results 2023: राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव होताना दिसत आहे. गेल्यावेळी 104 जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत 69 जागांवरच आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसने 128 जागांवर आघाडी घेतली आहे.

Karnataka Election Results 2023: कर्नाटकच्या निकालाचा सोशल मीडियावर धुमाकूळ, भन्नाट memes!
Karnataka Elections 2023
Follow us on

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Election Result 2023) आज निकाल लागलाय. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत असल्याने या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. दुपारी 12 वाजेपर्यंतच्या कलानुसार भाजपला सत्तेतून जावे लागणार आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव होताना दिसत आहे. गेल्यावेळी 104 जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत 69 जागांवरच आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसने 128 जागांवर आघाडी घेतली आहे. परंतु कर्नाटकातील 20 जागांमुळे चित्र कधी बदलण्याची शक्यता आहे. या सगळ्यात सोशल मीडियावर लोंकानी चांगलंच धुमाकूळ घातलाय. मिम्स शेअर करून लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. एवढ्या मोठ्या निवडणुकीचे पडसाद सोशल मीडियावर उमटणार नाहीत असं होऊ शकतं का? भन्नाट मिम्स शेअर केलेत लोकांनी, चला तर मग एक नजर टाकुयात.