पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन वाद, मग जुगार क्लब मालकाला थेट भोसकले !

| Updated on: May 30, 2023 | 11:37 AM

एका जुगार क्लबमध्ये घुसून सहा जणांनी क्लबच्या मालकावर हल्ला केला होता. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले होते.

पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन वाद, मग जुगार क्लब मालकाला थेट भोसकले !
जुगार क्लब मालकाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक
Image Credit source: TV9
Follow us on

उल्हासनगर : जुगार क्लब मालक शब्बीर शेख याच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. शेख यांची 26 मे रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची आठ पोलीस स्टेशन आणि ठाणे गुन्हे शाखेने दखल घेतली होती. शेख हा उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील जय जनता कॉलनीत जुगार अड्डा चालवत असल्याने आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओनंतर व्हायरल झाला होता. विक्रम कवठणकर, दिनेश कवठणकर, प्रशांत तायडे आणि संतकबीर बोराडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार जयेश साळुंखे आणि विजय रुपाणी फरार आहेत.

पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद आणि हत्या

पोलीस चौकशीत आरोपींनी जुगाराच्या आऊटलेटवर पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद केल्याचे कबूल केले. हा वाद नंतर हत्या प्रकरणापर्यंत पोहचला. आरोपींविरुद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे, असे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी सांगितले. हत्येसाठी वापरलेली हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

उपचारादरम्यान झाला होता मृत्यू

शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सहा जण हातात धारदार शस्त्र घेऊन शेखच्या क्लबमध्ये घुसले आणि त्यांनी शेख याच्यावर हल्ला चढवला. यात गंभीर जखमी झालेल्या शब्बीर याला आधी उल्हासनगर आणि तिथून कल्याणच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शब्बीर शेख याला नुकतंच शिंदे गटाचं शाखाप्रमुख पद सुद्धा देण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा