आधी नोकरी दिली, मग ऑनलाईन टास्कवर पूर्ण करण्याच्या नावाखाली गंडा

पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवत नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळ्या सध्या सक्रिय आहेत. ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगून पैसे लुटतात.

आधी नोकरी दिली, मग ऑनलाईन टास्कवर पूर्ण करण्याच्या नावाखाली गंडा
जेष्ठ नागरिकाला एकटे गाठत भररस्त्यात लुटलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 11:49 AM

डोंबिवली : पार्टटाईम नोकरी देत ऑनलाईन टास्कच्या नावाखाली एका तरुणाला साडे चार लाखाहून अधिक गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. पार्टटाईम जॉबबाबत मॅसेज पाठवून, इन्स्टाग्रामवरील पोस्ट लाईक आणि सबस्क्राईब केल्यास प्रतिदिन 2000 ते 5000 रुपये मिळतील, असे सांगून टेलिग्रामवर ग्रुप बनवून त्याचा फिर्यादी यांना फायदा दिला. नंतर ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास भरलेल्या रकमेवर 30 टक्के अधिक रक्कम देण्याचे आमिष दाखवले. मग तरुणाची तब्बल 4 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

आधी नोकरी दिली, पगार दिला, मग टास्क पूर्ण करण्यास सांगितले

डोंबिवली पूर्व भागात राहणाऱ्या मंदार मोरेश्वर जाधव या 38 वर्षीय तरुणाला इन्स्टाग्रामवरील पोस्ट लाईक आणि सबस्क्राईब केल्यास प्रतिदिन 2000 ते 5000 रुपये मिळतील, असे सांगितले. तरुणाला नोकरी देत त्याच्या मोबाईलवर तीन इन्स्टाग्राम खात्याच्या लिंक पाठवत त्या तिन्ही खात्याला फॉलो करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी याने फॉलो केल्याने त्याला पगार म्हणून काही रक्कम त्याच्या खात्यात पाठवली. नंतर पुढचा टास्क हा पैसे भरण्याचा असल्याने मंदार यांनी ऑनलाईनद्वारे तीन हजार रुपये पाठवले. त्या मोबदला 4 हजार 20 रुपये मिळाले. त्यानंतर मंदारला आणखी एक टास्क देत तो पूर्ण केल्यानंतर जेवढी रक्कम भराल, त्या रकमेवर 30 टक्के अधिक रक्कम दिली जाईल सांगितले. त्यानंतर मंदारने 7 हजार रुपये भरले.

वारंवार पैसे भरण्यास सांगत 4 लाख 78 हजार रुपये लुटले

मात्र, आरोपींनी त्याला टास्कमध्ये काहीतरी चूक झाली सांगत, पुन्हा पैसे भरण्याविषयी सांगितल्याने मंदार पैसे भरत गेला. एकूण 4 लाख 78 हजार रुपये त्यांनी ऑनलाईनद्वारे पाठवले. मात्र, या रकमेवर त्यांना एक रुपया देखील मिळाला नाही. आणखी पैसे भरण्यासाठी त्यांच्याकडे आता काहीच पैसे शिल्लक राहिले नाहीत. लाखो रुपये उकळल्यानंतरही आरोपींकडून पैशाची मागणी थांबली नाही.

विष्णुनगर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

पैसे न भरल्यास आजपर्यंत भरलेली रक्कम परत मिळणार नाही, अशी धमकी देखील आरोपींनी मंदारला दिली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे मंदारच्या लक्षात येताच त्याने लगेच पोलीस ठाणे गाठले. सध्या याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यातर दोन आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णुनगर पोलीस ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या या आरोपींचा शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.