पोलिसात भरती करतो सांगून चार तरुणांना अडीच लाखाला गंडा, तोतया पोलीस ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

तोतया पोलीस पोपट चौगुले यास तरुणांनी प्रत्येकी 60 हजार रुपये रक्कम दिली होती. 10 मे पासून 1 सप्टेंबरपर्यंत एकूण 2 लाख 40 हजार रुपये रक्कम दिली होती.

पोलिसात भरती करतो सांगून चार तरुणांना अडीच लाखाला गंडा, तोतया पोलीस 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात
ठेकेदाराचे अपहरण करत खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 9:22 PM

सोलापूर : पोलिसात भरती करतो असे सांगून तोतया पोलिसा (Bogus Police)ने चार जणांची फसवणूक (Cheating) केल्याची घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. या आरोपीने चौघांकडून 2 लाख 40 हजार रुपये ठगले आहेत. पोपट रामचंद्र चौगुले असे 32 वर्षीय तोतया पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक (Arrest) करत त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पोलीस असल्याचे भासवण्यासाठी वर्दीतील फोटो डीपीवर ठेवला

आरोपी पोपट चौगुले हा मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील रहिवासी आहे. पोलीस असल्याचे भासवण्यासाठी आरोपी पोपटने खाकी वर्दी देखील शिवून घेतली होती. त्या वर्दीवरील फोटोही त्याने व्हॉट्सअपच्या डीपीवर ठेवला होता.

आरोपीने हालचिंचोळी येथील तरुणांशी संपर्क करत त्यांना पोलीस भरतीचे आश्वासन दिले होते. त्याबदल्यात त्याने मलकासिद्ध रमेश जमादार या तरुणाकडून पैसेही उकळले होते. पैसे दिल्यानंतरही नोकरीचे काम झाले नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले.

हे सुद्धा वाचा

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसात तक्रार दिली

मलकासिद्ध जमादार याने पोलिसांशी संपर्क करुन वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक म्हळप्पा सुरवसे यांनी अधिकृत माहिती दिली. संशयित आरोपी पोपट चौगुले हा पोलीस युनिफॉर्मचा डीपी ठेवलेल्या व्हॉट्सअप कॉल करून पैसे उकळत होता. 10 मे पासून तोतया पोलीस चार तरुणांना व्हिडिओ कॉल करत पैशांची मागणी करत होता.

आरोपीने एकूण 2 लाख 40 हजार लाटले

मलकासिद्ध रमेश जमादार, रवी गेनसिद्ध जमादार, समर्थ अशोक भगत, आकाश चंद्रकांत कोळी हे पोलीस भरतीच्या आमिषाला बळी पडले. तोतया पोलीस पोपट चौगुले यास तरुणांनी प्रत्येकी 60 हजार रुपये रक्कम दिली होती. 10 मे पासून 1 सप्टेंबरपर्यंत एकूण 2 लाख 40 हजार रुपये रक्कम दिली होती. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीसह त्यांच्या मित्रांनी पोलिसात धाव घेतली. (Four youths cheated by promising police jobs in Solapur)

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.