Pune Fire : पुण्यात अग्नीकल्लोळ, स्वारगेट परिसरात दुकानांना भीषण आग
स्वारगेट येथील भंगार दुकान, रद्दी डेपो आणि गादी घरला भीषण आग लागली. दुकानात काम सुरू असताना आगीची ठिणगी पडून आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते.
पुणे : पुण्यात स्वारगेट परिसरात 3 दुकानांना भीषण आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीत 3 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. स्वारगेट येथील भंगार दुकान, रद्दी डेपो आणि गादी घरला भीषण आग लागली. दुकानात काम सुरू असताना आगीची ठिणगी पडून आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेतय. आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र तिन्ही दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत.
गादीच्या दुकानात वेल्डिंग कामकाजादरम्यान आग
स्वारगेट परिसरात गादीचे दुकान आहे, तिथे वेल्डिंगचे काम सुरु होते. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास दुकानात काम सुरू असताना गॅस कटरच्या आगीची ठिणगी पडून दुकानात आग लागली.
तीन दुकाने आगीने भक्षस्थानी केली
बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. शेजारी असणाऱ्या भंगार दुकान आणि रद्दी डेपोमध्ये आग पसरली आणि तीन दुकाने आगीच्या भक्षस्थानी गेली. तात्काळ अग्नीशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली.
कोणतीही जीवितहानी नाही
अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अग्नीशमन दलाने युद्धपातळीवर प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकाने जळून खाक झाली.
मुंबईतही गोदामांना आग
अंधेरी साकीनाका वायर गल्लीत शॉर्ट सर्किटमुळे गोदामांना आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या पथकाने तासाभरानंतर आटोक्यात आणली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीमुळे पाच ते सहा गाळ्यांमध्ये ठेवलेला समान जळून खाक झाला.